Site icon InMarathi

अब्जावधींची संपत्ती तरीही २ खोल्यांच्या घरात राहणारा रतन टाटांचा भाऊ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एक भाऊ यशाच्या गगनाला भिडतो आहे तर, दुसरा सामान्य माणसाचं आयुष्य जगतो आहे, हे दृश्य तुम्ही आतापर्यंत फक्त सिनेमांमध्येच बघितले असतील. अंबानी कुटूंब हे अगदी सध्याच्या काळातील ताजं उदाहरण! एका भावाने जगातील श्रीमंतांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले मात्र त्याचवेळी दुसऱ्या भावाने दिवाळखोरी जाहीर केली.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

परंतु भारतातील आणखी एक परिवारामध्ये याच प्रकारची परिस्थिती दिसून येतीय. एक भाऊ भारतातील सर्वात मोठा उद्योजक आहे तर दुसरा भाऊ हा कुलाबा येथील २ खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये साधेपणाने जीवन जगत आहे.

कदाचित या कुटुंबांचं नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल, मात्र ही गोष्ट घडतीय ‘टाटा’ उद्योगसमुहातील दोन भावांबाबत! बसला ना धक्का? केवळ उद्योग क्षेत्रच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारे रतन टाटा यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमान आहे. या नावाला जगात कोणी ओळखत नाही असं होऊच शकत नाही.

 

livemint.com

 

रतन टाटा यांची आज एक यशस्वी उद्योजक म्हणून जगभर ख्याती आहे. रतन टाटा हे नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतातच म्हणा. टाटा उद्योग समूहाचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळेच त्यांची किंवा त्यांच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाची लाइफस्टाइल ही खूपच हायप्रोफाइल असेल, असं आपल्याला वाटते.

एखाद्या बड्या कुटुंबातील सेलिब्रिटींचे आयुष्य कसे असेल? याबद्दल प्रत्येकालाच आकर्षण असते. सेलिब्रिटी काय खातात? घरी कसे वागतात? त्यांच्या आवडीनिवडी, सवयी काय आहेत? याबद्दल माहिती घेणे प्रत्येकालाच आवडते. त्यानुसार आपली मतमतांतरेही असतात. त्यामुळे अब्जावधींची संपत्ती असलेल्या टाटा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही ‘उंची’ आयुष्य जगत असेल असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा हे अवघ्या दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात. जिमी टाटा यांच्या साधेपणाची कहाणी वाचून तुम्हीही त्यांचे चाहते होऊन जाल.

 

 

 

तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की १०० पेक्षा जास्त कंपनीची मालकी असणाऱ्याच्या भावाकडे साधा मोबाईल सुद्धा नाही. कुलाबा येथे दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहून ते खूप साधे जीवन जगत आहेत.

मीडियापासून दूर राहिल्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल खूपच कमी माहिती आहे. त्यांना लिखाणाची आवड आहे. तसेच जिमी आणि रतन टाटा यांच्या हस्ताक्षरमध्ये खूप साम्य आढळून येते.

 

शब्दांनी नव्हे तर कृतीतून अपमानाची परतफेड कशी करावी हे सांगणारी टाटांची ही कथा

अब्जाधीशाचा दिवाळखोर भाऊ! अनिल अंबानींच्या चुका तुम्ही समजून घ्यायला हव्या!

काही दिवसांपुर्वी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या चित्रांमध्ये त्यांची साधी राहणी हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या घरातही अगदी मोजके सामान असल्याचेही या फोटोंतून समोर आले होते.

रतन टाटा प्रमाणेच जिमी टाटा देखील अविवाहित आहेत. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी काही दिवसांपुर्वी ट्विट करून रतन टाटा यांच्या भावाची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये जिमी टाटा यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘तुम्हाला रतन टाटा यांचा धाकटा भाऊ जिमी टाटा यांच्याबद्दल माहिती आहे का, जो मुंबईतील कुलाबा येथे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना व्यवसायात कधीही रस नव्हता पण ते एक उत्तम स्क्वॅशपटू होते आणि ते प्रत्येक वेळी मला हरवत होते’.

 

 

 

जिमी टाटा हे रतन टाटा यांचे धाकटे भाऊ आहेत तर नोएल टाटा हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत. ९० च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले. ते टाटा समूहातील कंपन्यांचे भागधारक (Shareholder) आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. १९८९ मध्ये त्यांचे वडील नवल यांच्या निधनानंतर जिमीला हे पद मिळाले होते. त्यांनी आपल्या करियर ची सुरूवात टाटा ग्रुपच्या माध्यमातून कापड व्यवसायाद्वारे केली होती.

मात्र सध्या ते कोणत्याही व्यवसायाशी निगडित नसून केवळ आपले छंद जोपासतात.

टाटा आडनाव असूनही प्रसिद्धीपासून दूर असणारा, भावाच्या संपत्तीसाठी न भांडता केवळ आपले छंद जोपासणारा, संपत्ती, मालमत्ता यांच्यातील वादापेक्षा ‘साधी राहणी’ हा विचार आत्मसात करणारा हा अवलिया अनेकांसाठी आदर्श ठरतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version