' शेअरमार्केट मधून श्रीमंतीची स्वप्ने दाखवून करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे! – InMarathi

शेअरमार्केट मधून श्रीमंतीची स्वप्ने दाखवून करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ओटीटी प्लॅटफॉर्म वरील ‘स्कॅम’ ही सिरियल बर्‍याच जणांनी पहिली असेल…किंवा गेला बाजार हर्षद मेहता हे नाव तरी तुम्हाला माहिती असेलच, तसेच पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया हा कोलंबियाचा ड्रग लॉर्ड आणि मादक दहशतवादी होता जो कार्टेलचा संस्थापक आणि सोलरटेलचा नेता होता. .

या माणसाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जर कोणी श्रीमंत होण्याची स्वप्ने बघत असेल तर? आणि त्यातही लोकांची फसवणूक केली जात असेल तर? तसे बघायला गेले तर सर्वसामान्य माणसाने स्वत:ला शेअर बाजारापासून बराच काळ लांबच ठेवले होते, जोवर हर्षद मेहता या स्वप्नविक्याने या सर्वसामान्य माणसाला शेअर गुंतवणुकीतून मिळणार्‍या पैशांचे स्वप्न दाखवले नव्हते. हे सगळे सांगायचे कारण हे की असाच एक नवीन हर्षद मेहता पुन्हा उदयाला आला..

 

mehta scam inmarathi

 

आणि त्याने असेच स्वप्न दाखवून सर्वसामान्यांना जवळपास 12 कोटी रुपयांना गंडा घातला. कोण आहे हा नवीन हर्षद मेहता? काय आहे त्याची स्टोरी मागची स्टोरी? चला जाणून घेवू.

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा बार्शी हा एक श्रीमंत तालुका आहे. याच बार्शीतील राजकीय नेते, उद्योजक, डॉक्टर्ससह अनेक उच्चभ्रू मंडळींची फसवणूक झाली आहे. ही रक्कम २०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सोशल मीडियावर या घोटाळ्याची चर्चा सुरू झाल्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाचा ओघ सुरू झाला आहे. सुरुवातील केवळ ६ लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. नंतर एका दिवसात आणखी ४० लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

 

complaints inmarathi
inc.com

 

६ तक्रारदारांची जवळपास ५ कोटी ६३ लाखांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तक्रारदार वाढल्याने हा आकडा जवळपास १२ कोटींवर गेल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. . ‘बार्शीचा हर्षद मेहता’ म्हणून ओळखली जाणारी एक व्यक्ती या मागे आहे. विशाल फाटे हे त्याचे नाव! शेअर बाजारातील नफ्याचे गणित मांडून बार्शीकरांना कोट्यवधी रुपयांना फसविणाऱ्या विशाल फाटेच्या गुंतवणूक घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी आहे काय?, याचे अनेकांना कुतूहल आहे.

विशाल फटे हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील संस्थेत प्राध्यापक होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून तो बार्शीतच वास्तव्यास होता. बार्शीतच तो ‘साई नेट कॅफे’ चालवत होता.सुरुवातीला तो छोट्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करत होता. २०१९ साली फिर्यादीपैकी एक दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी गेले होते.

 

vishal inmarathi

 

तेथे त्यांची विशालसोबत ओळख झाली. विशालने दीपकला शेअर बाजाराबद्दल सांगितले आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा ७० हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात ३० हजार रुपये वाढ करून एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपकला दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला.

१० लाख रूपये भरले तर वर्षभरात ६ कोटी मिळतील असं आमिष दाखवल्यामुळे, दीपक यांनी स्वत:सह आपल्या परिवारातील सदस्य, नातलगांचे पैसे, अशी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक विशालकडे केली. बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. अल्गो ट्रेडिंगच्या नावाखाली ॲटो ट्रेड करून मोठ्या प्रमाणात रिटर्न देतो, असे विशाल बोलायचा.

त्याच्या ‘विशालका’ या वेबसाइटचे एक ॲप त्याने तयार केले होते. तो त्यासंबंधित टिप्स ग्राहकांना द्यायचा, कृत्रिमरीत्या या ॲपवर ट्रेड केलेल्या एंट्री तयार करायचा व आज एवढा प्रॉफिट झाला, असे दाखवून त्यांना पैसेही देत होता. वास्तवात मात्र अशा प्रकारे तो कुठलेच ट्रेडिंग करीत नव्हता, हे आता स्पष्ट झाले आहे.

 

share market inmarathi

 

गेल्या १० ते १५ वर्षांपासून आपण शेअर बाजारात ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा. अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक, विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक, फोग्स ट्रेडिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, NSE, BSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा.

मोडस ऑपरेंडी २०१९ पासून बार्शीत त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली. त्यातील काही जणांना २८ टक्के परतावा दिला. एका केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. मात्र, ९ जानेवारीपासून त्याचा फोन बंद असून, बार्शीतून तो गायब झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. विशाल आपल्या परिवारासह पसार झाला. यामुळे शहरभर चर्चा सुरू झाली.

तीन महिन्यात दुप्पट पैसे देण्याच्या अमिषाला बळी पडून बार्शीतील बड्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र ‘विशालका’ कंपनीचा प्रमुख विशाल फटे हा फरार झाल्यानं बार्शी परिसरात पुरती खळबळ माजली आहे. सुरुवातीला काही लोकांना विशाल फाटेने २८ टक्के परतव्याने पैसे परत केले, त्यामुळे बार्शी आणि परिसरात त्याने लोकांचा विश्वास संपादन केला होता.

 

share market inmarathi

त्याच्याकडे असलेलं अस्खलीत इंग्रजी भाषा बोलण्याचा कौशल्य, लोकांना शेअर मार्केट समजावून सांगण्याची पद्धत. यामुळे राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी पैसे गुंतवण्यास तयार झाली. विशाल फटे मागच्या तीन ते चार दिवसांपासून गायब झाल्याने अनेक मंडळींना धक्का बसला आहे.

या प्रकरणात बार्शी पोलीस स्टेशनात विशाल फटे सह राधिका फटे, रामदास फटे, गणपती फटे, वैभव फटे आणि अलका फटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सोलापूर स्थानिक पोलीस गुन्हे शाखेने शिताफीने मुख्य आरोपीचा भाऊ वैभव फटे आणि वडील अंबादास फटे यांना सांगोल्यातून अटक केली आहे. मात्र, अनेकांना करोडोचा गंडा घालणारा मास्टर माईंड विशाल फटे अद्याप फरार होता मात्र आता त्यालाही अटक करण्यात आली आहे.

 

police slogan inmarathi
quora

या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. विशालच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाची तीन ते चार पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती विशाल फटे (Vishal Phate Scam) स्कॅमचा उलगडा करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ‘एस आय टी’ स्थापन केली आहे.

सदर गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम आणि व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने ‘एस आय टी’ ची स्थापना करण्यात आली आहे. या एस आय टी मध्ये पाच उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. याआधीही अशाच अनेक फसव्या स्कीम मधून ठकसेनांनी लोकांना गंडा घातलाय. तरीही झटपट पैसे कमावण्याच्या नादात लोक विशाल फटे सारख्या भामट्यांच्या नादी लागतात, हे दुर्दैव.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?