Site icon InMarathi

२०२२ मध्ये साऊथचे कलाकार बॉलिवूड गाजवणार, हे स्टार्स करणार हिंदीत पदार्पण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्रपट म्हटलं की आजही कुठल्याही भारतीयाच्या डोळ्यांसमोर चटकन बॉलिवुडच्याच चित्रपटांची प्रतिमा येते. अनेक वर्षं आपल्यासाठी चित्रपट म्हणजे बॉलिवूड असं समीकरण असायचं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

प्रांताप्रांतानुसार त्या त्या भाषेत उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आधीपासून होतच होती. पण पूर्वी बॉलिवूडचा जो दबदबा होता तसा प्रादेशिक सिनेमांचा नसायचा.

 

 

गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलताना दिसतंय. एखादा चित्रपट किती आशयघन आहे याला महत्त्व दिलं जाऊ लागलं आहे. आज कलाकारही आपण जिथे रूळलोय तिथेच अडकून पडताना दिसत नाहीत.

पूर्वीच्या कलाकारांच्या मानाने आजचे कलाकार अधिक प्रयोगशील असल्याचं दिसून येतंय. चित्रपट करताना आता भाषेकडे अडथळा म्हणून पाहिलं न जाता आव्हान म्हणून पाहिलं जातंय हा एक खूप मोठा सुखद बदल म्हणावा लागेल.

प्रादेशिक सिनेमांचाही चाहता वर्ग देशभर वाढतोय. उत्तम कथानक असलेल्या प्रादेशिक सिनेमांचे बॉलिवूड रिमेक्स तर होताना दिसत आहेतच पण बॉलिवूडचे कलाकारही प्रादेशिक सिनेमांमध्ये आणि प्रादेशिक सिनेमांचे कलाकारही बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडण्यासाठी उत्सुक असलेले दिसत आहेत.

 

 

सरत्या वर्षात दाक्षिणात्य कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाचा चांगलाच बोलबाला झाला होता.

यंदाच्या वर्षीही आतापर्यंत आपल्या चांगले परिचयाचे झालेले काही साऊथ सुपरस्टार्स हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत बॉलिवूड गाजवणार आहेत. तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार.

१. रश्मीका मंदाना –

 

 

अलीकडेच ‘पुष्पा’ या सिनेमाने तेलगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘पुष्पा’मधल्या आपल्या उत्तम अभिनयाचं कौतुक झालेली ‘नॅशनल क्रश’ रश्मीका मंदाना सध्या चित्रपटाच्या यशाची मजा घेताना दिसतीये.

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या रश्मीकाची केवळ सोशल मीडियावरच नाही तर आता बॉलिवूडमध्येही चांगलीच हवा आहे.

ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसेल. तिच्याबरोबर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

२. विजय देवरकोंडा –

 

 

‘कबीर सिंग’ यायचा होता त्यावेळेस ‘अर्जून रेड्डी’च्या ‘बॅड बॉय इमेज’मुळे साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा देशभर चांगलाच लोकप्रिय झाला.

विजय देवरकोंडा आता करण जोहर च्या ‘लिगर’ या चित्रपटातून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

३. नागा चैतन्य –

 

 

नागार्जूनचा मुलगा आणि तेलगू स्टार नागा चैतन्य लवकरच खुद्द आमीर खान सोबत ‘लाल सिंग चड्डा’ या बहुचर्चित चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

नागा चैतन्यच्या कामाने प्रभावित होऊन आमीर खानने त्याला हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ च्या रिमेक मध्ये ‘बाला’च्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचं ऐकण्यात आलंय.

४. नयनतारा –

 

 

नयनतारा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली एक मोठी सुपरस्टार. ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

लवकरच ती बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानबरोबर अटलीच्या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या दोन्ही सुपरस्टार्सना मोठया पडद्यावर एकत्र पाहायला चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

५. राशी खन्ना –

 

 

राशी खन्नाने तामिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य प्रेक्षकांप्रमाणेच आपण हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या कौतुकालाही पात्र ठरू की नाही हे पाहायला ती उत्सुक आहे.

लवकरच ती ‘योधा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पटानी हे कलाकार या चित्रपटात तिच्यासोबत झळकणार आहेत. याखेरीज ती ‘राज आणि डिके’ यांच्या एका प्रोजेक्ट मधून हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण करणार आहे.

६. समंथा –

 

 

समंथा ही साऊथ सुपरस्टार लवकरच तिच्या पहिल्यावहिल्या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने या चित्रपटाला आर्थिक पाठबळ दिल्याचं समजतंय.

अलीकडेच ‘द फॅमिली मॅन २’ या ओटीटी सिरीजमधून तिने आपल्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तिचा हा पहिला हिंदी चित्रपट स्त्रीकेंद्री असणार आहे.

७. बेल्लमकोंडा साई श्रीनिवास –

 

 

तेलगू अभिनेता बेल्ल्मकोंडा साई श्रीनिवास यंदाच्या वर्षी एस. एस. राजामौलींच्या २००५ साली आलेल्या ‘चत्रपथी’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

मूळ चित्रपटात सुपरस्टार प्रभासने काम केलं होतं. दिग्दर्शक व्ही. व्ही. विनायक हा नवा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. आपल्या हरवलेल्या कुटुंबाचा शोध घेत असलेला तरुण अश्या आशयाचं या चित्रपटाचं कथानक होतं.

८. अदिवी शेष –

 

 

दाक्षिणात्य अभिनेता अदिवी शेष लवकरच ‘मेजर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘मेजर’च्या टिझरची चांगलीच चर्चा झाली.

अदिवीच्या अगदी सहजतेने हिंदी बोलण्याची झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. त्यामुळे पदार्पणापूर्वीच प्रेक्षकांना थोडंफार प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरलाय.

चित्रपटसृष्टीतलं सध्याचं हे वातावरण नव्यानव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल. कुठलाही प्रादेशिक सिनेमा आता ‘भारतीय सिनेमा’ म्हणून ओळखला जाऊ लागलाय.

हे भाषिक, प्रादेशिक पाश सोडून सगळीकडे काम करायला, चिक्कार मेहनत घ्यायला कलाकार सज्ज आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या चित्रपटरसिकांना मनोरंजनाची मेजवानी आधीपेक्षाही दुप्पटीने मिळेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version