आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पावसाळ्यात शेतांमध्ये नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा खूप वापर केला जातो, तेव्हा त्यावर खूप दबाव पडतो. ज्यामुळे ट्रॅक्टर डिझेल खूप खाते परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात डिझेल वाचवू शकता.
ट्रॅक्टरची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि योग्य ते व्यवस्थापन केल्यास ट्रॅक्टरमध्ये डिझेलचा होणारा अपव्यय टाळता येऊ शकतो. जेव्हा कधी काही शंका असेल तेव्हा चांगल्या गॅरेजवाल्याकडून किंवा ट्रॅक्टर विक्रेत्याकडून ट्रॅक्टर नक्की तपासून घ्या.
डिझेल लीक होऊ देऊ नका
आपल्या ट्रॅक्टरची रोज पडताळणी केली पाहिजे. प्रत्येक सेकंदाला एक थेंब जरी डिझेल पडत असेल तर प्रत्येक वर्षी २००० लीटर डिझेलची नुकसानी होते.
चाकांवर लक्ष ठेवा
पाण्याचा जास्त भार टाकून किंवा लोखंडाच्या वजनाचा वापर करून ट्रॅक्टरच्या चाकांना घसरण्यापासून वाचवा. चाकांची घसरण कमीत कमी राहण्यासाठी योग प्रमाणातच वजनाचा भार टाका. शेतातील काम संपल्यानंतर जास्तीचा भार काढून टाका. योग्यवेळी चाकांची री-लगिंग करून घ्या. टायरला परत चाकांवर चढवताना लक्षात ठेवा की समोरून बघितल्यावर वी ट्रेडोंचे टोक खालच्या बाजूला असले पाहिजे. रस्त्यासाठी आणि शेताच्या कामावेळी चाकांच्या हवेचा दबाव वेगवेगळा असला पाहिजे असा सल्ला दिला जातो.
ट्रॅक्टर वापरात नसेल तेव्हा इंजिन बंद करा
फ्यूल इंजेक्शन सिस्टमचा नियमित रुपात वापर करा.
नियमित वेळेत एयर फिल्टर साफ करा.
योग्य त्या गियरवर ट्रॅक्टर चालवा.
शेतात ट्रॅक्टर कसा चालवणार आहात त्याची योजना बनवा!
पहिल्यांदा आढावा घेऊन त्यानुसार नांगरणी करा. त्यामुळे विनाकारण इंजिन चालू ठेवण्याची वेळ कमी होईल आणि ट्रॅक्टरला सारखे इकडे–तिकडे करण्याची गरज भासणार नाही. जर तुम्ही लहान-लहान शेतांऐवजी मोठ्या व लांब शेतांमध्ये नांगरणी कराल तर डिझेलची बचत होईल. तुमचा सुरुवातीचा मार्ग सरळ आणि समांतर असला पाहिजे. बाजूच्या आणि वरच्या जमिनीला शेताच्या चारही बाजूंनी सारखे नांगरा. नांगरणी केलेले शेत परत नांगरू नका.
वजनावर लक्ष ठेवा
उपकरणांचा आकार आणि ट्रॅक्टर चालवण्याचा वेग तेवढाच ठेवा जो इंजिनच्या पॉवरशी मिळता जुळता असेल. वरच्या गियरवर चालवा परंतु ट्रॅक्टर मधून धूर निघू देऊ नका. जर तुमचा ट्रॅक्टर शेवटच्या गियरमध्ये ही पूर्ण वेगात पुढे जात असेल तर तुमचे उपकरण खूप छोटे आहे. एक मोठे उपकरण किंवा अधिक उपकरणांना एकत्र करून तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरच्या शक्तीचा पूर्ण उपयोग करता येईल आणि त्यामुळे डिझेलचा अपव्यय थांबवता येईल. जर तुम्ही आकारापेक्षा छोट्या उपकरणांचा वापर करता आहात किंवा कमी वेगात ट्रॅक्टर चालवत आहात तर इंधनाचा वापर ३० टक्क्यांनी वाढू शकतो.
तर मग या गोष्टी लक्षात ठेवा व इंधन आणि पैसा दोहोंची बचत करा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.