Site icon InMarathi

जॅकलिन ते मंदाकिनी, बॉलीवूड अभिनेत्री आणि त्यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन

underworld inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध फार जुने आहे. सर्वसामान्य लोकांना कल्पनाही नसते, पण ड्रग्स, बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यात फार जवळचा संबंध आहे.

जेव्हापासून मुंबईत अंडरवर्ल्ड सक्रिय झाले तेव्हापासूनच बॉलिवूड आणि संपूर्ण देशच ड्रग्सच्या विळख्यात सापडलाय. अर्थात हे काही लपवून ठेवलेले नाही तर जगजाहीर आहे. इतके जगजाहीर, की त्यावर सर्रास चित्रपट देखील बनतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी करीम लाला व हाजी मस्तानपासून अंडरवर्ल्ड व बॉलिवूड एकमेकांच्या संपर्कात आहेत. करीमलाला हा खरं तर अफगाणिस्तानचा कपड्यांचा व्यापारी! पण या व्यापारामुळे तो मुंबईत आल्यावर त्याची चित्रपटसृष्टीतील अनेकांशी ओळख झाली.

करीमलालानेच त्याच्या आणखी एका बिझनेस पार्टनरबरोबर मिळून बॉलिवूडमधील अनेकांना ड्रग्सच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर आला हाजी मस्तान! तो ही ड्रग्सच्या तस्करीच्या धंद्यात उतरला आणि त्याने भरपूर पैसा कमावला.

मुंबईतच असल्याने त्याचाही सिनेसृष्टीशी जवळून संबंध आला. यानंतर आलेल्या दाऊद इब्राहिमने या सगळ्यांच्या पुढे जात काय केले हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याने त्याचे नेटवर्क आशिया आणि आफ्रिका खंडात पसरवले.

दाऊद व बॉलिवूड यांच्यातील नाते तर सर्वश्रुतच आहे. अनेक सिनेस्टार्स त्याच्या अवतीभवती नाचत असत. तर असे हे ड्रग्स आणि पैसा यामुळे बॉलिवूड व अंडरवर्ल्ड यांच्यात जवळचे नाते तयार झाले.

मनी लाँड्रिंग असो, ड्रग्जचा व्यवहार असो किंवा फसवणूक असो, हे सर्व आरोप बॉलिवूडवर झाले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हाही अशी प्रकरणे समोर आली आहेत, तेव्हा त्यांचे संबंध कोणत्या ना कोणत्या मार्गाने अंडरवर्ल्डशी जोडले गेले आहेत.

नुकतेच घडलेले प्रकरण जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याशी संबंधित आहे, ज्याने परत बॉलिवूडचे नाव चर्चेत आले आहे. ईडीने आरोपी सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

 

 

असे घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गुन्हेगारांशी संबंध आलेल्या अनेक नट्यांबद्दल असा खळबळजनक खुलासा यापूर्वी देखील अनेकदा झाला आहे. बॉलिवूडमध्ये अश्या अनेक नट्या आहेत, ज्यांनी चक्क गँगस्टर लोकांशी सूत जुळवले आहे.

१. सोना मस्तान मिर्झा

 

 

असे म्हणतात, की कुख्यात गँगस्टर हाजी मस्तान चक्क मधुबालाच्या प्रेमात पडला होता, पण दुर्दैवाने तिला भेटण्याआधीच तिचे अकाली निधन झाले. तेव्हा हा डॉन खूप दुःखी झाला होता.

काही वर्षांनंतर तो सोना मस्तान मिर्झा ह्या बॉलिवूड नटीच्या प्रेमात पडला. या दोघांनी १९८४ मध्ये लग्न केले. २०१० मध्ये आलेला ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ हा चित्रपट त्यांच्या रोमान्सचे काल्पनिक चित्रण असल्याचे सांगितले जाते.

२. जस्मिन धुन्ना

 

 

जस्मिन धुन्ना ही १९८० च्या दशकातील बऱ्यापैकी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती, मात्र नंतर तिचे नाव डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले आणि नंतर ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली.

३. मंदाकिनी

 

 

‘राम तेरी गंगा मेली’ या चित्रपटातून नावारूपाला आलेल्या मंदाकिनीचे त्याकाळी अनेक फॅन्स होते. धबधब्यात भिजलेली पांढऱ्या साडीतील मंदाकिनी अनेकांची स्वप्नसुंदरी झाली होती. त्यावेळी मंदाकिनी ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती, पण दाऊद इब्राहिमसोबतचा तिचा फोटो लीक झाल्यानंतर तिची कारकीर्दच संपुष्टात आली.

तिने डॉनशी लग्न केल्याची अफवा होती. अशी चर्चा होती की ते दोघे दुबईत राहत होते आणि त्यांना एक मूल होते. जरी तिने अनेक मुलाखतींमध्ये या अफवांचे खंडन केले असले तरी, ती दाऊदची मैत्रीण असल्याच्या आरोपातून ती स्वतःला कधीही सोडवू शकली नाही.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद फरार झाला तेव्हा गोष्टी आणखीच बिघडल्या. तपासापासून दूर राहण्यासाठी मंदाकिनी बेंगळुरूमधील सेफ हाऊसमध्ये गेल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

४. मोनिका बेदी

 

काही मोजक्या चित्रपटांमध्ये झळकलेली नटी मोनिका बेदी ही गँगस्टर अबू सालेमसोबतच्या तिच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत आली. त्यासाठी तिला अटकही झाली होती.

मोनिका बेदी व अबू सालेम ह्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. तिची व अबू सालेमची भेट १९९८ साली दुबईत झाली. तेव्हा त्याने तिच्यापासून स्वतःची खरी ओळख लपवली होती, पण जेव्हा तिला सत्य कळले तरीही तिने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले.

सालेमने अनेक निर्मात्यांना मोनिका बेदीला चित्रपटात घेण्यासाठी धमकावले होते. डॉनशी असलेल्या संबंधांमुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली होती.

५. ममता कुलकर्णी

 

८० व ९०च्या दशकातील प्रसिद्ध हिरोईन ममता कुलकर्णीने ‘बाजी’ आणि ‘करण अर्जुन’ सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या, तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिचे मुंबईतील डॉन छोटा राजनसोबत अफेअर होते.

छोटा राजन स्वतःच्या पावर आणि पोझिशनचा फायदा घेऊन ममता कुलकर्णीला मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये घ्यावे यासाठी दिग्दर्शकांना धमकावत असे. तिने नंतर व्यापारी आणि कथित अंमली पदार्थ तस्कर विक्रम गोस्वामी उर्फ विकीबरोबर सूत जमवले.

तो राजनच्या अगदी जवळचा होता. तिचे व छोटा राजनचे ब्रेकअप झाले, पण ती विकीसोबत केनियामध्ये बराच काळ राहिली. तो तिथून बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना स्वतःच्या तालावर नाचवत असे असे सांगण्यात येते. काही काळानंतर ममता कुलकर्णी व गोस्वामी ह्या दोघांनाही अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

६. अनिता अयुब

 

 

अनिता अयुब नावाची एक पाकिस्तानी अभिनेत्री दाऊदच्या विशेष जवळची होती. तिने काही भारतीय चित्रपटांमध्येही काम केले होते. चित्रपट निर्माते जावेद सिद्दीकी यांची दाऊदच्या टोळीतील सदस्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती कारण त्यांनी अनिता अयुबला चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर त्यांचे नाते वादाच्या भोवऱ्यात आले होते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version