' मुलींचा लैंगिक “खतना” : ही नृशंस प्रथा सर्रास दुर्लक्षित का राहतेय? – InMarathi

मुलींचा लैंगिक “खतना” : ही नृशंस प्रथा सर्रास दुर्लक्षित का राहतेय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लाडीगोडी लावून ते लोक तुम्हाला बोलावतात, कधी चॉकलेट, कधी गार्डन, कधी खेळणी.. आशेने आपण देखील त्यांच्याकडे जातो, ते नेतील तिथे.. मग ती कधी अंधारी खोली असते तर कधी एखादा गोठा…

आणि तिथे आपल्यासोबत आपल्याच आई, आज्जी किंवा एखाद्या बुजुर्ग महिलेकडून खतना करवून घेतला जातो.

 

 

तेही तुम्ही फक्त तुम्ही ६ ते १० वर्षे वयाच्या असताना.

अगदी धारदार ब्लेड, सूरी, कटर, कात्री किंवा धारदार आणि लांब हत्यार जे उपयुक्त असेल आणि त्याने मुलींच्या जननेंद्रियातील योनीवरील शिश्निका कापली जाते. शिश्निका हा एक असा अवयव आहे जो वयात आल्यानंतर महिलांना प्रणयातील सुख मिळवून देण्यास मदत करतो.

पण संस्कृतीच्या नावाखाली हा प्रकार सर्रास केला जातो.

 

 

त्यांच्या धार्मिक संस्कृतीमध्ये हे करणे म्हणजे मुलींची वाढ योग्य दिशेने करत आहोत असे दर्शविण्यासारखे आहे.

यालाच female genital mutilation, त्यांचा भाषेत “खतना”किंवा “खफझ” असे म्हणतात.

हा अमानवी आणि अत्याचारी प्रकार कित्त्येक दशकांपासून (की शतकांपासून?) सुरूच आहे. पण यामागे धार्मिक कारण असल्यामुळे, यांच्या परिणामांचा विचार केलाच जात नाही. असेही मानवजातीत धर्म म्हटल्या नंतर परिणामांचा विचार करणे येतेच कुठे?

हे भारतात देखील मुस्लिम बोहरा समाजामध्ये अजूनही केलेच जाते. भारतात देखील यावर बंदी आणणारा कोणतेच कायदेशीर कलम नाही.

The United नेशन्स यांनी या प्रथेला ‘मानवी अधिकारांचे उल्लंघन’ असे म्हटले असूनही भारतात अजून पर्यंत काही बंदी आणली गेली नाही.

“कोठून आली ही प्रथा ?”

या प्रथेची सुरुवात कधी व कोठे झाली, हे शोधणे अवघड आहे, पण मुस्लिम धर्माच्या संस्कृतीमध्ये याचा उल्लेख आढळतो, ही प्रथा अनेक शतकांपासून पाळली जाते, जिथे जिथे मुस्लिम देश, मुस्लिम लोक व वस्ती असते, तिथे हा प्रकार त्यांच्यात होताना दिसतो.

 

female-inmarathi

हे ही वाचा – कझाखस्तानमधील गुन्हेगारांना “लैंगिक” गुन्ह्याबद्दल शिक्षा देण्याची अघोरी पद्धत वाचूनही झोप उडेल.

आशिया-आफ्रिका मध्ये असलेल्या बहुतांशी देशांमध्ये हा पायंडा पडलेला आहे. बोहरा समुदायातील लोक हि मुख्यतः पाळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आफ्रिका आणि आशिया मधील जवळपास ३० ते २० करोड पेक्षा जास्ती मुलींचा खतना झाला आहे.

आजी कडून नातीस, आई कडून मुलीस किंवा घराण्यातील मोठ्या स्त्रियांकडून लहान मुलींना, हि “दीक्षा (कि शिक्षा?)” दिली जाते.

इस्लामी संस्कारात बाकी संस्काराप्रमाणेच याला देखील प्रवृत्त केले जाते, खतना हा मुलींचा च नाही तर मुलांचा देखील होतो पण तो सर्वश्रुत आहे, त्याला सुंता असेही म्हटले जाते आणि जाहीरपणे होतो.

पण मुलींचा खतना हा कधीच चर्चेचा विषय नसतो, तो अजूनही बऱ्याच लोकांना माहित देखील नसेल.

८ मे २०१९ ला सुप्रीम कोर्टाने यावरील याचिकेवर सुनवाई केली तेव्हा हा विषय पुनश्च प्रकाशात आला.

 

fgm-inmarathi

 

या आधी अमेरिका च्या डेट्रायट मध्ये एका डॉक्टरला एका महिलेचा खतना करण्याचा आरोपाखाली नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

अमेरिकेसारखा प्रगत देशात देखील अजून ही प्रथा पूर्णपणे बंद करू शकलेला नाही.

“काय असते Female genital mutilation?? “

Female genital mutilation (खतना) म्हणजे एक असा प्रकार आहे जो मुलीला किंवा महिलेला भूल न देता किंवा तिला बेशुद्ध न करता तिच्यासोबत जबरदस्तीने केला जातो. असंही कोणी राजीखुशीने आपल्या जननेंद्रियास इजा का करवून घेईल म्हणा!

तर, यात धारदार हत्याराने, मुलींच्या जननेंद्रियातील असा एक भाग कापून त्याचा लचका तोडून फेकला जातो जो त्यांच्या मते “गरजेचाच नाही”.

तो भाग म्हणजेच शिश्निका. ज्याला ‘मदनाचल’ किंवा ‘योनिलिंग’ असेही म्हणतात.

 

 

जी त्यांच्या मते एक ज्यादाची त्वचा असते जिचा काही उपयोग देखील नसतो आणि ती असल्या नसल्याचा स्त्रियांच्या शरीरावर किंवा गर्भधारणेवर कोणताही विपरीत परिणाम होत नसतो.

यात अश्या धारदार शस्त्राने योनीचा एक अतिशय संवेदनशील भाग कापल्यामुळे अतोनात वेदना होतात ज्या त्या ६ ते १० वर्षांमधील मुलींसाठी अगदीच असह्य असतील.

यात रक्तपात देखील होतो पण ती एक धार्मिक प्रथा असल्यामुळे, लोक आपल्या लेकीबाळींच्या भल्यासाठी करतही असतील.

“कोण करतात खतना ?”

या कोणी प्रशिक्षित स्त्रिया किंवा डॉक्टर नसतात. पण अश्या स्त्रिया ज्यांना यातील थोडीबहुत माहिती असते, त्या यात सहभाग घेऊन शिश्निका कापण्यास किंवा खतना करण्यास हातभार लावतात. यामागील विज्ञान कदाचित त्यांनाही माहित नसेल. त्याही कदाचित आंधळेपणाने या प्रथेला अनुसरत असतील.

पण याचे बरेच भयानक परिणाम त्यांच्या आयुष्यावर पाहायला मिळतात ज्यांचा खतना नुकताच झालेला असतो किंवा लहानपणी केला गेलेला असतो.

 

genital-inmarathi

 

“खतन्याचे दुष्परिणाम”

एकतर हा प्रकार कसलीही भूल न देता केला जातो त्यामुळे त्या वेदना अतिशय तीव्र आणि सहन करण्या पलीकडच्या असणार. त्यातच कसलीही योग्य कार्यपद्धती नसल्यामुळे, हे अतिशय ढोबळपणाने केले जाते.

त्यात त्या स्त्रीची इच्छा नसताना जोरजबरदस्तीने हा प्रकार होतो यात कमी जास्ती काही कापण्याची शक्यता देखील असते.

ज्यामुळे आणखी दुखापत होऊ शकते, या जागी टाके देखील टाकता येत नाहीत. त्यामुळे ती जखम उघडीच राहते व कालांतराने भरून येते.

ज्या महिलांनी हे भोगले आहे त्यांचे काही अनुभव असे सांगतात..

‘हा प्रकार होत असताना त्यांना प्रचंड भीती वाटली, सुरुवातीला काय करत आहेत ते देखील समजले नसणार कारण ते वय देखील लहान असते.

खतना झाल्यानंतर त्यातून रक्तस्त्राव खूप प्रमाणात होतो, कारण जननेंद्रिय हा एक महत्वाचा अवयव आहे.

तसेच नंतर बरेच दिवस शौचास बसताना आणि लघवी करताना वेदना आणि लघवीमुळे जळजळ होत असते. गुप्तांग आपण कायम झाकलेले ठेवतो आणि ती जागा सहसा कोरडी राहत नाही. त्यामुळे नेहमीच बंद असल्यामुळे बाकी जखमांपेक्षा तिला भरायला वेळ जास्त लागतो काही लोकांना जखम चिघळणे किंवा सेप्टिक (दूषित होणे किंवा जखम सडणे) असे प्रकार होतात.

हे ही वाचा – भारतातील या गावात स्त्रिया चक्क ५ दिवस निर्वस्त्र राहतात

 

 

यावर औषधोपचार न घेतल्याने याचे काहींवर गंभीर दुष्परिणाम होत असावेत.’

“खतना आणि लैंगिक जीवन”

हे काही काळाने थांबतही असेल कारण जखम भरून आल्या नंतर काही दुखत नसावे पण, याचा स्त्रीच्या आयुष्यभरावर होणार परिणाम म्हणजे त्यांना प्रणयातील आनंद कधीच मिळवता येत नाही.

रतिसुखातील परमोच्च बिंदूचं तर सोडाच, त्यांच्यासाठी सेक्स करणे म्हणजेच फक्त लग्नानंतर करावाच लागत असावा असा एक प्रकार असतो.

नाव न सांगण्याच्या अटीवर बोहरा कमिटीमधील एका महिलेने सांगितले की,

“मी सेक्सचा आनंद घेतल्याचे मला कधीच आठवत नाही, मी नेहमी विचार करते की माझा खतना झाला नसता तर ते किती आनंददायी असले असते, दुःखाची गोष्ट अशी आहे की मला या आयुष्यात कधी कळणार देखील नाही.”

का होत असावे असे?

कारण शिश्निका ही अशी जागा आहे जिथे शरीरातील खुपश्या मज्जातंतूंच्या शेवट होतो. ज्यामुळे सेक्समधील आनंद किंवा समाधान हे त्यांच्याद्वारे स्त्रीला मिळत असते. पण इथे शिश्निकाच कापलेली असल्यामुळे, त्या स्त्रिया या आनंदास मुकतात.

सेक्स हा केवळ एक त्रासदायक प्रकार यांना वाटू शकतो.

 

muslim-inmarathi

 

“पण अशी अमानवी प्रथा कशासाठी ?”

त्यांचा मते शिश्निका कापून टाकणे म्हणजे बाईला चांगल्या संस्कारात आणण्यासारखे आहे, यामुळे स्त्री ‘बदफैली’ होण्यापासून तिला मज्जाव करता येऊ शकतो. योनीला ‘हराम कि बोटी’ किंवा ‘पापाचे स्रोत’ तर शिश्निकेला ‘अवांछित त्वचा’ असे देखील म्हटले जाते, ही प्रथा मूलतः पितृसत्ताक किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमधून आलेली आहे.

जर स्त्रीला कळले की, ती या सेक्स किंवा प्रणयाच्या प्रकारांतून आनंद मिळवू शकते तर ती भलतीकडे वाहवत जाईल त्या वागण्याला आळा घालता यावा म्हणून ही प्रथा केली जाते.

मुळात स्त्रीला यातून आनंद मिळूच नये असा यामागे उद्देश असावा.

हा खतना प्रकार लहान असतानाच केला जातो कारण त्या वयात दुःख विसरणे सहज सोपे असते आणि जखमा देखील लवकर भरल्या जातात, असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे.

“आणखी किती छळवणूक ?”

 

fgm-india-inmarathi

 

खतना या प्रकाराने आजवर कितीतरी आनंदाचे, स्त्रीसुखाचे आणि बालपणाचे बळी दिले असतील. पण हीच प्रथा आणखी किती दिवस चालणार आणि चालवून घेणार? वैज्ञानिकदृष्ट्या पाहावे तर याची काहीएक गरज नसते. यात फक्त एक प्रथा पाळण्यासाठी आपण स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणत आहोत.

त्या स्त्रीवर होणाऱ्या शारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही.

चिमुरडी पोर आपले पोलके/फ्रॉक सांभाळत कोणाकडे धाव घेईल जेंव्हा तिच्या आईने स्वतःच तिला त्या खोलीत या “दिव्य” प्रकारासाठी नेले असेल?

धर्मातील प्रथा बाजूला ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झालेय असे वाटण्यापेक्षा एक सुशिक्षित माणूस म्हणून एकदा याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे… इथे पण ‘त्या’ चिमुरडीचा काय दोष? सांगा ना…

===

हे ही वाचा – विविध समाजांमध्ये ‘पौरुषत्व’ सिद्ध करण्याच्या या ११ प्रथा तुमची झोप उडवतील

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?