' रात्री एकांतात मुली ‘गुगलवर’ काय काय सर्च करतात? वाचा थक्क करणारा रिपोर्ट – InMarathi

रात्री एकांतात मुली ‘गुगलवर’ काय काय सर्च करतात? वाचा थक्क करणारा रिपोर्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘गुगल’ बस नाम ही काफी है. पूर्वी कसलीशी माहिती हवी असेल तर योग्य त्या व्यक्तीला शोधा मग विचारा किंवा त्यासंदर्भात एखादं पुस्तक वाचा अशी भलीमोठी प्रोसेस करावी लागे. आत्ता मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरे सगळ्यांकडे असतात कारण एकच- गुगल.

एका गुगल सर्चवर आपल्याला पडलेल्या बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्याने लहान मोठे, स्त्री – पुरुष असे सगळेच गुगल सर्चमध्ये आघाडीवर आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नुकताच गुगलने आपल्या सर्च रिझल्टचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या इंटरनेट वापराशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

 

google search engine IM

 

या अहवालात १५ ते ३५ वयोगटातील मुली किंवा स्त्रिया गुगल वर नेमकं काय शोधतात याबाबतीत मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत.

तर आजच्या लेखातून जाणून घेऊया की नक्की मुली रात्री एकांतात काय सर्च करतात.

१. आरोग्यासंबधित –

 

health IM

 

या वयोगटातील मुली शक्यतो आपल्या शरीराबद्दल जागरूक असतात त्यामुळे वाढलेलं वजन कसे कमी करावे हा प्रश्न गुगलला विचारला जातो. तसेच एखाद्या लग्नसराईत , सणावारात चांगले दिसण्यासाठी झटपट वजन कमी करण्याच्या टीप्स गुगलवर शोधतात.

हेल्दी फूड खाल्याने शरीराला होणारा फायदा याबाबतही गुगल कडून माहिती घेतली जाते. तर काही मुली गुगल वर सर्च करून डायट प्लॅन तयार करतात.

२. ऑनलाईन कपडे –

 

women online clothing IM

 

फॅशनेबल कपडे हा तरुणींच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे कपडे काय घालायचे, ते कसे कॅरी करायचे तसेच कपड्यांचे विविध ट्रेण्ड जाणून घ्यायला तरुणी गुगल सर्च करतात.

याशिवाय मुली ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर जाऊन कपड्यांचे डिझाईन, नवीन कलेक्शन, ऑफर्स याबद्दल इंटरनेटवर जास्त सर्च करतात. अनेक संशोधनात ही बाब समोर आली आहे.

३. करीयर संबंधी पर्याय आणि मार्गदर्शन –

 

jobs IM

अनेक मुली लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी असतात. काही मुलींसाठी करीयर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. अशा मुली इंटरनेट वापरून विविध कोर्स , करियरचे वेगळे पर्याय याबाबत माहिती मिळवतात.

तसेच त्या कार्यरत असलेल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी लागणाऱ्या कोर्सची माहिती गुगल वरून मिळवली जाते.

४. प्रेग्नांसी आणि पिरियड बद्दल माहिती –

 

pregnancy IM

 

प्रत्येक मुलीला प्रेग्नेंट राहण्याची भीती वाटत असते. परंतु पुरेसे लैंगिक शिक्षण नसल्याने अनेकींच्या मनात विविध प्रश्न असतात. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची माहिती इंटनेटवरून मिळवली जाते. तसेच पाळी उशिरा आल्यास काय?

अशा अनेक प्रश्नांसाठी गुगल सर्च केले जाते. एखादी गोष्ट केल्यास गरोदर राहण्याची शक्यता किती हे चाचपुन पाहण्यासाठी सुद्धा गुगल सर्च होते.

५. रोमँटिक गाणी –

 

listening music IM

 

सहसा प्रत्येकाला गाणी ऐकायला आवडतात. पण गुगलवर मुलींनी सर्वाधिक शोधलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे संगीत. मुली इंटरनेटवर खूप रोमँटिक गाणी शोधतात आणि ऐकतात. यासोबतच मुली इंटरनेटवर रोमँटिक शायरी देखील शोधतात.

६. ब्युटी टिप्स –

 

actress doing make up IM

 

ब्युटी टिप्ससाठी मुली इंटरनेटची मदत घेतात. मुलींना सुंदर आणि वेगळं दिसायला आवडतं. यासाठी त्या इंटरनेटची मदत घेतात.

मुलींना चांगल दिसण्यातही उपयुक्त फॅशन ट्रेंड, ब्युटी ट्रीटमेंट आणि घरगुती उपाय इंटरनेटवर शोधायला आवडतात. तसेच टॅटू गोंदवून घेण्यासाठी त्याबद्दलची माहिती गुगलवर मिळवताना दिसतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?