Site icon InMarathi

NRI जावयासाठी ३६५ पदार्थांची मेजवानी देणाऱ्या कुटुंबाचे फोटो नेटवर व्हायरल…

nri final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली फार महत्त्वाची घटना. नव्या दाम्पत्यासाठी लग्न जितकं महत्त्चाचं असतं तितकंच ते त्या दोन्ही कुटुंबियांसाठी, वधूवरांच्या आईवडिलांसाठीही महत्त्वाचं असतं. मुलीच्या आईवडिलांना याची अधिक काळजी वाटत असावी कारण, आपली मुलगी नव्या घरात त्यांना सुखाने नांदायला हवी असते. आपल्याकडे काही काही प्रथा इतका गमतीशीर पडलेल्या आहेत की त्या तश्या का असाव्यात यामागचं नेमकं कारण दरवेळी कळतंच असं नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखादी मुलगी सासरी जाणार असते तेव्हा तिच्या वाट्याला ‘सासुरवास’ येणार असतो. पण मुलीकडची मंडळी मात्र जावयाचा मानपान करण्यात स्वतःला कुठेही कमी पडू देत नाहीत. कदाचित सासरच्या मंडळींनी सासरी आपल्या मुलीला सुखात ठेवावं या उद्देशाने हे पूर्वीपासून केलं जात असेल. पण जरी आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नसली आणि सासरीही मुलीला सामान दर्जा मिळू लागलेला असला तरी आजही ‘जावयाचा मान’ ही बाब आपल्याकडे खासच समजली जाते.

 

 

घराघरांमध्ये आजही मुलीच्या माहेरकडची मंडळी आपल्या जितकं करता येईल तितकं भरभरून जावयाचं कोडकौतुक करतात. त्यात जर आपला जावई सगळ्याच बाबतीत मुलीच्या वरचढ असेल तर मग बघायलाच नको !

आंध्र प्रदेशातल्या एका कुटुंबाने या जावयाच्या मानपानाचे आजवरचे बहुधा सगळेच रेकॉर्ड्स तोडले असावेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने या कुटुंबाने त्यांच्या भावी ‘NRI’ जावयासाठी थोडेथोडके नाही तर तब्ब्ल ३६५ खाद्यपदार्थ बनवले.

आंध्र प्रदेशात दरवर्षी घरोघरी मकर संक्रांतीच्या दिवशी ‘भोगी-संक्रांती-कनुमा’ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कुणीही कुठल्याही राज्यात असलं किंवा देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलं तर या दिवशी सगळे आपल्या मूळ घरी एकत्र जमून आनंदाने हा सण साजरा करतात. पण आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरीतील ‘नरसापूरम’ मधल्या एका कुटुंबाने त्यांच्या होणाऱ्या जावयाला संक्रांतीच्या निमित्ताने तब्ब्ल ३६५ वेगवगेळ्या खाद्यपदार्थांची शाही मेजवानी दिली.

 

 

हा जो सगळा घाट या कुटुंबीयांनी घातला होता त्यात ३० वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या, भाताचे प्रकार, गोदावरीतली पारंपारिक पक्वान्न, पुलिहोरा, बिर्याणी, बिस्किटं, फळं, केक्स, उष्ण आणि शीत पेयं अश्या सगळ्या पदार्थांचा समावेश होता. ‘ANI’ च्या म्हणण्यानुसार मुलीकडच्या कुटुंबीयांपैकी एकाने अशी माहिती दिली की, “वर्षाचे ३६५ दिवस असतात असा विचार करून आमच्या होणाऱ्या जावयावरचं आमचं प्रेम दर्शवायला आम्ही ३६५ वेगवेगळ्या पदार्थांची व्यवस्था केली.”

ज्या प्रकारे ही सगळी जय्यत तयारी केली गेली होती ती पाहता पूर्व आणि पश्चिम गोदावरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्याचा बोलबाला झाला नसता तर नवलच होतं. केवळ या दोन जिल्ह्यांमध्येच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली नाही तर इंटरनेटवरही याचे फोटोज चांगलेच व्हायरल झाले.
लग्नाच्या अगदीच आधी मुलीचे आजोबा अचंता गोविंद आणि मुलीची आजी नागमणी यांच्या पुढाकाराने हे रिसेप्शन पार पडलं. होणाऱ्या जावयाला अश्या प्रकारे मेजवानी द्यावी ही त्यांचीच कल्पना होती.

 

मुलीकडच्या आणि मुलाकडच्या दोन्ही बाजूंचे अगदी जवळचे कुटुंबीय या रिसेप्शनला उपस्थित होते. या समारंभानंतर लवकरच साईकृष्ण आणि कुंदवी यांचं लग्न झालं. कुंदवी ही अत्यम वेंकटेस्वर राव आणि माधवी यांची लेक. कुंदवीचे आईवडील सोन्याचे व्यापारी आहेत. तर साईकृष्ण हा तुम्मालापल्ली सुब्रमण्यम आणि अन्नपूर्णा या दांपत्याचा मुलगा.

 

 

गोदावरीचे दोन्ही जिल्हे अतिशय आपुलकीने आणि सढळ हस्ते केल्या जाणाऱ्या आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे या आंध्र कुटुंबीयांनीही त्यांच्या भावी जावयाचं उत्तम आदरातिथ्य करण्याविषयी नवल वाटलं नसतं. पण त्यांनी त्या आदरातिथ्याला जे भव्य स्वरूप दिलं त्यामुळेच या रिसेप्शनचा इतका गवगवा झाला असावा.

आपण कदाचित ‘अरे बापरे’ असं म्हणून या बातमीकडे अप्रूपाने बघू आणि सोडून देऊ. पण हे सगळं नक्कीच थक्क करणारं आहे. मुलीकडच्या मंडळींच्या दांडग्या उत्साहाला मानायला हवं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version