Site icon InMarathi

वेगळेच माकड’चाळे’, दिवसाला ४० सिगारेट्स..ही मादी चिंपांझी झालीये ‘चेन स्मोकर’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘माकडचाळे’ असा शब्दप्रयोग आपण माणसांच्या बाबतीत करतो. एखादी व्यक्ती आपल्याकडे स्वतःचं लक्ष वेधून घेण्यासाठी जर विचित्र हावभाव, विचित्र स्टाइल्स किंवा आणखी असे विचित्र प्रकार करत असेल तर ती व्यक्ती ‘माकडचाळे’ करतेय असं आपण म्हणतो. आता माणसंही माकडचाळे का करत असावीत हा प्रश्नच आहे म्हणा! पण जर एखादी चिंपांझीच माणसांसारखे चाळे करू लागली तर?

‘झू’ म्हणजेच प्राणिसंग्रहालयामध्ये प्राण्यांचे खेळ, त्यांच्या विलक्षण करामती बघायला माणसं मोठ्या संख्येने गर्दी करतात. माणसालाच असलेली एखादी वाईट सवय प्राण्याला लावण्यात आली तर? माणसांच्या बाबतीत त्या वाईट सवयीचं कालांतराने जसं व्यसनात रूपांतर होतं तसंच व्यसन एखाद्या प्राण्याला लागलं तर?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऐकताना आणि वाचताना हे फार चमत्कारिक वाटेल, पण असा एक खराखुरा प्रकार उत्तर कोरियातल्या प्योंगयांग प्राणीसंग्रहालयातल्या एका मादी चिंपांझीच्या बाबतीत घडला होता. ही मादी दिवसाला तब्बल ४० सिगारेट्स ओढायची. इतकंच नाही, तर कुठल्याही चेन स्मोकरप्रमाणे सिगारेटच्या स्मोक रिंग्सही बनवायची.

सिगारेट ओढणाऱ्या या मादी चिंपांझीचं नाव ‘अझालिया’ असं आहे. कोरियनमध्ये तिला ‘डेल’ या नावाने संबोधलं जातं. ती २५ वर्षांची आहे. ज्या ज्या पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली त्यांनी अझालियाला सिगारेट्स ओढताना पाहून हसत खिदळत स्वतःचं मनोरंजन करून घेतलं.

 

 

केवळ मजेसारख्या साध्या कारणापासून ते अनेक गंभीर कारणांमुळे माणसांना सिगारटेचं व्यसन लागतं. सिगारेट ओढून रोजच्या आयुष्यातले ताणतणाव माणसं विसरतात, पण अझालिया जेव्हा इतक्या जास्त सिगारेट्स ओढत होती तेव्हा तिच्या मनात नेमकं काय सुरू असेल असा एक गमतीशीर प्रश्न पडतो.

झूच्या ट्रेनरने अझालियाला लायटरने सिगारेट्स पेटवायला शिकवलं होतं. जर जवळपास लायटर उपलब्ध नसेल तर तिच्याकडे फेकलेली सिगारेट आधीच पेटलेल्या दुसऱ्या सिगारेटवरून कशी पेटवायची याचंही प्रशिक्षण तिला देण्यात आलं होतं. कुठलाही माणूस ज्या सराईतपणे हे करेल तसंच ही मादी चिंपांझीही करू लागली.

प्राणिसंग्रहालयात भेट दिलेल्या लोकांनी जर तिला सिगारेट दिली तर ती सिगारेटदेखील ती प्यायची. पर्यटक जेव्हा अझालियाला पाहायला प्राणीसंग्रहालयाला भेट द्यायचे तेव्हा एकच हशा पिकायचा.

 

 

ट्रेनरने सांगितल्यावर अझालिया सिगारेट्स ओढण्यात मग्न व्हायची आणि ट्रेनर तिला नाकाला हात लाव, मान खाली झुकवून आभार मान अश्या सूचना द्यायचा. तिला नृत्य करायला सांगायचा. अझालिया सुंदर नृत्य करायची. लोकांनी तिला बघायला गर्दी करण्याचं हेही एक कारण होतं.

या प्राणीसंग्रहालयात हत्ती, जिराफ, पेंग्विन, गेंडा, उंट, गालागो, मासे, मगर, रॅटलस्नेक, कासव असे अनेक प्राणी आहेत, पण अझालिया त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे.

या प्राणिसंग्रहालयात बास्केटबॉल खेळणारी माकडे, गाणी गाणारे पोपट, तिथल्या स्टेजवर स्केटिंग करणाऱ्या बाईवर येऊन बसणारी तिथेच उडणारी कबुतरं आणि ऍबॅकस मोजणारे कुत्रेही आहेत, पण अझालियाकडे लोकांची जशी रीघ लागते तेवढ्या प्रमाणात इतर प्राण्यांकरता लागत नाही.

 

 

२०१६ साली कोरियन नेते किम जोंग-उन यांच्या आदेशानुसार प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले आणि त्यानंतर अझालिया खऱ्या अर्थाने ‘स्टार’ झाली. लोकांच्या नजरेत आली. सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलेलं अझालियाचं हे व्यसन अखेरीस थांबलं ते प्राणीसंग्रहालयात केल्या गेलेल्या तक्रारींमुळे.

पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्सचे अध्यक्ष इंग्रिड न्यूकिर्क यांच्या मते, इतरांच्या मनोरंजनासाठी चिंपांझीला जाणूनबुजून धूम्रपान करायला लावणे अत्यंत चुकीचे आहे. स्वीडिश प्राणीसंग्रहालय तज्ञ जोनास वॉलस्ट्रॉम यांनीही चिंपांझीने त्वरित धूम्रपान थांबावावं असं म्हटलं. बऱ्याच तक्रारींनंतर आता दिवसाला ४० सिगारेट्स ओढण्याची तिची सवय सोडवण्यात आली आहे.

माणसांनी माणसांच्याच सवयी प्राण्यांना शिकवायच्या आणि प्राण्यांनी त्या आत्मसात केल्यावर माणसांनी त्यांना बघायला जायचं. एकूणच प्रकरण फार विनोदी आहे.  पोरी अझालीये, धन्य आहे तुझी!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version