आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोरोना आला आणि कित्येक उद्योगांचं नुकसान झालं हे आपण ऐकलंच आहे, पण भारतीय वैद्यकीय क्षेत्राचं चित्र जरा वेगळं आहे. २०२० मध्ये ‘आत्मनिर्भर’ हा शब्द भारतात प्रचलित झाला आणि भारतीय वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांती झाली असं म्हणता येईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘कोविशील्ड’, ‘कोवॅक्सिन’ या कोरोना लस भारतात तयार होणं हे सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपनीचं आणि पर्यायाने भारतीय वैद्यकीय क्षेत्राचं मोठं यश आहे.
वॅक्सिन घेतल्यानंतर अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून ‘डोलो ६५०’ ही गोळी कित्येक लसीकरण केंद्रावर दिली जाते. अंगदुखी, कणकण, हलका ताप यांच्यावर रामबाण उपाय म्हणून प्रचलित झालेली ही गोळी सुद्धा भारतीय आहे हे विशेष.
कित्येक वर्षांपासून प्रस्थापित आणि लोकांच्या तोंडावर नाव असलेल्या ‘क्रोसिन’, ‘पॅरासीटामॉल’ आणि ‘कॉम्बिफ्लाम’ सारख्या गोळ्यांना मागे टाकून आपल्या भारतीय ‘डोलो ६५०’ने ही स्पर्धा खूप मोठ्या फरकाने जिंकली आहे.
‘मायक्रोलॅब्स लिमिटेड’ या बँगलोरच्या कंपनीत ही गोळी तयार होते आणि जगभरात निर्यात होते. कोरोनाच्या आधी ही गोळी कोणालाच माहीत नव्हती आणि आज ही गोळी घराघरात पोहोचली आहे.
थोडी जरी कणकण असली तरी आज लोक ‘डोलो’ एखाद्या स्नॅक्स सारखी घेतात आणि पूर्ववत कामाला लागतात. नोकरदार व्यक्तींची विशेष करून आवडती असलेल्या या गोळीची मार्च २०२० पासून ५७० कोटी गोळ्या इतकी विक्रमी विक्री झाली आहे.
‘डोलो ६५०’ ही गोळी कधी अस्तित्वात आली? इतकी प्रसिद्ध कशी झाली? जाणून घेऊयात.
‘डोलो ६५०’ या औषधी गोळीमुळे मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने मार्च २०२० पासून ५६७ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल केली आहे.
एकट्या भारतात अंगदुखी थांबवण्यासाठी ३७ गोळ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. डोलो ६५० च्या खालोखाल ‘कॅलपॉल’ आणि ‘सुमॉल’ या गोळ्यांचा क्रमांक आहे. ‘कॅलपॉल’ ही सुद्धा भारतात ‘जीएसके फार्मास्युटीकल्स’ या कंपनीत तयार होते.
डोलो ६५० मध्ये असलेले गुणधर्म हे सर्व वयातील लोकांना लागू पडणारे आहेत. ६५० एमजी इतक्या क्षमतेची असलेली ही गोळी शरीरात कमी उष्णता निर्माण करणारी आहे.
क्रोसिनची क्षमता सारखीच असूनही काही व्यक्तींना त्यापासून उष्णतेचा त्रास होत असल्याने क्रोसिन ही गोळी डॉक्टर आता लिहून देत नाहीत. शिवाय, ज्या व्यक्तींना हृदयाचे किंवा किडनीचे किंवा मधुमेहासारखे आजार आहेत, त्यांना सुद्धा डोलो ६५० मुळे कोणता त्रास होत नाही असं त्याच्या निर्मात्यांनी सिद्ध केलं आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ताप, खोकला, घसा खवखवणे आणि अंगदुखी हे चार लक्षणं आहेत ज्यापैकी खोकला सोडून इतर तिन्ही लक्षणांना डोलो मारक ठरल्याचं लोकांनी मान्य केल्याने सुद्धा डोलोचं नाव हे ‘बिसलेरी’ किंवा ‘झेरॉक्स’ सारखं लोकप्रिय होत आहे.
“दुखणं कमी होईल आणि नवीन दुखणं सुरू होणार नाही हा विश्वास एखाद्या गोळी बद्दल लोकांच्या मनात बसला, की ती गोळी ही लोकांना मान्य होते” असं मत महाराष्ट्र राज्य ड्रगीस्ट अँड केमिस्टचे जनरल सेक्रेटरी अनिल नावंदर यांनी डोलो ६५० बद्दल बोलतांना व्यक्त केलं आहे.
मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीची स्थापना १९७३ मध्ये बँगलोर येथे सी.जी.सुराणा यांनी केली होती. कंपनी सुरू करण्यापूर्वी श्री. सुराणा हे औषधी वितरक होते. आज त्यांचा मुलगा दिलीप सुराणा हे मायक्रोलॅब्स लिमिटेडचे प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
—
- कोरोना- ओमिक्रोनवर औषध म्हणून मोलानुपिराविर गोळी, हे नक्की आहे तरी काय?
- लग्नसराईसाठी मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर…
—
मायक्रोलॅब्स लिमिटेडच्या इतर गोळ्यांमध्ये कार्डीओलॉजी, डायबिटीज आणि डर्मीटॉलॉजी सारख्या वैद्यकीय शाखांसाठी औषधांची निर्मिती करतात. डोलो ६५० च्या व्यतिरिक्त ‘अँमलॉंग’ ही गोळी सुद्धा लोकप्रिय आहे जी की अतिरक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर लिहून देत असतात.
मायक्रोलॅब्स लिमिटेडचा वार्षिक टर्नओव्हर २७०० कोटी रुपये इतका आहे ज्यामध्ये ९२० कोटी रुपये इतक्या निर्यातीचा समावेश आहे. मायक्रोलॅब्स मध्ये सध्या ९२०० कर्मचारी काम करतात.
डोलो ६५० ची लोकप्रियता बघून कंपनीने सध्या सोशल मीडियावर मिम्स फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे, ज्याला लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे.
२०१९ पासून २०२२ पर्यंत आपली उत्पादन, वितरण क्षमता दुप्पट करणाऱ्या आणि लोकांना कार्यक्षम राहण्यासाठी मदत करणाऱ्या ‘डोलो ६५०’च्या निर्मात्यांचे खूप आभार आणि पुढील प्रगतीसाठी खप शुभेच्छा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.