Site icon InMarathi

या मॅचच्या यशामुळे धोनीचं नशीब पालटलं आणि तो संघाचा कर्णधार झाला!

dhoni featire inmarathi

republicworld.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशात क्रिकेट हा एक धर्म आणि सचिन तेंडुलकर त्याचा एक देव अशी संकल्पना फार रूढ झाली आहे, पण याचा अर्थ क्रिकेट म्हणजे का फक्त सचिनच नव्हे, इतरही कित्येक खेळाडू आजही करोडो क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत!  त्यापैकीच एक महेंद्रसिंग धोनी!

नुकतंच विराट कोहलीने आपल्या कप्तानपदाचा राजीनामा दिला त्याच्या जागी केएल राहुल ची वर्णी लागली आहे. भारतीय क्रिकेट विश्वातील धोनीनंतर विराटकडे पहिले जात होते, मात्र आता त्याने राजीनामा दिल्यानें त्याचे फॅन्स नाराज झाले आहेत. आज देखील धोनीच्या कप्तानपदाला विसरले नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महेंद्रसिंग धोनी – एक असा अवलिया जो अचानक येतो आणि भारतीयच नाही तर अवघं जागतिक क्रिकेट विश्व हलवूनसोडले आहे. सचिन तेंडूलकर नंतर ज्या कोणा क्रिकेटरने सर्वात जास्त भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं असेल तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी.

त्याने मैदानात पाऊल टाकताच ‘धोनी धोनी धोनी’ असा कल्लोळ माजवणारे प्रेक्षक आणि संथ चालीने फिल्डकडे जाणारा महेंद्र सिंग धोनी हे दृश्य धोनीच्या प्रत्येक मॅचमध्ये हमखास पाहायला मिळत असे. हीच या खेळाडूची कमाई म्हणावी लागेल.

अनेकदा चुकीच्या निर्णयांमुळे प्रेक्षकांनी त्याला धारेवरही धरलं. पण त्याही परिस्थितीमध्ये कुल राहून आपला निर्णय सार्थ ठरवणाऱ्या या कॅप्टनने भारतीय क्रिकेटला सोनेरी दिवस दाखवले.

वयाच्या पंचविशीत टीसी म्हणून नोकरी करणारा हा तरुण वयाच्या तिशीत मात्र ‘क्रिकेट का अजूबा’ म्हणून नावलौकिक मिळवतो – हा प्रवास खरंच फिल्मीच म्हणायला हवा.

 

 

पण असा कोणता क्षण होता ज्यामुळे या अवलिया क्रिकेटरच नशीब खुललं, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रत्येक हाडाच्या क्रिकेट रसिकाला ही गोष्ट नक्कीच माहित असेल. पण ज्यांच्या विस्मरणात ही गोष्ट गेली आहे किंवा ज्यांना हा प्रसंग माहिती नाही – त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा तो क्षण चितारण्याचा हा प्रयत्न!

२४ सप्टेंबर २००७ मध्ये पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्डकपमधील रंगात आलेला भारत-पाक क्रिकेटचा तो अंतिम सामना.

भारताने या सामन्यात पहिली बॅटिंग करत २० ओव्हर मध्ये ५ विकेट गमावून १५७ रन्स बनवले होते.

 

icc cricket board

पाकिस्तानला ७.७९ च्या रन रेटने विजयासाठी हवे होते १५८ रन्स

भारताच्या प्रभावी बॉलिंग पुढे शरणागती पत्करलेल्या पाकिस्तानची अवस्था झाली होती १४५ रन्स आणि ९ विकेट.

केवळ १ ओव्हर बाकी होती.

पाकिस्तानला विजयासाठी ६ बॉल्स मध्ये १३ रन्स करायचे होते.

स्ट्राईकला होता मिसबाह-उल-हक –

 

dawn

 

आणि बॉलर होता अननुभवी ‘जोगिंदर शर्मा’ –

 

DNA india

 

या निर्णायक क्षणी खरतरं धोनीने जोगिंदरच्या हातात बॉल दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

कॅप्टन म्हणून खेळणारा नवखा धोनी या निर्णयात सपशेल अपयशी ठरणार याची भीती प्रत्येक क्रिकेटप्रेमी भारतीयाच्या मनाला कुठेतरी खात होती. आणि भारत विजयी होवो यासाठी नकळतच प्रत्येकाचे हात जोडले गेले.

 

जोगिंदरने पवित्रा घेतला आणि तो सरसावला, पण –

दुर्दैवाने पहिलाच बॉल वाईड पडला.

झालं…सगळ्यांनाच भारताच्या पराजयाची शंका खरी होणार असे वाटू लागले.

आता ६ बॉल्समध्ये १२ रन्स

जोगिंदर पुन्हा तयार झाला आणि यावेळेस मात्र त्याने मिसबाहला हुकवले आणि वाईड रनची भरपाई केली.

 

 

आता ५ बॉल्समध्ये १२ रन्स.

२ रा बॉल टाकण्यासाठी जोगिंदरने धाव घेतली. यावेळेस मात्र अनुभवी मिसबाह ने घाई न करता बॉल बॅटच्या टप्प्यात येताच सरळ मैदानाच्या बाहेर टोलवला.

 

mid day

 

आणि सर्व पाकिस्तानी प्रेक्षकांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. एका बॉलमध्ये सरळ सहा रन्स गेल्याने भारतीय टीम टेन्शनमध्ये आली.

पण धोनीच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही दिसत नव्हता. त्याने जोगिंदरला धीर दिला आणि सर्वांनी आपापल्या पोझिशन्स घेतल्या.

 

spiderkerala.com

 

आता पाकिस्तानला गरज होती ४ बॉल्समध्ये अवघ्या ६ रन्सची

३ रा बॉल टाकण्यासाठी जोगिंदर पुन्हा सरसावला. यावेळेसही सिक्स मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिसबाहने चतुराईने चेंडू विकेटकीपरच्या डोक्यावरून टोलवला.

 

 

पण या वेळेस नशिबाने त्याची साथ दिली नाही. आणि त्याने मारलेला चेंडू थेट फाईन लेगला उभ्या असणाऱ्या श्रीशांतच्या हाती जाऊन विसावला…! 

 

b3infoeraina.com

 

आणि सर्वत्र जल्लोष सुरु झाला…!

 

nitinyashas.wordpress

 

पाकिस्तानच्या पदरात असलेले विजयाचं दान जणू आम्हाला पाकिस्तानकडे जायचंच नाही असं म्हणून भारताच्या पदरी पडलं… भारताने हा सामना ३ बॉल्स राखत ५ रन्सने जिंकला.

 

zeenwes.india.com

 

शेवटच्या विकेटसह खेळणाऱ्या मिसबाहला त्याची विजयाला गवसणी घालण्याची घाई नडली आणि १५२ धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला.

जोगिंदर शर्माला बॉलिंग देण्याच्या धोनीच्या एका निर्णयावर संपूर्ण भारतीय क्रिकेटप्रेमींनी बोट उचललं होतं. त्यांनीच ती बोट खाली घेऊन टाळयांच्या गजरात त्याच्या धाडसी निर्णय घेण्याच्या वृत्तीला दाद दिली…!

 

या मॅचने धोनीचं नशीब पालटलं आणि “माही” रातोरात भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला… आणि भारतीय क्रिकेट संघाचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार बनत भारतीय क्रिकेट रसिकांची मान अभिमानाने उंचावली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version