Site icon InMarathi

“सेल्फी मैने लेली” फेम ढिनच्याक पूजा पुन्हा लोकांच्या कानांवर अत्याचार करायला सज्ज!

dhinchak pooja IM 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळत पण वळत नाही?” अशी पाडगावकरांची एक मजेशीर कविता आहे. या कवितेतला मूळचा आशय फारच वेगळा आहे. त्याचा इथे तसा काहीच संदर्भ नाही.

मात्र या कवितेतलं हे वाक्य पाडगावकर ज्या खुबीने म्हणायचे तसंच आपल्या समाजातल्या काही काही माणसांच्या बाबतीत हमखास म्हणावंसं वाटतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कमाल आर खान, राखी सावंत, अभिजित बिचुकले हे महाभाग या दुनियेत देवाने कसे बुवा आणले असतील असा आपल्याला प्रश्न पडतो. या अश्याच महाभागांच्या मांदियाळीतलं एक नाव म्हणजे पूजा जैन अर्थात ‘ढिनच्यॅक पूजा’.

 

 

सरळ शब्दात व्याख्या करायची तर ढिनच्यॅक पूजा म्हणजे ‘डोक्याला शॉट’. आजच्या घडीला एका पेक्षा एक प्रतिभावान युट्युबर्स आपल्या कलेतून लोकांचं मनोरंजन करत असताना काही काही माणसं मात्र उगीचच स्वतःकडे लक्ष वेधायचं म्हणून वाट्टेल ते करतात.

या अश्या माणसांना सहन करण्याखेरीज आपल्याकडे पर्यायच नसतो. एखादी गोष्ट व्हायरल होणे आणि ती चांगली असणे यात कधीकधी अक्षरश: जमीनअस्मानाचा फरक असतो.

ढिनच्यॅक पूजा व्हायरल आहे, लोकप्रिय आहे पण ती सगळ्यांना वीट आणते. २०१७ साली ‘सेल्फी मैने लेली’ या तिच्या गाण्यामुळे ढिनच्यॅक पूजा हे रसायन आपल्याला माहीत झालं. त्यानंतर सोशल मीडियावर तिची यथेच्छ खिल्ली उडवली गेली, तिच्यावर मिम्स बनवले गेले. पण यातून शहाणी होईल ती ढिनच्यॅक पूजा कसली!

त्यानंतरही तिची अशी निरर्थक गाणी येत राहिली आणि नेटिझन्सकडून ती ट्रोल होत राहिली. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात ‘आय ऍम अ बायकर’ हे नवं गाणं घेऊन ढिनच्यॅक पूजा परत आलीये.

 

 

सोशल मीडियावर हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होतंय. हे गाणं आल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सनी धुमाकूळ घातलाय. या व्हिडियोत ढिनच्यॅक पूजा बाईक चालवताना दिसतेय. तिने हेल्मेट घातलेलं नाहीये.

बाईकवर बसून ती गाणं गात असताना त्या रस्त्यावर हेल्मेट घातलेले इतरही काही बाईकर्स व्हिडियोत दिसत आहेत. टी शर्ट आणि लेदर जॅकेट अश्या वेशात असलेली ही बया ‘आय ऍम अ बायकर, जैसे कोई टायगर, मोटे थोडी डाएट कर, तू भी मुझे लाईक कर’ हे गाणं गाताना दिसतेय.

पुढचं सबंध गाणंही असं उगीचच ‘ट ला ट’ आणि ‘र ला र’ जोडलेलं झालंय. ऐकायला विचित्र वाटेल पण या गाण्याला १३७ हजारांच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडियोखालचा कमेंट्स सेक्शन बंद करण्यात आलाय. असं असलं तरी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडण्यात लोक जराही मागे राहिलेले नाहीत.

“आज ढिनच्यॅक पूजाचं ‘आय ऍम अ बायकर’ हे गाणं ऐकलं. आता माझ्या कानांतून रक्त बाहेर येतंय.”, असं एकाने ट्विट केलंय. तर दुसऱ्या कुणीतरी “ढिनच्यॅक पूजाचं नवं गाणं ‘आय ऍम अ बायकर’ रिलीज झालंय. आता आपल्याला कोरोनाबरोबरीने याही संकटाचा सामना करावा लागणार आहे.”, असं एक मजेशीर ट्विट केलंय.

 

‘सेल्फी मैने लेली’ नंतर ढिनच्यॅक पूजाची ‘स्वैग वाली टोपी’, ‘दिलों का शूटर’ ही गाणीसुद्धा व्हायरल झाली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने ‘दिलों का शूटर’ या गाण्याचं ‘दिलों का शूटर २.०’ या नावाने दुसरं व्हर्जनही टाकलं होतं. या गाण्यावर लोकांनी केलेले मिम्सही त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले होते.

२०२० च्या सुरुवातीला जेव्हा कोरोना हा आजार आपल्याकरता नवा होता तेव्हा पूजाने ‘होगा ना करोना’ हे गाणं रिलीज केलं होतं. “बाई गं, नको अत्याचार करूस आमच्यावर असे” असं पूजाला ओरडून ओरडून सांगावंसं वाटतं. पण आपल्याच धुंदीत मश्गुल असलेल्या तिला काही हे कळणार नाही.

ढिनच्यॅक पूजा कायमच नेटिझन्सना मिम्सचा खुराक पुरवत आलीये. ढिनच्यॅक पूजाची खतरनाक गाणी ऐकून आपले कान किटले तरी तिच्यावर, तिच्या गाण्यांवर केलेल्या मिम्समुळे आपलं नक्कीच मनोरंजन होत आलंय.

 

 

त्यामुळे स्वतःच स्वतःला ढिनच्यॅक म्हणवून घेणारी ही मुलगी यापुढे काहीही करो, या मिम्स बनवणाऱ्यांच्या क्रिएटिव्हिटीची मात्र कमाल आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version