Site icon InMarathi

तिरंग्याचा अपमान ते शोएब मलिकशी लग्न, सानिया मिर्झाचे ५ वादग्रस्त मुद्दे

sania mirza im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विराट कोहलीने आपल्या कप्तानपदाचा राजीनामा दिला आणि दुसरीकडे सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी भावुक मेसेजेस पोस्ट करायला सुरवात केली होती, भारतातील सर्वोत्तम कप्तानांमध्ये त्याची गणना होते, मात्र असे असून सुद्धा त्याला राजीनामा द्यावा लागल्याने साहजिकच त्याचे चाहते देखील नाराज झाले आहेत.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

विराटसाठी चाहते भावूक झाले असतानाच दुसरीकडे सानिया मिर्झाने आपल्या टेनिस करियरला राम राम ठोकला आहे.  २०२२ ऑस्ट्रलिया ओपन टेनिसमध्ये हरल्यानंतर तिने हा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झाचा असा अचानक राजीनामा देण्यावरून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

 

भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू म्हणून सानिया मिर्झाकडे पहिले जाते, आज तिने अनेक पदके आपल्याला मिळवून दिली आहेत, हे असे जरी असले तरी तिच्या वादग्रस्त कृतींमुळे ती तितकीच चर्चेत सुद्धा आली आहे, नेमके काय आहेत ते वाद चला तर मग जाणून घेऊयात

१. आखूड स्कर्ट प्रकरण

टेनिस खेळताना महिला खेळाडूंचा पोषाख ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. टि शर्ट, स्कर्ट, मोजे आणि शूज असा पेहराव करत आत्मविश्वासाने मैदानात उतरणाऱ्या सानियाने आजवर अनेक विक्रम केले, मात्र तिच्या याच पोषाखावरून एकदा रणकंदन माजले होते.

 

 

२००५ साली करिअरच्या सुरुवातीलाच तिच्यावर एका धर्मगुरूने टिका केली होती. महिला असून अशा प्रकारचा पोषाख करणे गैर असल्याचा फतवाच त्यांनी काढला होता, मात्र ”माझा पोषाख ही माझी वैयक्तिक बाब असून खेळण्यासाठी हे कपडे अनुकूल असल्याची ठाम भुमिका घेत सानियाने काही काळानंतर हा वाद मिटवला.

२. राष्ट्रध्वजाचा अपमान 

देशासाठी अनेक गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या सानियाचे देशभर कौतुक होतेच, मात्र एकदा चक्क राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी तिला टिकेला सामोरे जावे लागले होते.

 

 

काही वर्षांपुर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका फोटोत सानिया तिरंग्यासमोर पाय पसरून बसल्याचे दिसत होते. या फोटो पाहिल्यानंतर देशभरातून तिच्यावर टिका झाली. बराच काळ ही टिका सुरूच होती.

६ ड्रीम गर्ल्स – ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सुत जमवले…

नवनीत राणा, वादग्रस्त फोटो ते शिवसेनाच्या नेत्याशी घेतलेला पंगा…

३. वादग्रस्त लग्न

आपल्या बालपणीचा मित्र शोहराब मिर्झा याच्याशी झालेला साखरपुडा मोडून पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय सानियाने घेतला आणि देशभरात वाद सुरु झाले.

 

 

२०१० साली शोएब आणि सानिया यांनी ‘निकाह’ केल्यानंतरही ही टिका सुरुच होती. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूने पाकिस्तानी कुटुंबाची सून व्हावे ही बाब अनेकांना मान्य नव्हती. मात्र सानिया आपल्या निर्णयावर ठाम होती.

४. लिएंडर पेसला नकार

प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसबरोबर खेळण्यास सानियाने नकार दिला होता. यावर टेनिस संघाने अनेकदा समजूत काढूनही तिने आपला निर्णय न बदलल्याने तिच्यावर बरीच टिका झाली होती.

 

 

लहान वयात अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने अंहकारी, गर्विष्ठ अशा अनेक मथळ्यांखाली देशभर तिच्यावर टिका जाली होती. मात्र सुरुवातीच्या काही मॅचेस वगळता नंतर लिएंडरसोबत एकही सामना खेळली नाही.

५. सानियामुळे स्टार सिंग जेलमध्ये

या वादात प्रत्यक्ष सानियाचा सहभाग नसला तरी सानियाच त्याला कारणीभूत ठरली होती. सानियाचा शोएबशी विवाह झाल्यानंतर बिहारचा स्टार सिंगर केसारी लाल याने ”टेनिस वाली सानिया दूल्हा खोजली पाकिस्तानी” हे गाणं प्रदर्शित केलं. यावेळी देशभरातून सानियाच्या लग्नावर टिका होत असतानाच या गाण्यामुळे त्यात आणखी भर पडली.

 

 

अखेरिस खेसारी लालला या प्रकरणी तब्बल ३ दिवस पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती.

एकंदरित कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सानियाने आता निवृत्तीची घोषणा केली आहे. यानंतर ती टेनिस कोर्टात देशाचे प्रतिनिधित्व करणार नसली तरी प्रशिक्षक म्हणूनही काम करण्याचा तिचा मानस आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version