' या कारणासाठी भारतीय संविधान ठेवलं गेलंय ‘गॅस चेंबर’मध्ये.. – InMarathi

या कारणासाठी भारतीय संविधान ठेवलं गेलंय ‘गॅस चेंबर’मध्ये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

येत्या २६ जानेवारी रोजी भारत देश ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाने स्वातंत्र्यनंतर एका समितीची स्थापना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या समितीने भारतीय संविधान लिहिलं. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं. मात्र त्याचा कायदेशीर स्वीकार करण्यासाठी २६ जानेवारी १९५० हा दिवस उजडावा लागला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय नागरिकांसाठी संविधानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे वेगळं सांगण्याची गरज भासणार नाही. मात्र या संविधानाची मूळ प्रत कुणालाही सहजासहजी हाती लागत नाही. कारण ती चक्क एका गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. भारतीय संविधानाबद्दल फारशा माहित नसलेल्या अशाच काही गोष्टी आज जाणून घेऊयात.

संविधानाची खासियत…

 

constituition if india inmarathi

 

भारत देश हा अनेक बाबतीत जगातील इतर अनेक देशांपेक्षा निराळा आणि अनोखा ठरतो, असं वावगं ठरत नाही. संविधानाच्या बाबतीत सुद्धा अशीच एक विलक्षण गोष्ट आहे. ज्यामुळे जगातील इतर अनेक देशांपेक्षा आगळंवेगळं असं संविधान म्हणून भारतीय संविधानाच उल्लेख करण्यात येतो.

भारतीय संविधानाची मूळ प्रत ही छापील नसून, ते चक्क एक हस्तलिखित आहे. एवढंच नाही, तर भारतीय संविधान लिहिण्यासाठी वापरण्यात आलेले कागद सुद्धा हाताने तयार करण्यात आलेले आहेत.

भारतीय संविधानातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एका पानावर उत्तम नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. प्रत्येक पृष्ठाला सोन्याची एक उत्कृष्ट फ्रेम आहे. यामुळे संविधानाचे संदर्य अधिक खुलून दिसतं असं म्हणायला हवं.

२६ जानेवारीची निवड का?

 

Constitution06-InMarathi

 

संविधान २ महिने आधीच संसदेत मान्य झालेलं असूनही, ते लागू कारण्यासाठी मात्र २६ जानेवारी १९५० ची वाट बघण्यात आली. याचं कारणदेखील तितकंच विशेष होतं.

२६ जानेवारी हा दिवस भारतासाठी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याआधीच्या काळापासूनच महत्त्वपूर्ण होता. १९३० साली याच दिवशी, काँग्रेसने भारताच्या संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्यामुळेच भारताच्या स्वातंत्रलढ्यात या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवसाचे भारतीय नागरिकांना कायम स्मरण राहावं, म्हणूनच हा दिवस भारताला संविधानिक आणि प्रजासत्ताक करण्यासाठी निवडण्यात आला.

२६ जानेवारी १९३० रोजी पाहिलेलं स्वप्न १५ ऑगस्ट १९४७ रोजी सत्यात आलं, त्या दिवसानंतर २० वर्षांनी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगभरात घोषित करण्यात आला.

असं ठेवलं जातं संविधान

 

Indian Constitution Inmarathi

 

 

हस्तलिखित आणि हाताने बनवण्यात आलेले कागद यांचा विचार करता, संविधानाची काळजी घेणं हे किती कठीण काम आहे, हे अगदी सहज लक्षात येईल. म्हणूनच संविधानाची मूळ प्रत फार काळजीपूयर्वक जपली जाते. तिला फ्लॅनेलच्या कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आलं होतं.

संविधानाची अधिक देखरेख व्हावी या हेतूने त्याची प्रत नेफथिलीनच्या खोक्यात ठेवण्यात आली होती. मात्र हे उपाय तेवढे परिणामकारक नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळेच नवा पर्याय निवडणं गरजेचं ठरलं.

यासाठीच गॅस चेंबरची निवड करण्यात आली. अर्थात, याआधी इतर देशांच्या संविधानाच्या सुरक्षेचा सखोल अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील संविधान हे सर्वाधिक सुरक्षित वातावरणात आहे, हेदेखील यावेळी शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं.

या संशोधनातून मोठा निर्णय घेण्यात आला आणि १९९४ साली संविधानाची रवानगी गॅस चेंबरमध्ये करण्यात आली. या गॅस चेंबरमध्ये असा गॅस वापरण्यात आला आहे, जो कागद आणि शाई या दोन्हीपैकी कुठल्याही वस्तूवर परिणाम करू शकत नाही. असा गॅस म्हणजे नायट्रोजन! त्यामुळेच नायट्रोजनच्या चेंबरमध्ये भारतीय संविधानाची मूळ प्रत ठेवण्यात आली आहे.

दर दोन महिन्यात या गॅसचेंबरची योग्य पडताळणी करण्यात येते. एवढंच नाही, तर दरवर्षी हे चेंबर रिकामं करण्यात येतं आणि संविधानाची पडताळणी होऊन, पुन्हा एकदा ते सुरक्षित वातावरण असलेल्या नायट्रोजनच्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात येतं.

काय मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. तुम्हाला अशी आणखी कुठली माहिती वाचायला आवडेल त्याविषयी सुद्धा अवश्य सांगा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?