या गावाचं नाव तुम्ही बोलूही शकत नाही, सोशल मीडियावर लिहाल तर ब्लॉक व्हाल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आपले गाव म्हणजे आपली ओळख असते. आपल्या गावाचा आपल्याला इतका अभिमान असतो की आमचंच गाव जगात भारी म्हणून आपण इतरांशी तावातावाने भांडतो.
काही काही गावांची नावं अगदी ऐतिहासिक असतात. त्या नावांना मोठा इतिहास असतो. जसे की हस्तिनापूर, पाटलीपुत्र, द्वारका, कुरुक्षेत्र, हंपी वगैरे! काही गावांची नावं त्या गावांची वैशिष्ट्ये सांगतात.काही गावांची नावं इतकी विचित्र असतात विचित्र असतात, की त्या नावाचा उच्चार करायला सुद्धा लाज वाटते.
असेच एक गाव आहे ज्याचे नाव उच्चारायला सुद्धा लाज वाटते, आणि चुकून जर फेसबुकवर तुम्ही ह्या गावाचे नाव लिहिलेत, तर तुम्हाला ब्लॉक करण्यात येते. ह्या गावच्या रहिवाश्यांना सुद्धा स्वतःच्या गावाचे नाव घ्यायची लाज वाटते. येथील ग्रामस्थांनी या गावाचे नाव बदलण्याचा प्रयत्न देखील केला आहे, पण अजून तरी गावाचे नाव बदललेले नाही.
—
- महाभारतातील एका थरारक प्रसंगाची साक्ष देत हे गाव आजही उभं आहे!
- बापरे! या गावातील सगळेजण आहेत बुटके, वाचा एक न उलगडलेलं रहस्य…
—
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या गावाचे नाव Fucke असे आहे. सुसंस्कृत भाषेत आपण हा शब्द वापरत नाही किंवा हा शब्द असंस्कृत मानला जातो. शिवी म्हणून धरला जातो. म्हणूनच तो शब्द सार्वजनिकपणे बोलणे, लिहिणे चुकीचे मानले जाते. या शब्दाबद्दल सोशल मीडियावर सेन्सॉरशिप आहे. हे नाव लिहिल्यास तुमचा आयडीही ब्लॉक होईल.
स्वीडन देशात असणारे हे गाव तसे तर सुखी आणि शांत आहे. या गावातील रहिवाशी अत्यंत शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात त्यांचे जीवन जगतात. मात्र या गावच्या Fucke ह्या विचित्र नावामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. इच्छा असूनही आपण आपल्या गावाचे नाव सोशल मीडियावर लिहू शकत नाही किंवा अभिमानाने घेऊ शकत नाही हे इथल्या रहिवाश्यांचे दुःख आहे.
गावातील रहिवासी फेसबुकवर त्यांच्या गावाबद्दल लिहिताना सेन्सॉरशिपमुळे कंटाळले आहेत आणि आता या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून ते त्यांच्या नयनरम्य गावासाठी नवीन नाव मिळण्याची वाट पाहत आहेत. हे छोटेसे सुंदर गाव स्वीडनच्या हाय कोस्टवर वसलेले आहे आणि या गावाची लोकसंख्या सुद्धा खूप कमी आहे.
हे गाव स्वीडनमध्ये Fuckesjön (“Fucke Lake”) नावाच्या तलावाच्या काठावर वसलेले आहे. जरी ही नावे इंग्रजी भाषिकांच्या मते खिल्ली उडवण्यासारखी असली तरी, या गावाचे नामकरण सोळाव्या शतकातील आहे.
द इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अँड फोकलोर दाखवते, की या गावातील सर्वात जुने रेकॉर्ड १५४७ सालचे आहे. गावातील आत्ताच्या आधुनिक काळातील रहिवाश्यांना गावाच्या नावाशी प्रॉब्लेम आहे कारण ते फेसबुकवर जे काही पोस्ट करतात ते सेन्सॉर केले जाते.
या प्रकरणाचे कायमचे निराकरण करण्यासाठी, गावातील रहिवाश्यांनी स्वीडनच्या राष्ट्रीय सर्वेक्षणाला गावाचे नाव “Fucke” वरून बदलून “Dalsro”, म्हणजे “शांत दरी” असे करण्यासाठी पत्र लिहिण्याचे ठरवले आहे. या नवीन नावाचा अर्थ छान असला तरी शासकीय औपचारिकता पूर्ण होण्यासाठी काही महिने लागू शकतात.
तोवर बिचाऱ्या रहिवाश्यांना त्यांच्या गावाशी निगडित काही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.