' कपिल देव, कमल हासनच्या प्रेमापायी बिल्डिंगवरून उडी मारणाऱ्या सारिकाचा प्रवास… – InMarathi

कपिल देव, कमल हासनच्या प्रेमापायी बिल्डिंगवरून उडी मारणाऱ्या सारिकाचा प्रवास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशातील लोकांना फक्त दोनच गोष्टींची आवड आहे – चित्रपट आणि क्रिकेट. त्यामुळे जेव्हा बॉलीवूड आणि क्रिकेट एकत्र येतात, तेव्हा त्यांची नेहमी चर्चा होते. त्यांच्या कथित नात्यांचे किस्से रंगवून संगितले आणि ऐकले जातात.

आपल्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंचे अनेकदा या भारतीय सुंदरींसोबत नाव जोडले गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अशीच एक प्रेमकथा जी तुम्हाला कदाचित आठवत नसेल, ती म्हणजे १९८३ मध्ये विश्वचषक विजेतेपद पटकावणारा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आणि अभिनेत्री सारिका, जी नेहमीच तिच्या हटके चित्रपट निवडीसाठी आणि सौंदर्य, अभिनय यासाठी ओळखली जात होती.

 

kapil dev and sarika IM

 

आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे? पण मित्रांनो सारिकाच्या आयुष्यातले ट्विस्ट आणि टर्न्स तुम्हाला कळले तर तुम्हालाही धक्काच बसेल!

२५ जून १९८३ रोजी, कपिल देव रामलाल निखंज, ज्यांना कपिल देव या नावाने ओळखले जाते, त्यांनी लॉर्ड्सवर अंतिम फेरीत वेस्ट इंडिज या दिग्गज संघाचा पराभव करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच प्रतिष्ठित ICC क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती.

क्रिकेटच्या बायबल, विस्डेनने २००२ मध्ये त्यांना शतकातील भारतीय क्रिकेटपटू म्हणून घोषित केले होते. कपिल देव यांनी क्रिकेटमध्ये जे काही साध्य करायचे आहे ते सर्व साध्य केले आहे आणि संपूर्ण देशात क्रिकेटला लोकप्रिय करणारा माणूस म्हणून ते नेहमीच लक्षात राहतील.

 

kapil dev 83 world cup inmarathi

 

तथापि, त्याच्या जीवनातील एक अत्यंत हळवा कोपरा आहे ज्यामध्ये सदाबहार आणि सुंदर बॉलीवूड अभिनेत्री सारिका आहे. जी एके काळी कपिल देवच्या प्रेमात पडली होती आणि दोघे लग्न करणार होते, परंतु क्रिकेटरने नंतर लग्न करण्याची शक्यता नाकारली होती.

कपिल देव आणि सारिका दोघेही पहिल्यांदा भेटले तेव्हा अविवाहित होते. वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील दोन स्टार्सना एकत्र आणण्याची मिसेस मनोज कुमार यांची कल्पना होती असं म्हटलं जातं.

छोट्या-छोट्या संवादांपासून ते कॅज्युअल मीटिंगपर्यंत, गोष्टी खूप लवकर घडत गेल्या…आणि जसजसे ते भेटत राहिले, तसतश जवळीक वाढत गेली. ओळखीच्या व्यक्तींपासून ते मित्रांहून अधिक असे दोघांमधील समीकरण लवकरच वाढले.

या जोडप्याने नात्यात प्रवेश केला, त्यानंतर कपिल देव तिला त्याच्या पालकांना भेटण्यासाठी पंजाबला घेऊन गेला , असे हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे. पण नियतीच्या मनात नेहमीसारखे काही वेगळेच होते.

कपिलची दुरावलेली प्रेमिका, रोमी भाटिया पुन्हा कपिलच्या आयुष्यात परतली आणि कपिलने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सारिका पुन्हा एकटी पडली.

 

kapil dev romi IM

 

३ जून १९६२ रोजी मराठी कुटुंबात जन्मलेली सारिका, परिस्थितीमुळे कधी शाळेतच गेली नाही की तिला कोणी मित्र-मैत्रीण होते. तिची शाळा झाली ती ही चित्रपटाच्या सेटवरच नेमलेल्या शिक्षकांमार्फत!

आपल्या आई-वडिलांच्या नात्यातील मतभेद तिने लहानपणापासून अनुभवले होते. लहान कोवळ्या खांद्यांवर कुटुंबाची जबाबदारी आली आणि लाइट कॅमेरा अॅक्शन मध्ये सारिकाचे बालपण हरवले ते हरवलेच…जेव्हा समज आली तेव्हा खूपच उशीर झाला होताआणि आई म्हणवणार्‍या व्यक्तीनेच पहिली फसवणूक केली होती.

सचिनच्या रूपात आयुष्यात आलेल्या पहिल्या प्रेमाला आईमुळे तिला लांब करावे लागले होते. ही परवड नंतर वाढतच गेली.

कपिल देव पासून दुरावल्यानंतर एकट्या पाडलेल्या सारिकाने आधार शोधला दाक्षिणत्य अभिनेता कमल हासानमध्ये. सागर चित्रपटाच्या सेटवर दोघे भेटली आणि नंतर भेटतच राहिले. व्यावहारिक नात्यांच्या फसवणुकीने कंटाळलेल्या सारिकाला दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनच्या रूपात प्रेम मिळाले.

 

kamal and sarika IM

 

सारिकाने खुलासा केला होता की, कमल विवाहित असल्याने तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे चार-पाच वेळा ब्रेकअप झाले पण वेगळे राहण्यात अपयश आल्याने ते एकत्र यायचे.

जेव्हा अविवाहित सारिका विवाहित कमल पासून गरोदर राहिली तेव्हा तिने देश सोडण्याचा निर्णय घेतला. पण, ती जात आहे हे कमल हसन ला कळवल्याशिवाय ती देश सोडून जाऊ शकत नव्हती. आणि त्याचवेळी कमलला माहीत होते की त्याला त्याच्या लग्नातून बाहेर पडायचे आहे जे फक्त नावापुरते होते.

कपिल देव यांनी त्याची प्रेयसी रोमी भाटियाशी लग्न केले होते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरू केले होते. दुसरीकडे, सारिकाच्या आयुष्यात त्या पिढीतील सर्वात कसदार अभिनेत्यांपैकी एक, कमल हसन, ज्याने वाणीशी लग्न केले होते, तो आला. पण , कालांतराने, सारिकाने कमलसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

कारण तिला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्रास द्यायचा नव्हता, परंतु असे घडायचे नव्हते कारण ते एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते या सगळ्या दरम्यान अविवाहित सारिका गरोदर राहिली. त्यानंतर कमलने १९८८ मध्ये वाणीसोबतच्या लग्नातून बाहेर पडून सारिकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

मुलगी श्रुती हसनच्या जन्मानंतर तिने तिचा लिव्ह-इन पार्टनर अभिनेता कमल हसनसोबत लग्न केले. लग्नानंतर सारिकाला दुसरी मुलगी झाली, त्याच दरम्यान सारिकाची जवळची मैत्रीण गौतमी त्यांच्यासोबत राहू लागली होती.

 

kamal sarika IM

 

कमल आणि गौतमीमध्ये जवळीक वाढत गेली. त्यातून कमल,सारिकामध्ये वाद होवू लागले आणि ते वाढतच गेले.

यामुळे आपल्या राहत्या फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा देखील सारिकाआने प्रयत्न केला ज्यात अनेक जखमांमुळे जवळपास तीन महीने तिला हॉस्पिटल मध्ये राहावे लागले होते.

यानंतरही कमल हसनसोबत तिचा वाद वाढत गेला आणि वैवाहिक जीवनात अनेक अडचणींनंतर दोघे २००४ मध्ये वेगळे झाले. शेवटी घटस्फोटानंतर सारिकाला दोन धक्के बसले. एक म्हणजे कमलपासून वेगळे होणे आणि दुसरे म्हणजे मुलींनीही सारिकासोबत राहण्यास नकार दिला.

तणावाखाली सारिकाने आत्महत्येचा प्रयत्नही केला. कमल तिच्यापासून विभक्त झाला तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे सारिकाच्या मुलींनीही विभक्त होण्याच्या वेळी आईला साथ दिली नाही.

 

shruti akshara IM

 

कालांतराने मुलींनी सारिकाचा ताण समजून घेऊन आईसोबतचे नाते सुधारले आणि हळूहळू सारिकाही तिच्या सामान्य जीवनात परतली. तर मित्रांनो ही होती अभिनेत्री सारिका हिचा आजवरच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रवास. तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?