' १०० आमदारांसह राडा घालणाऱ्या आमदाराला आपण कोव्हिड पॉझिटीव्ह असल्याचा विसर पडला – InMarathi

१०० आमदारांसह राडा घालणाऱ्या आमदाराला आपण कोव्हिड पॉझिटीव्ह असल्याचा विसर पडला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”कोरोनाची लक्षणं आढळली, लगेच टेस्ट करा”, ”टेस्ट पॉझिटीव्ह आली तर तातडीने सात ७ दिवस होम क्वॉरन्टाइन व्हा”, केवळ रुग्णानेच नव्हे तर घरातील इतर सदस्यांंनाही मग नकळत सात दिवसांचा बंदिवास…”परदेशातून प्रवास करून आलाय? एअरपोर्टवर आधी खिशाला कात्री लावणारी महागडी कोव्हिड टेस्ट आणि ती टेस्ट जरी निगेटिव्ह आली तरी ७ दिवस घरात राहणे बंधनकारक”…

 

corona test inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हे सगळे नियम आता आपल्याला तोंडपाठ झाले आहेत. प्रवास करायचाय? मग कोरोना टेस्ट करा, लग्नकार्य आहे? मग केवळ ५० माणसात उत्सव उरकून घ्या. इतकंच नव्हे तर अंत्यविधीसाठीही केवळ २० लोकांनाच सरकारने परवानगी दिली आहे.

अर्थात हे सगळे नियम केवळ सामान्यांसाठीच! एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जग भरडले जात असताना देशातील नागरिकांना घरात बसण्याची सक्ती केली होती. घराबाहेर पडलेल्यांच्या पाठीत दांडूके बसायचे, नाहीतर ५००-१००० रुपयांच्या भुर्दंडामुळे खिशाला कात्री लागायची. त्यामुळे पोटाला चिमटा बसला तरी मुकाटपणे घरी बसणाऱ्यांची संख्या अधिक होती. अर्थात लोकांना घऱी बसण्याचा सल्ला देऊन महामारीत बंगाल निवडणूक लढवणारे, राजकीय प्रचार करणारे, लाखोंच्या संख्येने रॅली काढणारे मंत्री, नेतेमंडळी यांना मात्र कोणत्याही नियमांचे बंधन नव्हते.

 

rally im

 

‘नेत्यांना कोरोना होत नाही, किंवा राजकीय मंडळींना कोरोना घाबरतो’ असं उपहासाने म्हणत अनेकदा यावर प्रश्नचिन्हही उभे केले गेले. अर्थात नेत्यांना कशाचेच सोयरसुतक नव्हते.

एरव्ही सामान्यांना वेगळे नियम असा आरोप केला जात असला तरी नियमांची पायमल्ली करणाऱ्या राजकीय मंडळींनीही आता मात्र हद्द पार केली आहे.

कोरोना संशयित नव्हे तर चक्क कोरोना रुग्ण अशी खात्री पटलेल्या आमदाराने क्वॉरन्टाईनचे सगळे नियम धाब्यावर बसवून गर्दीत धिंगाणा घातला आहे.

नक्की काय झालं?

”मी मोदींना मारू शकतो. मी मोंदींना शिव्याही घालू शकतो”. असं खळबळजनक विधान करणारे नाना पटोले दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशी विधानं करण्याप्रकरणी नाना पटोलेंना भाजप समर्थकांनी फैलावर घेतले. मात्र ”मी पंतप्रधानांबद्दल बोललोच नाही. माझ्या वाक्यातील मोदी हे अन्य व्यक्ती होती” असा बचावात्मक पवित्रा नानांनी घेतला.

 

nana patole im

 

अर्थात नानांचे हे स्पष्टीकरण कितपत खरं ? असा प्रश्न विचारला जात असताना भाजप समर्थकांना मात्र हाती आयतं कोलित मिळालं आहे. त्यामुळे नानांना शिक्षा झालीच पाहिजे हा सूर भाजपने कायम ठेवला आहे.

नाना पटोलेंच्या या कृतीचा निषेध करत त्यांच्या शिक्षेची मागणी भाजपचे नागपुर पूर्ण क्षेत्रातील आमदार कृष्णा खोपडे यांनी हे धक्कादायक कृत्य केले आहे.

कृष्णा खोपडे हे देखील कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा घेऊन लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी कृष्णा खोपडे यांनी नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली.

 

krishna im

 

ही मागणी करण्यासाठी आमदार खोपडे हे तब्बल १०० जणांची फौज घेऊन ते दाखल झाले होते. मात्र हे सगळं करत असताना खोपडे यांना आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा जणू विसर पडला होता.

१३ जानेवारी रोजी खोपडे यांनी आपण कोव्हीड पॉझेटिव्ह असून नियमाप्रमाणे क्वॉरन्टाईन असल्याचे सोशल मिडीयावरून स्पष्ट केले होते.

 

krishna tweet im

 

मग पाच दिवसांपुर्वी कोरोना चाचणी केलेली व्यक्ती लगेच खडखडीत बरी झाली आणि ते ही घराबाहेर पडून १०० माणसांच्या गर्दीत मिसळली कशी? असा सवाल आता उपस्थित होतोय.

कोरोनाची लक्षणं कमी झाली तरी ७ दिवसांचा क्वॉरन्टाईन कालावधी पूर्ण होण्याची सुचना तज्ञांतर्फे केली जाते. सामान्यांतर्फे ती पाळलीही जाते, असे असताना मग आमदार, खासदार, मंत्री यांना या सुचना समजत नाहीत की समजून घ्यायच्या नाहीत? असा सवाल विचारला जात आहे.

अर्थात नियमभंग करून कोरोना संसर्ग वाढण्यास कारण ठरणाऱ्या आमदार खोपडेंवर कारवाई होणार? की सामान्यांना शिक्षा सोनवण्यात व्यस्त असलेले सरकार पुन्हा ‘आपली माणंसं’ म्हणत याकडे डोळेझाक करणार? ही बाब येत्या काही दिवसात सिद्ध होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?