Site icon InMarathi

हिटलरने आपल्या नाझी पक्षाचे चिन्ह म्हणून भारतीय “स्वस्तिक” का निवडले?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष आजही आपल्या सर्वांसाठी कुतूहलाचा विषय आहे. त्या कुतूहलात अधिक भर टाकतो हिटलरच्या नाझी पक्षाचे चिन्ह जे आहे स्वस्तिक! तुम्हाला देखील बऱ्याचवेळा प्रश्न पडले असतील, स्वस्तिक तर हिंदू धर्मातील चिन्ह, मग ते जर्मनी सारख्या देशात जेथे त्या काळी हिंदू नव्हतेच तेथे पोचलं कसं?

पोचलं ते पोचलं पण हिटलरने आपल्या पक्षाचं चिन्ह म्हणून स्वस्तिकला स्थान देण्याइतपत त्याच्या लेखी या चिन्हाच महत्त्व काय होतं?

चला तर आज जाणून घेऊया या चिन्हामागचा इतिहास आणि त्याचा नाझी पक्षाच्या चिन्हापर्यंतचा प्रवास!

 

स्वस्तिक हे भारतातील धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेले असे एक चिन्हं आहे. हिंदु, बौद्ध आणि जैन धर्माच्या संस्कृतीतही स्वस्तिकाला विशेष म्हत्त्व आहे. शुभ संकेताचे चिन्हं म्हणून स्वस्तिकाचा आपण प्रामुख्याने वापर करतो. स्वास्तिकाच्या या चिन्हाला हजारो वर्षांचा इतिहास आहे.

स्वस्तिकाचा सर्वात पहिला वापर इसवी सन पूर्व १० हजार वर्षांपूर्वी दगडांच्या शिल्पावर केलेला आढळला होता. त्यानंतर स्वास्तिकाचा वापर रशियाच्या सीमेजवळ असलेल्या मेझिनच्या आसपास इमारतींच्या बांधकामांवर पाहायला मिळतो.

पक्षी किंवा इतर शिल्पांवर हे स्वस्तिक काढल्याचे पाहायला मिळते. अश्मयुगातील ही शिल्पे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

तसेच हस्ती दंताचा वापर करून तयार केलेल्या शिल्पावरही मोठ्या प्रमाणावर स्वस्तिक असल्याचे पाहायला मिळते. अश्मयुगाच्या संस्कृतींमध्ये स्वस्तिक हे भरभराटीचे चिन्हं समजले जात होते.

 

booksfact.com

हस्तीदंतापासून तयार करण्यात आलेल्या विविध शिल्पांवर करण्यात आलेल्या कोरीव कामांमध्ये स्वस्तिक असल्याने आणि मुळात हत्तीच भरभराटीचे प्रतिक मानले जात असल्यानेही स्वस्तिकाच्या चिन्हाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते.

युरोप खंडामध्ये स्वस्तिकाचा वापर करण्याची सुरुवात दक्षिण पूर्व युरोपमध्ये आढळणाऱ्या नेओलिथिक विंका संस्कृतीमध्ये झालेली असावी.

 

 

सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती अस्तित्वात होती. त्यानंतर कास्ययुगापर्यंत संपूर्ण युरोपमध्ये स्वस्तिकच्या चिन्हाचा प्रसार झाला होता.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पाश्चिमात्य देशांमध्येही स्वस्तिक हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले होते.

त्यानंतर जाहिरात, डिझाइन एवढंच काय पण हॉकीच्या जर्सीवरही स्वास्तिकाची चिन्हे पाहायला मिळू लागली होती. सर्वांमध्येच स्वस्तिक हे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले होते. अगदी अमेरिकन मिलिट्रीच्या काही ट्रूप्सनेही पहिले महायुद्ध आणि त्यांच्या आरएएफ विमानांवर १९३९ च्या दरम्यान स्वस्तिकाचा वापर केला होता.

 

bbc.com

या सर्वांनंतर हिटलरचे युग होते. त्याने स्वस्तिकाचा असा वापर केला की, त्याची ओळखच पूर्णपणे बदलून गेली. काही जर्मन विद्वानांनी संस्कृत भाषेतील स्वस्तिकाचा वापर आणि त्यांच्या जर्मन भाषेतील वापर यातीस साम्य शोधायला सुरुवात केली.

या अभ्यासातून नाझींच्या असे लक्षात आले की, त्यांच्या आणि भारतीयांच्या वंशजांमध्ये किंवा पुराण काळातील देवांमध्ये काही साम्य होते. त्यांच्या मते आर्यांप्रमाणेच त्यांचे देवही प्राचीन होते.

काही दिवसांतच १९३९ मध्ये नाझींची सत्ता आली. ज्यू लोकांना संपवण्याचा आदेश देण्यात आला आणि त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार माजला. त्यामुळे नाझींनी त्यांचे चिन्हं म्हणून वापरलेले स्वस्तिक हे इतिहासातील सर्वात क्रूर घटना घडवण्याऱ्यांचे प्रतिक ठरले.

 

नाझींच्या क्रूर धोरणाचा प्रसार आणि अंमलबजावणीसाठी वापर करण्यात येणारे हे स्वास्तिकाचे चिन्ह हळू हळू अत्याचार आणि हिंसाचाराचे प्रतिक बनले. हे चिन्ह पाहताच ज्यू लोकांच्या मनात धडकी भरू लागली होती.

हिटलरने घडवून आणलेल्या नरसंहाराची ते कायमची आठवण बनले. या नरसंहारात सुमारे ६० लाख ज्युंची हत्या करण्यात आली होती. २००७ मध्ये जर्मनीने या नाझी स्वस्तिकावर बंदी घातली.

 

 

स्वस्तिक हे प्रामुख्याने धार्मिक चिन्हं म्हणून वापरले जाते. विशेषतः मध्य आशिया आणि आशियातील देशांमध्ये त्याला मोठे महत्त्व आहे. त्यावर बंदी घातल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना त्याचा त्रास होतो. अनेक पर्यटकांना माहिती नसल्याचे त्यांना शिक्षेला पात्र ठरावे लागते.

 

disneyvillains.wikia.com

अत्यंत शुभ मानले जाणारे असे हे चिन्ह मात्र ज्यू धर्मियांमध्ये अत्यंत अपवित्र मानले जाते. इतके की त्याचा वापर किंवा त्याचं दर्शनही अमंगळ ग्राह्य असल्याने कुठेही वापरणे एक गुन्हा ठरतो. ज्यू धर्मिय ह्याच स्वस्तिकाला कुठेही थारा देत नाहीत. हे चिन्ह त्यांच्या देशातून म्हणजे जर्मनीतून हद्दपार केलेलं आहे.

का असेल इतका द्वेष ह्या चिन्हामागे? कारणही तसंच आहे.

ज्यूंचा झालेला अमानुष नरसंहार. ज्यू धर्माला आणि त्या धर्मातील लोकसमूहाला समूळ नष्ट करण्यासाठी जर्मनीचा सर्वे-सर्वा असणाऱ्या ऍडॉल्फ हिटलर ने जणू विडाच उचलला होता. ना भूतो ना भविष्यती अश्या कत्तली करण्यात आल्या. असतील तिथे त्यांना ठेचण्यात आलं. जे जिवंत राहिले त्यांनी कसेबसे देशातून पलायन केले आणि स्वतः चा जीव वाचवला.

जेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य असताना जी भारतीयांची ससेहोलपट झाली होती तशी किंबहुना त्याहून कितीतरी अधिक पटीने ज्यू लोकांचे हाल झाले होते.

अर्थातच हिटलर संबंधित सगळ्याच गोष्टींशी ज्यूंच्या पुढील पिढ्यांना घृणा वाटणे, चीड वाटणे साहजिकच आहे. त्यातच काळ्या रंगाचे स्वस्तिक हेच चिन्ह होते हिटलरचे म्हणजेच नाझी पक्षाचे आणि तत्कालिक जर्मनीच्या ध्वजाचे. ज्याचा उपयोग शुभ कृत्यांसाठी नसून विघातक कृत्यांसाठी झाला.

 

 

जगातील काही घटकांनी पवित्र मानलेलं, भक्ती आणि शक्तीशी निगडित असणारं शुभ चिन्हच का घेतलं नाझी सत्तेतील दुष्टकर्मीयांनी हा प्रश्न साहजिकच पडेल.

हिटलरने केलेल्या हिंसाचारासारख्या क्रूर घटना कधीही विसरता येत नाहीत. तरीही स्वस्तिकाचे पावित्र्य हळू हळू किमान स्वस्तिकाबाबतच्या वाईट आठवणी कमी करेल अशी आशा करायला हरकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version