स्त्रियांच्या अंतर्वस्त्राबाबतची एक अशी गोष्ट, जी खुद्द स्त्रियांनाही माहित नसते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अंतर्वस्त्रांविषयी आपण सगळेच स्त्री-पुरुष गुप्तता पाळतो. त्याविषयी उघडपणे बोलणं तर सोडाच,अंतर्वस्त्रांशी निगडीत संज्ञांचा नुसता उच्चार करायलाही आपल्याला लाज वाटते. पण असं असली तरी स्त्री- पुरुष दोघांच्याही गुप्त अवयवांची स्वच्छता राखणं खूप गरजेचं असतं.
स्त्री-पुरुष दोघांच्याही शरीराची रचना गुंतागुंतीचीच असते. पण स्त्रीला मासिक पाळी येत असल्यामुळे, तिच्याकडे प्रजननाची क्षमता असल्याने तिचं शरीर थोडं अधिक गुंतागुंतीचं असतं. तिच्या गुप्त अवयवांची तिला तुलनेने अधिक काळजी घ्यावी लागते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बहुतेक स्त्रियांना कधी ना कधी तरी युरीन इन्फेक्शन झालेलं असतं. खालच्या भागाच्या आसपासची पायाकडली त्वचा घामामुळे, घर्षणामुळे घासली गेलेली असते. पण आपल्याला अधूनमधून बेचैन करणाऱ्या याच त्रासांपासून आपल्या गुप्त भागाचं संरक्षण व्हावं म्हणून स्त्रिया घालतात त्या निकरमध्ये एक सोय आधीच करून ठेवलेली असते हे कदाचित आपल्यातल्या अनेक स्त्रियांना माहीतही नसते.
आपल्या निकरमध्ये दोन्ही पायांच्या मधल्या भागात खिश्श्यासदृश्य एक दुहेरी कापड असतं. आपला अतिसंवेदनशील गुप्त भाग सुरक्षित राहावा यासाठी ते तश्या पद्धतीने तयार केलेलं असतं. या खिश्श्यासदृश्य दिसणाऱ्या दुहेरी कापडासाठी ‘गसेट’ अशी इंग्रजी संज्ञा वापरली जाते.
बऱ्याचदा स्त्रियांची निकर लेससारख्या सिंथेटिक कापडांपासून बनलेली असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ती दिसायला जरी छान दिसत असली तरी सिंथेटिक कापडामुळे खालच्या भागात हवा खेळती राहत नाही. त्यामुळे तिथल्या भागात पटकन जंतूंची निर्मिती होऊ शकते आणि घामही येतो.
निकरच्या मधल्या भागात हे ‘गसेट्स’ म्हणूनच असतात. बाकी निकर जरी सिंथेटिकसारख्या कापडाची असली तरी तिच्या आतलं मधलं ‘गसेट’ हे बहुतेक वेळा कॉटनचंच असतं. त्यामुळे खालच्या भागात हवा खेळती राहायला मदत होते.
आतल्या भागाला हवा लागत राहून तो भाग कोरडा राहतो. या ‘गसेट’ मुळे मुत्राशयाशी निगडीत संसर्गाचा धोकाही बऱ्याच प्रमाणात टळतो. निकरच्या सिंथेटिक कापडामुळे आपल्याला आरामशीर वाटेलच असं नाही. किंबहुना, ते तसं वाटतंच नाही. पण या मऊसूत ‘गसेट’मुळे आपल्याला खालच्या भागात बरं वाटतंच. शिवाय, त्यामुळे आतल्या भागाचं घर्षणही होत नाही.
आपल्या फॅन्सी, सिंथेटिकच्या निकर्सना असं कॉटनचं ‘गसेट’ असलं तरी आपला भर शक्यतो पूर्णत: कॉटनच्या असलेल्या निकर्स घालण्यावर असला पाहिजे. मुळात कॉटनच्या नसलेल्या निकरला जे कॉटनचं गसेट असतं त्यामुळे आपल्या खालच्या भागाचं संरक्षण होतंच. पण संपूर्ण कॉटनची असलेली निकर घालणं आपल्यासाठी केव्हाही अधिक फायदेशीर ठरू शकतं.
तुम्ही दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामात सक्रिय असाल तर निकरच्या सिंथेटिक कापडामुळे तुम्हाला गुप्त भागात घाम येण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही जिमला किंवा धावायला जात असाल तर सिथेंटीक कापडामुळे खालच्या भागात जळजळ आणि इन्फेक्शन होऊ शकतं. हे टाळायचं असेल आणि त्यातही जर तुम्हाला खालच्या भागात जंतूंचा संसर्ग अधिक होत असेल तर तुम्ही कॉटनचीच निकर वापरली पाहिजे.
फॅन्सी, सिंथेटिक निकरच्या, ‘व्हीक्टोरिया सिक्रेट’च्या अंतर्वस्त्राच्या तुलनेत कॉटनची निकर दिसायला जरी फारशी आकर्षक नसली तरी यीस्ट इन्फेक्शन होण्यापेक्षा ती वापरणं केव्हाही बरं!
हे सगळं जाणून घेतल्यावरही जर स्त्रियांना कॉटनची निकर वापरायची नसेल तर कॉटनच्या नसलेल्या पण गुप्तांगाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असलेल्या निकर्सचे पर्यायही त्यांच्याकरता उपलब्ध आहेत.
डॉ. मेलिसा पिलिआंग यांनी ‘हेल्थ’ला दिलेल्या माहितीनुसार, “पॉलीइस्टर, नायलॉन, लिक्रा किंवा स्पॅन्डेक्सपासून बनलेल्या निकर्स आवश्यक तितक्या व्यवस्थित ताणल्या जातात आणि त्यांचं खालचं कापडही कॉटनच्या नसलेल्या इतर निकर्सपेक्षा चांगलं असतं. त्यांच्याही मधल्या भागात कॉटनचं ‘गसेट’ असतं.” तुम्ही जर खालचा भाग पूर्णपणे न झाकणाऱ्या त्रिकोणी आकाराच्या तोकड्या निकर्स वापरत असाल तर एक गोष्ट लक्षपूर्वक धान्यात ठेवा. जर तुम्हाला इन्फेक्शनचा फारसा त्रास होत नसेल तर काही हरकत नाही. पण या अश्या निकर्समुळे खालच्या भागात जंतू फार पटकन पसरतात.
मासिक पाळीदरम्यान या अश्या निकर्स घातल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. मासिक पाळीदरम्यान जो स्त्राव बाहेर टाकला जातो त्यादरम्यान योनीत ‘पीएच’ हा द्रवपदार्थही वाढतो. त्यामुळे जंतूंची निर्मिती होण्याची आणि जंतू वाढण्याची शक्यता अधिक दाट होते. या अश्या निकर्समुळे तुमच्या खालच्या भागातली अतिसंवेदनशील त्वचा घासटली जाते आणि प्रसंगी मुळव्याधासारखी गंभीर समस्याही उद्भवू शकते.
मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्स वापरल्यामुळेदेखील अनेक स्त्रियांची खालच्या भागातली त्वचा घासटली जाते आणि तिथे जंतुसंसर्ग होतो. निकर्सच्या मधल्या भागात असलेलं कॉटनचं गसेट मासिक पाळीदरम्यानही फायद्याचं ठरतं.
या पुढे प्रत्येकवेळी निकर वापरताना स्त्रिया ही एवढे दिवस माहीत नसलेली गोष्ट नक्की लक्षात ठेवतील. रोजच्या रोज आपली गुप्तांगं आणि अंतर्वस्त्र स्वच्छ ठेवून आता आपण आधीपेक्षाही अधिक सजगतेने अंतर्वस्त्रांची निवड करू आणि खालच्या भागात होणारी जळजळ आणि इन्फेक्शन्स ओढवून घेणं टाळू.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.