Site icon InMarathi

काँग्रेसच्या ४० % महिला उमेदवारीच्या अजेंड्यावरून दिग्गज नेते पक्ष सोडत आहेत

up im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या देशात ओमिक्रोन कोरोनपेक्षा एका मुद्द्याची सर्वात जास्त चर्चा होत आहे तो मुद्दा म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका! निवडणूका लागल्या की सर्वात  मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे तिकीट वाटपाचा, त्यावरून पक्षातील लोकांची नाराजी अशा गोष्टी होतच राहतात.

गोव्यात मनोहर पर्रीकरांच्या मुलाला म्हणजे उत्पल पर्रीकरला भाजपने तिकीट नाकारल्याने तो आता अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणार आहे, भाजप म्हणजे मनोहर पर्रीकर असं गोव्यात समीकरण असताना त्यांचाच मुलाला तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

 

 

गोव्यात इतर पक्ष देखील हात पाय पसरत आहेत तर तिकडे काँग्रेस आपल्या लाडक्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये आपल्याच एका धोरणामुळे चिंतेत पडली आहे नेमकं काय घडतंय चला तर मग जाणून घेऊयात…

 

 

उत्तर प्रदेश भारतातील असं एक राज्य ज्या राज्यांच्या निवडणुकांचा परिणाम देशाच्या राजकारणावर होताना आपण बघत आलो आहोत. खुद्द नरेंद्र मोदी गुजरातचे असून सुद्धा त्यांनी आपली निवडणूक उत्तर प्रदेशमधून लढवली होती आणि जिंकून सुद्धा आले होते, तर अशा या उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. भाजपला सत्तेत घालवण्यासाठी विरोधक चांगलेच एकवटले आहेत.

 

 

समाजवादी पार्टी हा एक प्रबळ विरोधी पक्ष जरी असला तरी काँग्रेसने देखील आपली फळी उभी करायला सुरवात केली आहे, ‘लडकी हु खुद लढ सकती हु’ असा नारा काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी दिला आहे, त्यांनुसार आता निवडणुकांमध्ये ४०%  महिलांना तिकीट वाटप केले जात आहे.

नुकतंच काँग्रेसने आपली उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे, ८९ उमेदवारांच्या यादीत एकूण ३७ महिला आहेत आधीच्या यादीत १२५ पैकी ४१ महिला आहेत, त्यामुळे एकूणच २५५ उमेदवारांपैकी १०५ महिला आहेत. यातील तीन जागांमध्ये बदल करण्यात आल्याने तिघांनी पक्ष सोडला आहे.

 

दिग्गज नेत्यांनी सोडला पक्ष :

प्रियांका गांधींनी जरी महिला सबलीकरणाचा मुद्दा घेतला असला तरी त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील अनेक दिग्गज मंडळी पक्ष सोडून चालले आहेत. माजी आमदार आणि प्रियांका गांधींचे सल्लागार गयादिन तिवारी आणि महोबोचे ज्येष्ठ नेते मनोज तिवारी यांनी काँग्रेस पक्ष सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे कानपुर ग्रामीण मतदार संघातून काँग्रेसचा मजबूत चेहरा मानले गेलेले माजी खासदार राजाराम पाल यांनी ही पक्ष सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे.

 

 

निवड समितीमध्ये पक्षपातीपण केला आहे असा आरोप सोडून गेलेल्या अनेक नेत्यांनी केला आहे. उमेदवारांच्या पारदर्शकतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. लडकी हु खुद लढ सकती हु या कॅपेनची पोस्टर गर्ल प्रियांका मौर्य असं म्हणाली की ‘पक्ष ओबीसी उमेदवारांच्या विरोधात पक्षपातीपणा करत आहे’. त्यामुळे तिने पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे . मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी आतापर्यंत १८ % मुस्लिम लोकांना तिकीट दिले आहे.

 

 

तीन दशकांपासून काँग्रेस उत्तरप्रदेशच्या सत्तेपासून दूर आहे, २०१७ च्या विधानसभा आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाने आता निवडणुकांची सूत्र प्रियांका गांधींकडे आली आहेत, याआधी राहुल गांधी प्रभारी होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बहिणीचा महिला सबलीकरणाचा मुद्दा यशस्वी होणार का? हे निवडणुकीनंतर कळेलच….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version