Site icon InMarathi

अंडरगारमेंट्सही इतरांनी वापरलेले घालते ही मुलगी, यामागे आहे ग्रेट लॉजिक

garments inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सर्वसाधारणपणे आपल्याला दुसऱ्याने वापरलेले कपडे वापरायला आवडत नाहीत. पूर्वी मोठ्या भावंडांचे कपडे लहान भावंडे सर्रास वापरत असत. त्यात कुणाला कमीपणा वाटत नसे. त्यामुळे आईवडिलांचे पैसे तर वाचत असत शिवाय नकळत पर्यावरण संवर्धनाचा उद्देश देखील साध्य होत असे.

पण नंतर काळ बदलला. दुसऱ्याने वापरलेले गणवेश ,कपडे वापरणे कमीपणाचे किंवा अनहायजिनिक वाटू लागले. अंतर्वस्त्रे तर दुसऱ्याची वापरूच नयेत हे तर नक्कीच आपण आवर्जून पाळतो, पण बेकी ह्यूज नावाची ही मुलगी मात्र इतरांनी वापरलेले कपडे अगदी अंतर्वस्त्रे सुद्धा सेकण्ड हॅन्ड वापरते.

गेल्या दोन वर्षांपासून अंतर्वस्त्रांपासून ते बाहेर जायचे कपडे केवळ सेंकड हॅन्ड खरेदी करण्याचे वचन देऊन बेकीने हजारो लोकांची मदत केली आहे.

 

 

ब्रिटनमध्ये राहणारी बेकी ह्यूज ही एका धर्मादाय संस्थेसाठी मार्केटिंगमध्ये काम करते आणि म्हणते, की तिने तिच्या आयुष्यातून फास्ट फॅशन पूर्णपणे वजा करून टाकली आहे.

एकीकडे मुलींना शॉपिंगची अतिरेकी आवड असते. प्रत्येक प्रसंगासाठी नवेनवे कपडे खरेदी करण्याचा सध्या ट्रेंड असताना बेकीने मात्र हे वेगळेच पाऊल उचलले आहे.

वॉल्व्हरहॅम्प्टनमध्ये राहणाऱ्या बेकीने २०१८ पासून फक्त सेकंड-हँड कपडे खरेदी केले आहेत आणि चॅरिटी शॉप्स आणि विंटेड सारख्या ऍप्सवरून खरेदी करून हजारो रुपयांची बचत केली आहे.

 

 

बेकीने डिझायनर व्हॅलेंटिनो टॉपसह अनेक वस्तू फक्त £4 मध्ये विकत घेतल्या आहेत, ज्याची किंमत नवीन खरेदी केल्यास £500 पेक्षा जास्त असेल.

बेकी म्हणजे की, “मी आता खरोखर खूप आनंदी आहे कारण मी फास्ट फॅशन खरेदी करणे थांबवले आहे. पूर्वी, मी बाहेर जाण्यासाठी लागणारे नवीन कपडे घेण्यासाठी आठवड्याला £20 खर्च करत असे., पण आता मी तो खर्च खूप कमी केला आहे. मी एक तरुणी आणि फॅशनची आवड असलेली व्यक्ती असून देखील सतत बदलणाऱ्या फॅशन ट्रेंड्सकडे दुर्लक्ष करून आता मला जे आवडते त्यावर लक्ष केंद्रित करता येते आहे. यामुळे मला खरोखर छान वाटतेय.”

बेकी, इतर बर्‍याच जणांप्रमाणे अंतर्वस्त्रे सेकंडहँड खरेदी करताना खूप काळजी घेते, पण तिने विंटेडमधून अंतर्वस्त्रे खरेदी केली आहेत. ती सांगते की नेहमीप्रमाणेच ती या कपड्यांची सुद्धा खरेदी करते आणि ते कपडे स्वच्छ धुवून घेऊन मगच वापरते.

ती सांगते की,”सेकण्ड हॅन्ड अंतर्वस्त्रे वापरल्याने मला अजिबात त्रास होत नाही, परंतु काही लोक असे का करू इच्छित नाहीत हे ही मी नक्कीच समजून घेऊ शकते. कपड्यांबद्दलचा माझा दृष्टीकोन आणि कपडे कसे वापरायचे हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.”

बेकीने स्वतःच्या कपड्यांची विक्री करून देखील काही पैसे कमावले आहे. स्वतःच्या कपड्यांची विक्री करून तिने £bir2,000 कमावल्याचा अंदाज आहे.

 

 

ती सांगते की, “मी एकदा एखादा ड्रेस घालते, आणि नंतर तो पुन्हा घालू इच्छित नाही कारण मी त्या ड्रेसमध्ये इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलेला असतो. आता जेव्हा मी कपड्यांची खरेदी करते, तेव्हा मी ते कपडे केव्हा घालेन याचा मी काळजीपूर्वक विचार करते. तसेच माझी नवीन खरेदी व आधीपासून माझ्याकडे असलेले कपडे एकमेकांबरोबर मिक्स अँड मॅच करून घालता येतील का हा विचार मी करते.

कपडे खरेदी करण्याच्या एकूणच प्रोसेसबाबत मी खूप स्लो आहे. मला काही कपडे आवडतात, पण ते मी लगेच खरेदी करत नाही. मी एक किंवा दोन दिवसांनी त्यांचे पुनरावलोकन करते आणि मग वाटले तर कपडे खरेदी करते.

आपण वापरून टाकून दिलेल्या वस्तू कचरा म्हणून लँडफिल्स मध्ये पडून राहतात आणि त्यामुळे पर्यावरणाची देखील प्रचंड हानी होते. हे मला अजिबात पटत नाही. तुमच्याकडेही जर असे काही कपडे पडून असतील जे सुस्थितीत असतील, पण तुम्ही ते वापरणार नसाल तर ते नक्कीच तुम्ही विकू शकता. ते कपडे चांगले असतील तर नक्कीच कुणीतरी विकत घेऊन आवडीने वापरेल. व तुम्हालाही त्यातून फायदाच होईल. त्यामुळे ही विन -विन सिच्युएशन आहे.”

 

 

बेकीने स्वतःच्या बचतीसाठी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलले आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आपण देखील असे काहीतरी नक्कीच करू शकतो. सुस्थितीतील कपडे जर गरजूंना वापरायला दिले किंवा सेकण्ड हॅन्ड बाजारात विकले तर कचरा देखील कमी होईल आणि तुमच्या घरातील अडगळ कमी होईलच शिवाय तुम्हाला आर्थिक फायदा देखील होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version