Site icon InMarathi

टेलिफोन बूथवर काम करणाऱ्या या तरुणाच्या सिनेमांचे रिमेक करून बॉलिवूड भरतंय पोट!

vijay final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ओम शांती ओम मधे शाहरूख खानच्या तोंडी एक संवाद आहे, “अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात तुमसे मिलाने की कोशीश में लग जाती है” बॉलिवुडमधे साक्षात बादशहा शाहरूख खानसह अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांचा सुपरस्टारपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

कोणे एकेकाळी हे लोक चित्रपटात हिरो बनतील, गेला बाजार किमान अभिनय करतील असं सांगितलं तर खरंही वाटू नये मात्र पुढे जाऊन नियती यांना त्यांच्या स्वप्नांचं आणि ती खरी करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचं योग्य फ़ळ देते. अशाच एका थक्क करून सोडणार्‍या प्रवासाचं नाव आहे विजय सेतुपती. दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार.

 

 

आपल्या अनेकोत्तम चित्रपटांनी फ़ॅन्सना वेड लावणारा विजय ९६ या चित्रपटानंतर देशभरातल्या चित्रपट रसिकांना आवडू लागला. आज चाळीशीत असणार्‍या पिढीचा नॉस्टेलजिया असणारा हा चित्रपट म्हणजे एकदम दिल के करीब प्रकरण आहे. विजय सेतूपतीची ओळख तेवढीच नाही. विजय निर्माता, गीतकार, संवाद लेखकही आहे. मात्र हा रूपेरी प्रवास सुरू होण्यापूर्वी त्यानं अनेक छोटी मोठी कामं केली.

एक साधं सामान्य आयुष्य जगणार्‍या विजयचं स्वप्न मात्र रूपेरी दुनियेत येण्याचं होतं. विजय सेतूपती यांचा जन्म १६ जानेवारी १९७८ मधे तामिळनाडूमधील राजापलायम येथे झाला. त्याचं शिक्षण एमजीआर उच्च माध्यमिक विद्यालय, चेन्नई येथे झालं. शिक्षणात तसा साधारण असणार्‍या विजयनं छोट्या मोठ्या नोकर्‍या केल्या.

 

 

सेल्समन, कॅशियर आणि टेलिफ़ोन बुथ ऑपरेटर अशा छोट्या नोकर्‍याही त्यानं केल्या. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर अकाऊंटट म्हणून नोकरीला लागला. विजयला तीन भावंडं आहेत. कुटुंबाची आर्थिक चणचण भागविण्यासाठी त्यानं दुबईला जाऊनही नोकरी केली.

दुबईतल्या नोकरीत तो रमला नाही आणि भारतात परतला. भारतात आल्यावर एका मित्रासोबत त्यानं इंटिरियर डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर तो एका मार्केटिंग कंपनीत रुजू झाला. दुबई वास्तव्यात त्याला अभिनयात रुची निर्माण झाली आणि भारतात परतल्यानंतर कुठेतरी तो विचार मना घर करून होता. अखेर २००६ मधे त्यानं थिएटर जॉईन केलं.

 

 

सुरवातीला त्याला छोट्या भूमिकाच मिळाल्या मात्र त्यानं चिकाटी सोडली नाही. त्यानंतर काही टिव्ही शो आणि शॉर्ट फ़िल्म केल्या. खूप संघर्षानंतर २०११ साली त्याला त्याच्या करियरमधली सर्वात मोठी संधी मिळाली. त्याच्या पहिल्याच चित्रपटानं , थेनमुर्क परुवकत्रु , त्याला तीन राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी बनविलं. रातोरात तो बड्या सितार्‍यांच्या रांगेत जाऊन बसला. २०१२ विजयसाठी अत्यंत भाग्याचं ठरलं. त्यावर्षी विजयचे जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले, सगळ्यांनी प्रचंड यश मिळविलं.

 

 

आतापर्यंत विजय सेतुपतीचे केवळ ३० चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत मात्र अल्पावधीतच साऊथचा सुपरस्टार बनला. एकेकाळी टेलिफ़ोन बुथवर काम करणार्‍या या मुलाची चित्रपटाची साईनिंग अमाऊंटच काही कोटीत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version