Site icon InMarathi

पोळ्या कडक होतायेत? त्या खुसखुशीत होण्यासाठी जाणून घ्या या ५ सोप्या टिप्स!

roti making im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सगळा स्वयंपाक सुंदर झालाय पण पोळ्या मात्र कडक वातड असतील तर जेवणाची सगळी मजा जाते. ज्या व्यक्तीला चविष्ट पदार्थांसह मऊ लुसलुशीत पोळ्या जमत असतील ती व्यक्ती सुगरण म्हणून गणली जाते.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अर्थात कधी कधी जर कणिकच जाडी भरडी दळून आली असेल तर कितीही सुगरण व्यक्ती असो, पोळ्या वातडच होतात. त्यामुळे उत्तम क्वालिटीची कणिक, कणिक भिजवणे व ती चांगली तिंबून घेणे, तव्याचे योग्य तापमान, कडा न ठेवता व्यवस्थित पोळी लाटणे आणि ती दोन्हीकडून व्यवस्थित भाजणे ह्या सर्व गोष्टी जुळून आल्या तरच पोळी मऊ व लुसलुशीत होते. म्हणूनच चांगल्या पोळ्या करणे हे कौशल्याचे काम समजले जाते.

 

 

एकदा पोळी व्यवस्थित जमली की अर्धा स्वयंपाक करता आला असे म्हटले जाते. आपल्या आज्या पणज्या देखील सांगतात की पोळीला भरपूर प्रॅक्टिस लागते. म्हणूनच जो स्वयंपाक शिकतोय त्या व्यक्तीला रोज चार तरी पोळ्या प्रॅक्टिससाठी घरचे करायला लावतात.

एकवेळ जेवणात भाजी किंवा वरण नसले तरी अडत नाही पण पोळी नसली की काहीतरी अर्धवट जेवतोय असे वाटते. म्हणून निदान मराठी घरांत तरी रोज जेवणात भाकरी किंवा पोळी असतेच! आता भाकरी सुद्धा करणे काही सोपे काम नाही. त्यासाठीही प्रॅक्टिस लागतेच. भाकरीला पोट व पोळीला काठ असू नये म्हणतात.

तुमच्याही पोळ्या काही कारणाने कडक किंवा वातड होत असतील तर पुढील टिप्स वापरून बघा आणि पुढच्या वेळेला पोळीचे तंत्र समजावून घेऊन मऊ लुसलुशीत पोळ्या करून घरच्यांचे कौतुक मिळवा.

१. कणिक मळणे/भिजवणे

पोळ्या करताना पहिली पायरी म्हणजे कणिक मळणे किंवा भिजवणे. चांगल्या प्रतीचा गहू आणून, तो निवडून, गिरणीत नेऊन चांगले मऊसर बारीक पीठ दळून घेणे हे केल्याशिवाय पुढची स्टेप जमणारच नाही. त्यामुळे कणिक चांगल्या प्रकारेच दळलेली हवी.

कणिक जितकी चांगली ,पोळ्या तितक्या मऊ होतात. तर कणिक भिजवताना त्यात थोडेसे चवीपुरते मीठ घालावे. ह्याने पोळी नुसती जरी खाल्ली तरी ती छान चविष्ट लागते. तुम्ही कणिक कशी भिजवता ह्यावर तुमची पोळी वातड होणार की मऊ हे ठरते त्यामुळे कणिक चांगली भिजवणे अत्यंत महत्वाचे आहे.

 

 

पोळ्यांसाठी कणिक भिजवताना ती खूप घट्ट असू नये. आपण करंजी किंवा शंकरपाळे करताना कणिक खूप घट्ट भिजवतो. पण पोळ्या करताना मात्र कणिक मऊसरच असायला हवी. कणिक खूप घट्ट भिजली तर पोळ्या वातड आणि कडक होतात. आणि खूप सैल भिजवली तर त्या अजिबात लाटता येत नाहीत आणि पोळपाटाला चिकटून बसतात.

कणिक भिजवताना ती थोड्यावेळ तिंबून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. ह्याने पोळ्या अगदी मऊ होतात आणि दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ राहतात. आपण बोटाने थोडासा दाब दिला तरी कणकेचा उंडा दाबला गेला पाहिजे इतकी मऊसर कणिक मळायला हवी.

२. चवीपुरते मीठ घाला

तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरचा त्रास नसेल आणि डॉक्टरांनी आवर्जून जेवणात कमी मीठ खायला सांगतले नसेल तर तुम्ही ही टीप नक्की वापरू शकता.

 

 

कणिक भिजवताना त्यात थोडेसे चवीपुरते मीठ घातल्यास कणिक मऊसर भिजते आणि पोळ्या देखील मऊ होतात.

३. तेलाचा वापर

कणिक मळून घेताना ,चांगली तिंबून घेताना कणकेला थोडासा तेलाचा हात लावावा. ह्याने कणिक मऊ राहते. कोरडी पडत नाही आणि पोळ्या मऊ होण्यास मदत होते.

४. घाई नको

एकदा कणिक चांगली भिजवून घेतली की लगेच पोळ्या करण्याची घाई करू नका. कणिक दहा -पंधरा मिनिटे छान मुरली की पोळ्या चांगल्या होतात. कणिक मुरायला ठेवताना ती उघडी ठेवू नका. नाहीतर कणिक कोरडी पडते आणि कडक होते.

 

 

अश्या कणकेच्या पोळ्या देखील कडक वातड होतात. म्हणून कणिक भिजवल्यानंतर ती तेलाचा हात लावून झाकून ठेवा. दहा-पंधरा मिनिटे कणिक झाकून ठेवल्यास ती चांगली मुरते, मऊ होते आणि त्या कणकेच्या पोळ्या सुद्धा छान मऊसूत लुसलुशीत होतात.

५. पीठ लावा

पोळ्या लाटताना खूप सैल झाली असेल तर ती लाटताना खूप कोरडी कणिक लावावी लागते.

 

 

अशाने देखील पोळ्या कोरड्या आणि वातड होऊ शकतात. म्हणून पोळपाट व लाटण्याला कणकेचा उंडा चिकटू नये व पोळी भराभर लाटली जावी इतकीच कोरडी कणिक तुमच्या कणकेच्या उंड्याला लावा.

६. लाटण्याची कला

पोळी लाटताना ती सगळीकडून एकसारखी लाटण्याचा प्रयत्न करा. शक्यतोवर पोळीला काठ राहणार नाहीत ह्याची काळजी घ्या. जेणे करून ते काठ कच्चे राहणार नाहीत.

 

 

पोळी भाजताना तव्याचे तापमान देखील मेंटेन ठेवणे खूप महत्वाचे आहे. खूप मोठ्या आचेवर पोळी भाजली तर ती लगेच करपते किंवा तव्याला चिकटून बसते.

एका बाजूने करपलेली पोळी चांगली फुगत नाही. तसेच मंद आचेवर जर पोळी भाजली तर ती कच्ची राहते किंवा कडक होते. म्हणूनच पोळी भाजताना ती मध्यम आचेवरच भाजावी. म्हणजे ती पटकन करपत नाही, तव्याला चिकटत नाही व दोन्ही बाजूंनी चांगली भाजली जाते.

घडीची पोळी भाजताना आधी एका बाजूने थोडीशी भाजावी, मग ती उलटून घ्यावी व दुसऱ्या बाजूने पूर्ण शिजेस्तोवर भाजावी. नंतर ती परत उलटून पहिल्या बाजूने पूर्ण भाजून घ्यावी. ह्या प्रकारे घडीची पोळी भाजल्यास ती छान भाजली जाते आणि मऊ राहते.

७. ‘ही’ चूक करून नका

पोळी भाजून झाल्यावर ती तव्यावरून खाली काढली की ती बराच वेळ तशीच उघडी ठेवू नये. पोळ्या उघड्या ठेवल्या की त्या वाऱ्याने कडक होतात. तुम्हाला आवडत आणि चालत असेल तर पोळी तव्यावरून काढल्यावर तिला तुपाचा किंवा तेलाचा हात लावा आणि पोळ्या डब्यात भरून ठेवा.

 

 

पोळ्या उघड्या ठेवल्या तर त्या वातड होऊ लागतात. म्हणून त्या थंड झाल्यावर डब्यात भरून डब्याला झाकण लावून ठेवा. गरमागरम पोळ्या तश्याच डब्यात भरल्या तर त्यावर वाफ जमा होऊन पोळ्या ओल्या होतात.

वरील टिप्स वापरून जर तुम्ही पोळ्या केल्यात तर त्या नक्कीच मऊसूत व लुसलुशीत होतील आणि तुम्हाला उत्तम स्वयंपाक केल्याचे समाधान मिळेल शिवाय घरच्यांकडून कौतुकाची थाप देखील मिळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version