Site icon InMarathi

या ५ पाण्याच्या बाटल्यांची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील!

costly water IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पाणी’ ही इतकी सहज आणि आवश्यक गोष्ट आहे की कुणी आपल्या घरी आलं की पाणी भरलेला पेला आपण लगेच पाहुण्यांच्या हाती देतो. काही वर्षांपूर्वी पाणी हे सीलबंद बाटलीमध्ये दुकानांतून विकत मिळेल असं जर कुणी म्हंटल तर त्याला वेड्यात काढल असत.

कारण नैसर्गिक स्त्रोतातून येणारं पाणी विकत का बरं कुणी घेईल असा प्रश्न होता. मिनरल वॉटरच्या लेबल खाली अनेक कंपन्यांनी ग्राहकांना ‘बाटली मध्ये उतरवलं’ म्हणजेच बाटलीबंद पाणी विकण्यात यशस्वी झाल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता हे कुठे सवयीचं होतंय तर नवीन फॅड आल आहे. आपला लाडका क्रिकेटर विराट कोहली हा ब्लॅक वॉटर पितो आणि ते पण थेट फ्रान्स मधून मागवलं जातं.

 

 

अनेकांना माहीत नाही, पण विराट कोहली फक्त एव्हियन नॅचरल स्प्रिंगवॉटर पिण्यासाठी वापरतो. हे १००% नैसर्गिक पाणी आहे आणि त्यात कोणतीही दूषित रसायने मिसळलेली नसतात. यासाठी विराट कोहलीला वार्षिक ४.३ लाख रुपये (अंदाजे) एवढा खर्च येतो.

बापरे! हे पाणी पृथ्वीतलावरील सर्वात महाग पाणी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. आम्ही तुम्हाला यापेक्षाही अधिक महाग बाटलीबंद पाण्याबद्दल सांगणार आहोत.

पण गंमत अशी आहे की नाकापेक्षा मोती जड या म्हणीप्रमाणे खरंतर पाण्यापेक्षा बाटलीची किंमत जास्ती आहे. कारण ही बाटली साधीसुधी नसून चक्क सोने, हिरे यांनी मढवलेली आहे.

१. बेव्हरली हिल्स 9OH2O –

 

 

या लक्झरी कलेक्शनची डायमंड एडिशन ही जगातील सर्वात महागड्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये आहे. या बाटलीवर उत्कृष्ट असे पांढरे हिरे तसेच १४ कॅरेटचे २५० पेक्षा जास्त काळे हिरे आणि वर सोन्याची कॅप लावलेली आहे.

तसेच विदेशी झऱ्यातील आरोग्यदायी पाणी त्यामध्ये भरले असून ६० लाख रुपये एवढी त्याची किंमत आहे.

२. ॲक्वा दी ख्रिस्टेलो ट्रिब्युटो ए मोडिग्लियानी –

 

या कंपनीची बॉटल साधारण ४४ लाख किमतीची असून २०१० मध्ये सर्वात महागडी पाण्याची बाटली अशी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. ही २४ कॅरेट सोन्याची बाटली असून यामध्ये फिजी आणि फ्रेंच येथील स्प्रिंग वॉटर तसेच आइसलॅंड मधील हिमनदीतील पाणी टाकले जाते.

३. ब्लिंग H20 –

 

 

ही कंपनी दक्षिण कॅलिफोर्नियातील पालोमार पर्वतावरून पाणी आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने १० हजार बाटलींची लिमिटेड एडिशन काढली आहे. या ब्रँडचे पाणी पिण्यासाठी तुमच्या खिशाला मोठं छिद्र पडणार नाही कारण त्याची किंमत २ लाख रुपये इतकी आहे.

४. नेव्हास –

 

 

या यादीत स्टार्टअप असण्याची कल्पना कोणी करणार नाही, परंतु जर्मन-आधारित नेव्हास स्वतःसाठी एक मजबूत बेस बनवते आहे. २०१९ मध्ये अलीकडेच स्थापित झालेली ही जर्मन कंपनी प्रीमियम पाणी विकण्यासाठी सज्ज झाली आहे.

नेव्हास वॉटरच्या नियमित पाण्याच्या बाटल्यांची किंमत किरकोळ म्हणजे ८७९ रुपये आहे. परंतु, नेव्हास वॉटर्सला या यादीत आणणारी एक कल्पना आहे.

ती म्हणजे ,एका मोहक काळ्या बाटलीत पॅक केलेले, डिस्नेचे पात्र असलेल्या ग्लो-इन-द-डार्क मॅग्नमची वॉटर बॉटल. याची किंमत सुमारे 1.32 लाख रुपये आहे.

५. फिलिको –

 

 

ही एक स्वारोवस्की क्रिस्टल्स जडलेली पाण्याची बाटली असून फिलिकोला जपानमधील कोबे येथील नुनोबिकी स्प्रिंगमधून उत्कृष्ट पाण्याचा पुरवठा होतो. या ब्रँडद्वारे अनेक वेगवेगळ्या बाटल्या ऑफर केल्या जात असताना, फिलिको ब्लॅक क्वीन ही सर्वात लोकप्रिय आहे.

ही एक मॅट ब्लॅक फ्रॉस्टेड बाटली असून त्यावर ५७ स्वारोवस्की हिरे लावलेले आहेत. सुमारे ९०००० रुपये किंमतीच्या, फिलिको पाण्याच्या बाटलीमध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची पातळी जवळजवळ प्रत्येक इतर बाटलीतील पाण्यात एवढी असते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version