Site icon InMarathi

या अभिनेत्रींनी दिलेले हे सीन्स म्हणजे “आली लहर केला कहर”!

priya bapat featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या चित्रपट असो किंवा वेबसिरीज. या तीन गोष्टी आपल्याला त्यात हमखास बघायला मिळतातच. शिवराळ भाषा, हिंसा आणि अत्यंत बोल्ड सेक्स सीन्स! सध्याच्या कोणत्याही कलाकृतीमध्ये कथा, पटकथा उत्तम अभिनेते यांचा आभाव जाणवेल पण या ३ गोष्टी तुम्हाला त्यात हमखास मिळणारच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हिंदी सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये हे अगदी सर्रास झालंय पण आता याच गोष्टी मराठी कलाकृतींमध्ये बघायला मिळत आहे. महेश मांजरेकर यांच्या नुकत्याच आलेल्या सिनेमातल्या अश्लील दृश्यांवरून निर्माण झालेला वाद आपल्याला ठाऊक आहेच.

 

 

आधीच्या सिनेमात हे बोल्ड सीन्स symbolically दाखवले जायचे, नंतर हळूहळू ते सीन्स खुद्द कलाकार करू लागले आणि आता डिजिटल क्रांतिनंतर आणखीन एक पाऊल पुढे जाऊन नग्नता, समलैंगिक दृष्य ही सर्रास दिसायला सुरुवात झाली.

खरंतर या सगळ्या गोष्टी आधीसुद्धा होत होत्या, पण ते सिनेमे किंवा कलाकृती सरसकट सगळ्या प्रेक्षकांसाठी नव्हत्या. सध्या मात्र या सगळ्या गोष्टी प्रत्येक कलाकृतीत पाहायला मिळतायत.

नुकतंच हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर Human नावाची सिरीज आली आहे त्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शहा आणि कीर्ती कुल्हारी यांच्या एका लेसबीयन कीसिंग सीनची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

हा सीन करताना कीर्तीला खूप मेहनत घ्यावी लागली. आपण लेसबीयन नसूनसुद्धा त्या भूमिकेत शिरून त्या पात्राची भावना समजून घेणं हे एक प्रकारचं आव्हान होतं आणि तो कीसिंग सीन करताना स्वतःवर ताबा ठेवणं खूप गरजेचं होतं असं कीर्तीने स्पष्ट केलं आहे.

 

 

“शिवाय हा सीन करताना मी turn on होणार नाही याची भीती तिला वाटत होती, पण सुदैवाने तसं झालं नाही आणि ७ ते ८ टेकमध्ये हा सीन शूट करण्यात आला” असं कीर्तीने सांगितलं आहे!

हा काही पहिला वहिला बोल्ड सीन नव्हे ज्यात अभिनेत्रीने सारी बंधनं झुगारून हे बोल्ड सीन्स दिले, याआधीही बऱ्याच अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी हे असे सीन्स दिले आणि त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या त्यांच्या विषयी आपण जाणून घेऊयात!

१. शबाना आजमी – नंदिता दास (फायर) :

मीरा नायर दिग्दर्शित १९९८ सालचा फायर सिनेमा त्याच्या बोल्ड विषयामुळे आणि त्यातल्या बोल्ड सीन्समुळे चांगलाच चर्चेत होता. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी आणि नंदिता दास यांच्यात बरेच इंटीमेट सीन्स तसेच किसिंग सीन्स दाखवण्यात आले होते.

 

 

या अशा बऱ्याच सीन्समुळे आणि बोल्ड विषयामुळे या सिनेमावर भारतात बंदी आली होती, पण तरीही या सीनची खूप चर्चा आणि आलोचनासुद्धा झाली!

२. अमृता अरोरा – इषा कोप्पीकर (गर्लफ्रेंड) :

 

 

बॉलिवूडचा आणखीन एक बोल्ड कमर्शियल सिनेमा म्हणजे गर्लफ्रेंड. यात बऱ्यापैकी उघडपणे समलैंगिक नात्यांवर भाष्य केलं गेलं. शिवाय या सिनेमातही अमृता आणि इषा यांच्यात बरेच बोल्ड सीन्स शूट करण्यात आले होते.

या सिनेमात थेट नग्नता किंवा कीसिंग सीन्स नव्हते पण तरी यातली बरीच दृष्य ही तेव्हाच्या मानाने चांगलीच बोल्ड होती आणि त्याची चांगलीच चर्चा झाली!

३. सनी लियॉनी – संध्या मृदुल (रागिणी एमएमएस २) :

 

पॉर्नस्टार म्हणून प्रसिद्ध असलेली सनी लियॉनी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हाच तिने सर्वत्र खळबळ माजवली होती. बॉलिवूडमध्ये येऊनसुद्धा तिच्या बोल्ड पॉर्नस्टार या इमेजने काही तिचा पिच्छा सोडला नाही.

एकता कपूरच्या रागिनी एमएमएस २ या सिनेमात तिने लोकप्रिय अभिनेत्री संध्या मृदुलसोबत एक लिपलॉक सीन दिला. सनीला या सगळ्याची सवय असली तरी आपल्या भारतीयांना या गोष्टी तशा नवीनच होत्या.

या कीसिंग सीनची चांगलीच चर्चा झाली शिवाय या सिनेमातल्या आणखीनही काही बोल्ड सीन्सने तेव्हा चांगलंच वातावरण तापलं होतं!

४. प्रिया बापट – गीतिका त्यागी (सिटी ऑफ ड्रीम्स) :

 

 

बॉलिवूड अभिनेत्रीच नव्हे तर मराठी अभिनेत्रीसुद्धा यात मागे नाहीत. स्वतःच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि लाजवाब अभिनयासाठी लोकप्रिय असलेली प्रिया बापट हिनेसुद्धा एक सीन देऊन मध्यंतरी खळबळ माजवली होती.

नागेश कुकुनूरच्या सिटी ऑफ ड्रीम्स या हॉटस्टारवरील वेबसिरीजमध्ये गितीका त्यागी या अभिनेत्रीसोबत एक चांगलाच मोठा लेसबीयन लिपलॉक सीन दिला होता.

त्यावेळेस या सीनची चांगलीच चर्चा झाली आणि यावरून प्रिया बापटलादेखील प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं!

५. लिसा रे – व्हीजे बानी (फोर मोर शोट्स प्लीज) :

 

 

तथाकथित फेमीनिजम आणि स्त्रीसशक्तीकरण यावर भाष्य करणारी amazon prime वरची ‘फोर मोर शोट्स प्लीज’ ही वेबसिरीज वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत होती.

त्यातले सीन्स, त्यातून केलेलं भाष्य, बोल्ड कंटेंट यासाठी या सिरीजची चांगलीच आलोचना झाली. पण त्याहीपेक्षा बानी आणि लिसा रे यांच्यातल्या बऱ्याच बोल्ड सीन्सची सर्वात जास्त चर्चा झाली.

लिसा रे हे नाव याआधीही बऱ्याचदा अशा कारणांसाठी चर्चेत आलं असलं तरी या सिरीजमध्ये त्या दोघींनी सगळी बंधनं झुगारून बिनधास्तपणे सीन्स दिले होते!

फक्त अभिनेत्रीच नव्हे तर कित्येक अभिनेत्यांनीसुद्धा अशाच प्रकारचे वादग्रस्त बोल्ड सीन्स दिले आहेत. रणदिप हुडा, राहुल बोस पासून आयुष्यमान खुरानासारख्या अभिनेत्यांनीसुद्धा ऑनस्क्रीन एका माणसाला कीस करण्याचे सीन्स दिले आहेत!

 

 

खरंतर हा सगळा बोल्डनेस याआधीसुद्धा आपल्याकडे होता, आपल्या देशाने कामसूत्रा लोकांना शिकवलं आहे, त्यामुळे आपल्यासाठी या गोष्टी काही नवीन नाहीत, फक्त सध्या ऑनलाइन कंटेंटची चलती असल्याने आपल्याला या सगळ्या गोष्टींचं अप्रूप वाटतं इतकंच!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version