Site icon InMarathi

प्रेयसीच्या आईला त्याने दिली किडनी, ऑपरेशननंतर महिन्यातच तिने केलं दुसऱ्याशी लग्न!

breakup inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्याला शाळेत असल्यापासून एकच गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे ‘सर्व प्राणिमात्रांवर दया करा आणि कृतज्ञता बाळगा’. कृतज्ञतापूर्वक राहणे हे उत्तम आयुष्याचे लक्षण मानले जाते.

‘रोज सकाळी उठून देवासमोर तुम्हाला दिलेल्या आयुष्यासाठी आभार माना’ असं आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. ही कृतज्ञता शाळेपासूनच आपल्या अंगात इतकी मुरवली जाते, की आपण अगदी लहानसहान गोष्टींसाठी समोरच्याला ‘थँक्यू’ म्हणत असतो. तुमच्या कदाचित लक्षात येणार नाही, पण तुमच्या एका ‘थॅक्यू’ने समोरच्याला खूप आनंद होत असतो. आपल्या कष्टांची जाणीव ठेवली जातेय, ही गोष्ट सुखावून जाते.

पण काही माणसं केलेल्या मदतीची जाणीव ठेवत नाहीत. कृतघ्नपणे समोरच्याने केलेली मदत विसरून जातात. अशीच एक घटना नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल होतेय. एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय, ज्यामध्ये एक माणूस त्याच्या ब्रेकअपविषयी सांगतोय.

 

 

मुलीच्या आईला किडनीची गरज असल्याने, प्रेमाखातर या मुलाने आपली किडनी तिच्या आईला दान केली आणि ऑपरेशनच्या काही दिवस नंतर त्या मुलीने या मुलाशी ब्रेकअप केलं.

एका व्हिडिओमध्ये त्या मुलाने हा खुलासा केला आहे. ‘किडनी दिल्यानंतर महिन्याभराने माझ्या प्रेयसीने माझ्याबरोबर ब्रेकअप केलं आणि एवढंच नाही, तर तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं.’ असं तो सांगतोय.

 

सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड आहे, आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत आलेल्या अनुभवांबद्दल लोकं सांगत आहेत. Uziel चा हा व्हिडीओ १४ लाख लोकांनी बघितला आहे. लोकांनी Uziel चे सांत्वनदेखील केलं आहे. ‘तू दुःखी होऊ नकोस नकोस, तिने एक चांगला माणूस गमावला आहे. तू पुढे जात राहा, तुला योग्य माणूस नक्कीच मिळेल.’ असे म्हटले आहे.

‘आम्ही एकमेकांचे मित्र नाहीयोत, पण माझ्या मनात तिच्याबद्दल राग नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे आणि ती सुद्धा आनंदी असेल असं मला वाटतं.’ असं Uziel ने सांगितलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version