Site icon InMarathi

थंडीच्या दिवसात दही खावं की नाही? बघा आयुर्वेद काय सांगतंय…

curd in winter im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थंडीच्या दिवसांत दही खावं की खाऊ नये यावरून लोकांची वेगवेगळी मत आहेत. थंडीच्या दिवसांत चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह प्रत्येकाला होतो. गरम, पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेऊन स्वतःच्या शरीराचं थंडी पासून रक्षण करणे गरजेचेच आहे. परंतु ऋतूनुसार आहार बदल करावा लागतो, परंतु सगळ्यांनाच ते शक्य होत नाही.

गरमीच्या मौसमात थंडावा देणाऱ्या दह्याला थंडीमध्ये थेट सुट्टी द्यायची म्हणजे जिकरीचं काम. काही पदार्थ जसे की गरमागरम पराठे, धपाटे किंवा थालिपिठं यांच्या सोबतीला दही नसेल तर काय मज्जा? बाजारात फेरफटका मारताना नजर दहीवड्यावर गेली किंवा तुम्हाला चाटच्या ठेल्यावर दहीपुरी, दहीकचोरी खाण्याची इच्छा झाली तर स्वतःला आवरणे निव्वळ अशक्य! मात्र थंडीच्या दिवसांत त्रास होईल म्हणून अनेक जण दही खाणे सोडून देतात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

दह्यामध्ये काही पौष्टिक गुण असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टरिया आपली पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. तसेच दह्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. तरीही थंडीच्या दिवसात मात्र दही घेणे योग्य की अयोग्य हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दह्याच्या बाबतीत काय सांगत आयुर्वेद ?

आयुर्वेदात हिवाळ्यात दही न खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, की थंडीमध्ये दही जितके टाळाल तितके चांगले. त्यामुळे ग्रंथींचा स्राव वाढतो. दह्यामुळे घशात चिकट कफ तयार होऊन शरीराच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो.

 

 

दही हे कफ प्रकृतीचे असल्याने ज्यांना आधीच दमा, सायनस किंवा सर्दी आणि खोकला यांसारख्या श्वसनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ते कठीण होऊ शकते. परंतु दही शरीरासाठी गुणकारी असल्याने थोड्या प्रमाणात त्याचे सेवन करणे योग्य राहील. दह्यापासून कढी किंवा तत्सम पदार्थ बनवून सेवन केल्यास हीतकारक ठरते.

संध्याकाळी पाच नंतर दही खाणे टाळावे 

दह्यामध्ये भरपूर चांगले बॅक्टेरिया असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रयत्नपूर्वक फरमेंट केल्याने दही हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. यात असलेले व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस शरीरासाठी उपयुक्त आहे.

आयुर्वेदानुसार ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे त्यांनी संध्याकाळी ५ नंतर दही खाणे टाळावे. यामुळे जास्त प्रमाणात कफ होऊ शकतो.

 

दुपारच्या जेवणात दही खाणे उत्तम –

दिवसभरात दुपारच्या जेवणात दही खाल्ल्याने आरोग्याला कोणतीही हानी होत नाही, उलट आरोग्य सुधारते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवसा दही खाणे देखील रात्रीपेक्षा सुरक्षित मानले जाते. ज्या लोकांना थंड पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांनी मात्र दह्याबाबत विशेष काळजी घ्यावी.

 

 

हिवाळ्यात तुम्हाला तुमचे आवडते दही खाणे पूर्णपणे सोडून द्यावे लागणार नाही हे तुम्हाला कळलेच असेल. जेव्हा तुम्हाला सर्दी आणि ताप असेल तेव्हा मात्र दह्याचे सेवन टाळा.

सध्या कोरोनाचा विळखा वाढत असून घराघरात ताप, सर्दी, खोकला असे विकार बळावत आहेत, त्यामुळे असा कोणताही आजार असेल तर काही दिवसांसाठी दह्याकडे पाठ फिरवा. तब्बेत सुधारल्यानंतर काही प्रमाणात दही खाता येईल.

तसेच फ्रिजमध्ये ठेवलेलं दही लगेच न खाता खोलीच्या तापमानावर आणा आणि नंतर खा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version