आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक मानले जाते. राष्ट्राची शान, राष्ट्राची ओळख म्हणजे राष्ट्रध्वज होय. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा मान राखणे सर्वांनीच अपेक्षित आहे. आपल्याच काय तर इतर राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजाचा मान देखील सुसंस्कृत लोक ठेवतात.
राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वाभाविकपणे येतो. खास करून २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी तर लोकांच्या अंगात कधी नव्हे ते अतिरेकी राष्ट्रभक्ती संचारते.
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवादरम्यान अनेक तरुण आणि वृद्ध झेंडे फडकवताना आणि नंतर ते कचऱ्याच्या डब्यात टाकून देताना आपण बघतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा अपमान करणे हा गुन्हा आहे. भलेही तुम्ही नकळत कुठ्ल्यातरी बेजबाबदार वागण्यातून राष्ट्रध्वजाचा अपमान केला असेल तरीही तो गुन्हाच ठरतो. कुठलाही सर्वसामान्य नागरिक राष्ट्रध्वजाचा मानच ठेवतो.
पण काही डोक्यात हवा गेलेली माणसे मात्र कसलेही भान न ठेवता बेजबाबदार वर्तन करून राष्ट्रध्वजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचाही अपमान करतात.
राष्ट्रध्वजाचा आदर हा फक्त या दोन खास प्रसंगांपुरता आणि काही तासांपुरता मर्यादित आहे का? पालकांनीच आपल्या मुलांना तिरंग्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.
भारतीय ध्वजाशी अनेक भावना जोडलेल्या आहेत. त्याचा अनादर केल्याने तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. भारतात असेही काही सेलेब्रिटी आहेत ज्यांनी कळत नकळत राष्ट्रध्वजाचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांना प्रचंड रोषाला व कारवाईला सामोरे जावे लागले.
सानिया मिर्झा :
–
- भारताच्या राष्ट्रध्वजात रंग भरणाऱ्या या अनामवीराची पुढे झालेली दुर्दशा मनाला चटका लावून जाते
- काँग्रेस पक्षाची नियमावली: खादीचे कपडे परिधान करणे, दारू ड्रग्ससारख्या व्यसनांपासून दूर राहणे
–
काही वर्षांपूर्वी टेनिस स्टार सानिया मिर्झाचा भारतीय ध्वजाच्या शेजारी असलेल्या टेबलवर अनवाणी पाय ठेवलेला फोटो काढण्यात आला होता. भारताचे नाव अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या सानियावर मीडिया आणि तिच्या चाहत्यांनी जोरदार टीका केली होती.
सानियाचे हे कृत्य भारतीय ध्वजाचा अनादर करणारे होते असे अनेकांचे मत होते. टीकेला सामोरे जावे लागल्यामुळे तिने राष्ट्रध्वजाबद्दल असलेला तिचा आदर दाखवण्यासाठी टेनिस खेळणे सोडून देण्याचा विचारही केला होता.
मालिनी रमाणी :
राष्ट्रध्वाचा अपमान केल्याच्या प्रकरणामुळे २००० साली डिझायनर मालिनी रमाणी देखील अडचणीत आली होती. तिने एका कार्यक्रमासाठी स्वतःचे डिझाईनिंगचे कौशल्य दाखवण्यासाठी चक्क फ्लॅग ड्रेस घातला होता.
तिच्या ड्रेसच्या डिझाईनमध्ये तिने केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या आडव्या पट्ट्याचा वापर केला होता तसेच निळ्या रंगाच्या चक्राचा वापर केला होता.
हे डिझाईन आपल्या तिरंग्याचेच आहे. राष्ट्रध्वज पोषाखासारखा वापरणे अत्यंत चूक आहे. तो राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. ह्यामुळेच मालिनी रमाणीवर जोरदार टीका झाली होती.
शाहरुख खान :
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खानला देखील कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याचा एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यात आला होता ज्यात त्याच्या हातून राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
म्हणून पुणे पोलिसांनी शाहरुख खानवर गुन्हा दाखल केला होता.जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव रवी ब्रह्मे ह्यांनी ह्या प्रकरणात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची तक्रार केली होती.
मंदिरा बेदी :
अभिनेत्री आणि होस्ट मंदिरा बेदीने अनेक देशांचे राष्ट्रध्वजांचे प्रिंट असलेली साडी नेसली होती. तिच्या ह्या साडीमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. एका क्रिकेट सामन्याचे आयोजन करताना मंदिरा या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व देशांचे राष्ट्रध्वज असलेली साडी नेसलेली दिसली.
तिच्या त्या साडीवर तिच्या गुडघ्याच्या खाली तिरंग्याची एक प्रतिमा होती. हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे. तिच्या ह्या बेजबाबदार कृतीमुळे अनेकजण संतप्त झाले होते.
मल्लिका शेरावत :
अभिनेत्री मल्लिका शेरावत ही कॉंट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले जाते. तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच ती बऱ्यावाईट गोष्टींसाठी लाइमलाईटमध्ये राहिली आहे. मल्लिका शेरावत आणि कॉंट्रोव्हर्सी हे समीकरणच झाले आहे.
२०१५ साली आलेल्या तिच्या एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तिने तिरंग्याचा वापर करून स्वतःवर रोष ओढवून घेतला. मल्लिका शेरावतीने तिच्या “डर्टी पॉलिटिक्स” च्या पोस्टरमध्ये अंगावर तिरंगा घेतला आहे आणि तिच्या अंगावर कपड्यांऐवजी फक्त ध्वजच आहे असे पोस्टरमध्ये दाखवले आहे.
राष्ट्रध्वजाचा वापर अश्या प्रकारे करणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान करणेच आहे. तिच्या ह्या कृतीमुळे राजस्थानमधील एका राजकीय पक्षाने तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवत तिचा तीव्र निषेध केला होता.
अभिनेत्री प्रीती झिंटाने एका मॅचच्या दरम्यान तिरंगा असलेला हॅन्डफॅन वापरला होता. राष्ट्रध्वज असा पंख्यासारखा वापरणे अत्यंत चुकीचे आहे.
तसेच महानायक म्हणवल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन ह्यांनी देखील २०११ साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच्या उत्साहात राष्ट्रध्वज शालीसारखा अंगावर लपेटून घेत राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता.
स्वयंघोषित देवी आणि सहज योगाच्या संस्थापक असलेल्या माताजी निर्मला देवी यांच्यावर भारतीय ध्वजाचा अपमान केल्याबद्दल प्रचंड टीका झाली होती.निर्मला देवी त्यांचे पती, माजी आयएएस अधिकारी यांच्या शेजारी बसून भारतीय ध्वजावर पाय ठेवत असल्याचे चित्र प्रसारित झाले होते.
हे सेलेब्रिटी देशापेक्षा मोठे नाहीत हे जेव्हा त्यांना आणि त्यांच्या व्यक्तिपूजक चाहत्यांना कळेल तेव्हाच राष्ट्रध्वजाचा असा वारंवार अपमान होणार नाही.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.