Site icon InMarathi

पुस्तकांची नव्हे, साड्यांची लायब्ररी जिथे फक्त ५०० रुपयांत मिळतील भारीतल्या साड्या

saree im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्नकार्य असो की पार्टी नेहमीपेक्षा वेगळी साडी नेसली जाते. या खास अशा सिल्कच्या किंवा डिझायनर साड्या असतातही महाग. ही महागडी साडी अशा खास प्रसंगीच नेसली जाते, मात्र एकदा नेसलेली साडी पुन्हा पुन्हा नेसू शकत नाही. यामुळे दोन गोष्टी होतात. एकतर साड्यांची वारेमाप खरेदी केली जाते आणि अशा खरेदी केलेल्या अनेक साड्या कपाटात पडून असतात.

अनेकजणी अशाही असतात, की एखाद दोन वेळा जी साडी नेसायची आहे तिच्यावर हजारो रुपये खर्च करणं म्हणजे उधळपट्टी वाटते, मात्र सणासमारंभात तर साडी नेसावीच लागते. मग यावर उपाय काय? समजा हजारो रुपये खर्च न करताही जर तुम्हाला हजारों रुपयांची साडी जर काही शे रुपयांत नेसायला मिळत असेल तर? ही अनोखी युक्ती शोधली आहे, गुजरातमधील बडोदा शहरातल्या काही महिलांनी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बडोद्यातील ओल्ड पडरा रोड, मल्हार पॉइंटवर एक अनोखी लायब्ररी आहे, साडी लायब्ररी. या लायब्ररीत तुम्हाला हजारो रुपयांच्या महागड्या साड्या वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. इथून कोणत्याही तीन साड्या मामुली रक्कम देऊन पाच दिवसांसाठी वापरायला घेऊन जाऊ शकतात.

२०२० मधे एक विशिष्ट हेतू डोळ्यांसमोर ठेवत आठ मैत्रीणींनी ही अभिनव लायब्ररी स्थापन केली. या लायब्ररीचं नाव आहे, अष्ट सहेली लायब्ररी. या लायब्ररीच्या संस्थापक आहेत, हेमा चौहान.

 

 

या अनोख्या लायब्ररीची कल्पना हेमा यांना सुचण्यास निमित्त झालं त्यांच्याकडे काम करणाऱ्या मदतनीस मुलीचं. त्याचं झालं असं की, तिला गावाकडे एका लग्नासाठी जायचं होतं. अगदी जवळच्या नातेवाईकांचं लग्न होतं मात्र तिच्याकडे लग्नात घालायला चांगली साडी नसल्यानं ती नाराज होती.

हेमा यांनी आपल्याकडची एक चांगली चनिया चोळी तिला लग्नात वापरायला म्हणून दिली. त्यांची मदतनीस लग्नाहून परतली ते आनंदानं नाचत. तिनं लग्नात घातलेली चनिओया चोळी सगळ्यांनाच फार आवडली होती आणि सगळेजण तिच्याकडे चौकशी करत होते,  की ही चनिया चोळी कुठून घेतली?

तिचा हा आनंद बघून हेमा यांनी ती चनिया चोळी तिलाच कायमची देऊन टाकली, मात्र त्यांच्या मनात असाही विचार आला, की आपल्या आजूबाजूला अशा अनेकजणी असतील ज्यांच्याकडे लग्नप्रसंगी नेसण्यासाठी चांगल्यातली साडी नसेल. दुसरीकडे अशा अनेकजणी असतात ज्यांच्याकडे कपड्यांचा अक्षरश: खच आहे, ज्यातले कपडे फार फार तर दोन तीन वेळा वापरले आहेत.

 

 

हेमा यांनी आपल्या मैत्रिणींशी याबाबत चर्चा केली आणि सगळ्यांनी मिळून एक साडी लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सगळ्याजणींनी आपल्याकडचे पाच पाच उत्तम स्थितीतले पेहराव लायब्ररीला दान करायचे ठरवले आणि या उपक्रमाची सुरवात झाली.

आज या लायब्ररीत चारशेहून अधिक साड्या आहेत. सुरवातीला सहज म्हणून चालू केलेल्या या लायब्ररीस उत्तम प्रतिसाद मिळाला आणि २०२१ मध्ये एक व्यवसाय म्हणून याला चालविलं जाऊ लागलं.

आज अष्ट सहेली लायब्ररीत, कांजीवरम, बनारसी, कोटा, बांधणी पासून शिफ़ॉन, सिल्क, जॉर्जेटच्या डिझायनर अशा चारशे साड्यांचा संग्रह आहे. याव्यतिरीक्त ३० चनिया चोळी आणि ६० पलाजो, लेहंगा, ब्लाऊज असे इतर पारंपारीक पेहराव आहेत.

आजवर शंभरहून अधिक स्त्रियांनी या लायब्ररीतून साड्या नेल्या आहेत. घरचे व्याप सांभाळून या सगळ्याजणी ही लायब्ररी चालवितात. या अष्ट सहेलीचा एक ऑनलाईन ग्रुपही आहे, ज्याचे १३०० सदस्य आहेत.

 

 

आज बडोदाच नाहीतर मुंबई दिल्लीहूनही त्यांच्याकडे उत्तम स्थितीतल्या कपड्यांचा ओघ चालू आहे. सदस्यांकडून जे पाचशे रुपये घेतले जातात त्यात प्रामुख्यानं साडी/ ड्रेसचं ड्रायक्लिन, पॉलिशिंग या खर्चाचा समावेश आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version