Site icon InMarathi

पर्रीकरांच्या नावावर भाजपने गोव्यात सत्ता उपभोगली, पण त्यांच्या मुलाला भाजप तिकीट का देत नाही?

utpal inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशात आज दोन विषयांची चर्चा होताना दिसून येते ते म्हणजे राज्यांच्या निवडणुका आणि ओमिक्रोनचा वाढता धोका, आपली सत्ता यावी यासाठी राजकीय पक्ष कोरोना निर्बंधांना पायदळी तुडवत आहेत तर दुसरीकडे सामान्य माणसाला निर्बंधाखाली जगावे लागत आहे.

निवडणुका म्हंटल्या, की पक्षाकडून तिकीट वाटप होतेच, पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या व्यक्तीला साहजिकच अपेक्षा असते ती म्हणजे आपल्याला तिकीट द्यावे, मात्र ही अपेक्षा पूर्ण झाली नाही की ती व्यक्ती नाराज होऊन पक्ष सोडण्याचा विचार करते…

सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने पक्षाने नाकारलेले असे अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जात आहे, अशीच एक व्यक्ती सध्या नाराज आहे ती म्हणजे उत्पल पर्रीकर…स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र, पक्षाने तिकीट नाकारल्याने ते सध्या नाराज आहेत नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात..

 

indiatimes.com

गोवा निवडणुकांच्या धर्तीवर अनेक राजकीय व्यक्तींनी गोव्यात येऊन आपापल्या पक्षाच्या लोकांच्या भेटी घेतल्या, भाजपकडून देवेन्द्र फडणवीस यांना गोव्यातील निवडणुकांचे प्रभारी म्हणून काम करत आहेत, काही दिवसांपासून ते सातत्याने गोव्यात येऊन पक्ष संघटनेचे काम करत आहेत, खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येऊन गेले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

गोवा राज्याच्या राजकीय इतिहास बघता काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये कायमच चुरस असायची. तसेच इतर प्रादेशिक पक्ष देखील सक्रिय आहेत. तृणमुल काँग्रेस, आप यासारख्या पक्षांनी देखील आता गोव्या सारख्या राज्याला आपले लक्ष केले आहे.

 

india.com

 

गोवा म्हंटल, की भाजपकडून एकच नाव यायचं ते म्हणजे मनोहर पर्रीकर, त्यांच्या कर्तृत्वाचे आणि गोव्याच्या विकासाचे किस्से आपण ऐकतच आलो आहोत. ज्या गोव्यामध्ये भाजपचे सरकार येईल अशी अपेक्षा नसताना मनोहरजींनी आपल्या अथक प्रयत्नाने गोव्यात सत्ता आणली

आज त्यांचा मुलगा वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत निवडणुकांमध्ये उतरत आहे, साहजिकच भाजपकडून तो उभा राहणार मात्र पक्षाने त्याला तिकीट देण्यास नकार दिला आहे. पक्ष श्रेष्टींकडून हा निर्णय घेतला गेला आहे असेही म्हंटले जात आहे…

 

उत्पल पर्रीकर हे वडिलांप्रमाणे इंजिनियर असून अमेरिकेमध्ये त्यांनाही जवळजवळ १० वर्ष वास्तव्य केले आहे. २०१९ साली वडिलांच्या निधनांनंतर ते पणजी मतदार संघातून पोटनिवडणूक लढवणार का? अशी चर्चा होती मात्र तेव्हा ते उत्सुक नव्हते.

वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला होता. आत त्यांनी निवडणुकीत रस दाखवल्याने भाजपपुढे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, भाजपने पणजी मतदार संघातून सिद्धार्थ कुंकलेकर या तरुण उमेदवाराला संधी दिली आहे..

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उत्पल यांचे तिकीट नाकारल्याने साहजिकच  त्याचा रोष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येणार, मात्र ते माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की, एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून पक्ष एखाद्याला तिकीट देऊ शकत नाही.

 

the economic time

उत्पल यांनी एका मुलाखतीत यावर उत्तर दिले ते असे म्हंटले की गोव्यात जे राजकरण सुरू आहे ते मला मान्य नाही. त्यांना विजयी होणे ही मुख्य गोष्ट वाटते का? प्रामाणिकपणे आणि स्वच्छ चरित्र चालत नाही का? तुम्ही गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या व्यक्तींना तिकीट देणार? मग मी का गप्प बसू? असं संतप्त सवाल त्यांनी केला.

आपमध्ये जाणार?

गोवा निडवणुकांच्या एका सर्व्हेनुसार, यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपनंतर कोणता मोठा पक्ष असेल तर तो आप असणार आहे असे सर्व्हेमधून निष्कर्षात आले आहे. त्यामुळे उत्पल यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने अरविंद केजरीवाल यांनीरविवारी त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

उत्पल पर्रीकर यांनी मात्र कोणावर अवलंबून न राहता घरोघरी जाऊन प्रचाराला सुरवात केली आहे. कदाचित ते अपक्ष म्हणून लढणार असा कदाचित त्यांचा मानस असावा.

 

 

एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये देखील योगी आदित्यनाथ यांचे खास मानले जाणारे ४ नेते पक्ष सोडून गेले आहेत, तसेच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण समाज देखील भाजपवर नाराज आहे, त्यामुळे एकूणच भाजपचा यंदाच्या निवडणुकांमध्ये चांगलाच कस लागणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version