अॅक्टिंग नव्हे, तर या साईड बिझनेसमधून कलाकार होतायेत करोडपती…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बॉलिवूड स्टार्स आपल्या महागड्या लाईफ स्टाईलसाठी प्रसिध्द आहेत. लक्झरी गाड्या, ब्रँडेड कपडे, सी फेसिंग घर, विदेशी ट्रिप यावरून त्यांच्या लाईफ स्टाईलबद्दल आपण कल्पना करू शकतो.
वर्षाला एक किंवा फार तर दोन चित्रपट देणारे हे स्टार्स इतका अमाप खर्च कसा बरं करत असतील? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की हे लोक चित्रपटासाठी घेण्यात आलेल्या मानधनाशिवाय खासगी सोहाळ्यांना उपस्थित राहून लाखो – करोडो रुपये कमवतात.
१. कतरिना कैफ –
कतरिना कैफ ही बॉलीवूड मधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच कतरिना एक कमाल डान्सर सुद्धा आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी कतरिना तब्बल ३.५ कोटी रुपये घेते.
२. शाहरुख खान –
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखला देश – विदेशातून अनेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. यासाठी शाहरुख ३.५ कोटी इतकी रक्कम आकारतो. एवढ्या पैशांमध्ये तर सामान्य लोकांची हजारो लग्न लागू शकतात.
३. अक्षय कुमार –
अक्षय कुमारला देखील प्रचंड मागणी असते. आपल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून देखील तो खासगी सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारतो. या साठी तो २.५ कोटी एवढी रक्कम घेतो.
—
- विकृत बॉलिवूडचे आणखी एक उदाहरण: मृणाल ठाकूरने सांगितली विचित्र आठवण
- राजकुमारशी पटत नव्हते पण ‘एका’ अटीवर केला नानांनी ‘तिरंगा’ चित्रपट…
—
४. प्रियांका चोप्रा –
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राला ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. मोठमोठ्या सोहाळ्यांना उपस्थित राहण्यासाठी प्रियंका २.५ कोटी घेते.
५. हृतिक रोशन –
हँडसम हंक हृतिक रोशनला ‘ग्रीक गॉड’ देखील म्हंटले जाते. नंबर वन डान्सर असलेल्या हृतिकला लग्न सोहळ्यात डान्स करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जर तुमच्या लग्नात तुम्हाला हृतिकला डान्स करायला बोलवायचं असेल तर २.५ कोटी रुपये द्यावे लागतील.
६. रणवीर सिंग –
बॉलिवूडचा उत्साही अभिनेता रणवीर सिंग कोणत्याही सोहळ्याची शान वाढवतो. खासगी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रणवीर १ कोटी एवढी रक्कम घेतो.
७. सलमान खान –
स्वतः लग्न केलेलं नसलं, तरी सलमान भाई दुसऱ्यांच्या लग्नाला उपस्थित राहतो. सलमान खानला लग्नात बोलवायचं झाल्यास किमान २ कोटी रुपये खर्च करावे लागतील.
८. दीपिका पदुकोण –
रणवीर सिंगची पत्नी आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील याबाबतीत मागे नाही. खासगी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दीपिका १ कोटी रुपये घेते.
९. रणबीर कपूर –
लाखों तरुणींच्या हृदयाची धडकन असलेल्या रणबीर कपूरच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे कोणत्याही सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रणबीर तब्बल २.५ कोटी रुपये एवढी फी आकारतो.
१०. अनुष्का शर्मा –
भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी बॉलीवूडमधील मुख्य अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का तिच्या सेन्स ऑफ ह्युमर आणि खोडकर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. खासगी सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी ती ८० लाख एवढी रक्कम घेते.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.