' केवळ अफवा उठल्या आणि रजनीच्या मुलीशी लग्न केलं, १८ वर्षानंतर चर्चा घटस्फोटाची… – InMarathi

केवळ अफवा उठल्या आणि रजनीच्या मुलीशी लग्न केलं, १८ वर्षानंतर चर्चा घटस्फोटाची…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या सेलिब्रिटीच्या लग्नाची जितकी चर्चा होते त्याहून जास्त चर्चा रंगते ती एखाद्याच्या घटस्फोटाची! मलायका-अर्जुनचं ब्रेकअप झालं का? याविषयीच्या चर्चा शांत होत नाहीत तोपर्यंत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी आपला घटस्फोट जाहीर केल्याने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तब्बल १८ वर्ष सुखी संसार केल्यानंतर या जोडप्यात नेमके काय बिनसले असेल? याचा शोधही घ्यायचा प्रयत्न अनेकांनी केला.

थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांतचा जावई असलेल्या धनुषने असा निर्णय घ्यावा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

rajnikant im

 

मात्र आज ज्या जोडप्याच्या घटस्फोटाबद्दल सोशल मिडीयावर गॉसिप रंगतंय त्याच जोडप्याचे लग्नही अशाच काही अफवांमुळे झाले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

लव्ह अॅट फर्स्ट साईट

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये नशिब आजमावणाऱ्या धनुषची लव्हस्टोरीही काहीशी फिल्मीच आहे, कारण आपल्या अभिनयाने धनुषने जी थिएटर्स गाजवली त्यापैकी एका थिएटरमध्ये त्याी ऐश्वर्याशी भेट झाली होती.

गोष्ट २० वर्षांपुर्वीची! रजनीकांत आपल्या दोन्ही मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या यांच्यासह सिनेमा पहायला गेले होते. ‘काढाल कोंडे’ हा तामिळ चित्रपट तेंव्हा हाऊसफुल सुरु होता. आपली भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचवेळी धनुषही आपल्या कुटुंबासह तिथे हजर होता.

चित्रपट संपल्यानंतर थिएटरच्या मालकाने धनुषची ओळख रजनीकांत यांच्या कुटुंबियांशी करून दिली. रजनीकांत यांनी धनुषच्या भुमिकेचे कौतुक केले आणि ऐश्वर्यानेही त्याची ओळख करून घेतली. हीच ती पहिली भेट!

पहिल्या भेटीतच आपल्याला धनुष आवडला असून त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय यावेळी घेतला असल्याचा खुलासा लग्नानंतर ऐश्वर्याने केला होता.

त्यानंतर मैत्री करण्याच्या उद्देशाने ऐश्वर्यानेच पुढाकार घेतला, पुढे या दोघांमध्ये मैत्री झाली. एकत्र फिरणे, वेळ घालवणे यामुळे त्यांनी कालांतराने प्रेमही व्यक्त केले.

 

dhanush im

 

सुरवातीला हे नातं केवळ या दोघांपुरते मर्यादित असले तरी हळूहळू मिडीयाला याचा सुगावा लागलाच. धनुष-ऐश्वर्याच्या प्रेमप्रकरणापेक्षाही ‘रजनीकांत’ यांचा जावई नक्की कोण होणार? या मथळ्याखाली बातम्या प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. सोशल मिडीयावरही यांच्या अफेअर्सच्या गरमागरम चर्चा रंगू लागल्याने अखेर रजनीकांत यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच.

परिस्थिती घटस्फोटापर्यंत का जाते? संसारात या १० गोष्टींची काळजी घ्यायला हवी!

घटस्फोटाची पोटगी ५५ अब्ज रुपये, या राणीची शानशौकी बघाल तर अवाक व्हाल

अफवांच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कळताच रजनीकांत यांनी नापंसती दर्शवली. धनुषला जावई म्हणून स्विकारण्यास ते तयार नव्हते. नकळत या वादाचे पडसाद त्यांच्या कुटुंबियांवरही होत होते.

एकीकडे मासिकातील गॉसिप वाढत होते, दुसरीकडे मिडीयातून सारख्या नव्या कथा बाहेर येत होत्या. परिणामी रजनीकांत यांचा मनस्ताप वाढत होता. अखेर मुलीचा हट्ट मान्य करत अफवा रोखण्यासाठी त्यांनी या लग्नाला होकार दिला. अखेरीस दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले.

 

dhanush 1 im

 

लग्नानंतर धनुषने टॉलिवूड इंडस्ट्रीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्थिरावण्याचा बराच प्रयत्न केला. ‘रांझना’ चित्रपटातील त्याची भुमिका गौरवण्यात आली होती, त्यासह ‘why this kolaveri di’ या त्याच्या गाण्यावर देशातील अनेक प्रेक्षक थिरकले होते.

चित्रपटसृष्टीत करिअर सुरु असतानाच दुसरीकडे धनुष-ऐश्वर्याचा सुखी संसारही सुरु होता. त्यांना दोन मुले असून प्रत्येक कार्यक्रमात, चित्रपटाच्या प्रिमिअर्समध्ये धनुषला पाठिंबा देताना ऐश्वर्यासह रजनीकांत यांचे कुटुंबही उपस्थित असायचे.

सारंकाही अलबेल असतानाच लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या जोडप्याने सोशल मिडीयाचा आधार घेत आपला घटस्फोट जाहीर करणे ही बाब अनेकांसाठी धक्कादायक आहे.

 

dhanush tw im

 

घटस्फोटाचे नेमके कारण त्यांनी जाहीर केले नसले तरी दोघांच्या संमतीने आपण विभक्त होत असून सर्वांनीच या निर्णयाचा मान राखावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?