Site icon InMarathi

नखरे नडले आणि -३ डिग्रीत वीणा जगताप पडली ‘दल लेक’मध्ये…

veena jagtap inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

माणसं कधीकधी एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा उगीचच नको तितका बाऊ करतात आणि स्वतःच स्वतःचं हसं करून घ्यायला कारणीभूत ठरतात. कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं ही खरंतर अगदी साधं लॉजिक वापरून ज्याने त्याने समजून घ्यायची गोष्ट आहे, पण कधीकधी आपलं नको तिथे उगीचच भाव खाणं नडतं आणि जिथे समस्याच नसते तिथे आपण उगीच एखाद्या साध्या गोष्टीचा कीस पाडत बसतो.

वीणा जगताप हे नाव काही मराठी प्रेक्षकांसाठी नवे नाही. वीणा जगतापने ‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व गाजवलं होतं. त्यापूर्वी ती ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून लोकांसमोर आली होती, पण वीणा जगताप खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ते बिग बॉस मराठी मुळे. त्यावेळी आणि त्यानंतरही वीणा जगताप आणि शीव ठाकरे च्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

वीणा या शो मध्ये महाअंतिम सोहळ्यापर्यंत टिकली होती. बिग बॉसच्या घरातल्या वीणाच्या खेळाचं कुणी कौतुक केलं तर कुणाला तिचा खेळ आवडला नाही, पण या कार्यक्रमातून वीणा जगताप या नावाला निश्चितच एक वेगळी ओळख मिळाली.

 

 

वीणा जगताप इतक्यातच तिच्या आई आणि मावशीसोबत काश्मीरला फिरायला गेली होती. वीणा, तिची आई आणि मावशी तिथे लँड झाल्या आणि अचानक पाऊसच पडायला सुरुवात झाली. एकूण वातावरणाचा अंदाज घेत त्यांनी तिथे आसपास जरावेळ फिरायचं आणि मग हॉटेलवर मुक्कामाला जायचं असं ठरवलं.

तिथे पोहोचल्यानंतरची पहिली रात्र त्यांना ‘हाऊसबोट’ वर काढावी लागणार होती. ‘हाऊसबोट’ वर जायचं असेल तर शिकाऱ्यातून जावं लागतं. त्यांच्याजवळचं जे बरोबर आणलेलं सामान होतं ते त्यांनी शिकाऱ्यात लोड केलं. त्यानंतर तिथे त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली होती.

तिथे त्यांच्यासाठी जी बसायची व्यवस्था केलेली होती ती थोडीशी ओलसर असल्याचं तिला दिसलं. ते पाहिल्यानंतर त्या तश्या ओलसर ठिकाणी बसायला ती राजी झाली नाही.

आपल्याच तोऱ्यात वीणा तिथली व्यवस्था बघणाऱ्यांना म्हणाली, “हे ओलं आहे. बसायची जागा अशी ओलसर असलेली मला आवडत नाही. एकतर याच्यावर एखादं बेडशीट तरी टाका नाहीतर एखादं कापड तरी टाका.” त्यावर तिथली व्यवस्था बघणाऱ्यांनी अगदी सौजन्याने ती बसायची जागा ओलसर नसून केवळ थंड आहे असं वीणाला सांगितलं.

त्यांनी एवढं सांगूनदेखील “नाही ती जागा ओलसर आहे. मी त्यावर बसणार नाही.”, असा वीणाचा हेका सुरूच होता. तिथलं तापमान तेव्हा अवघं -३ डिग्री होतं. इथलं वातावरणच इतकं दमट आहे की सगळ्याच गोष्टी ओलसर आहेत असं वाटतं असं वीणाला पुन्हा पुन्हा सांगितलं जात होतं. तरीही वीणा काही आपला हट्ट सोडायला तयार नव्हती.

शेवटी कंटाळून “तू आधी आत तर ये. तरीही जर तुला ही बसण्याची जागा ओलसर वाटत असेल तर त्यावर बसू नकोस.”, असं वीणाला सांगितलं गेलं. या सगळ्यानंतरही वीणा आपल्याच तंद्रीत होती. याचा परिणाम असा झाला की वीणाला जेव्हा त्यांनी आत यायला हात दिला तेव्हा वीणा थेट ‘दल लेक’ मध्ये पडली.

 

 

केवळ तिला ओलसर वाटलेल्या पण मुळात नुसत्याच थंड असलेल्या जागेवर बसायला आढेवेढे घेणाऱ्या, नाकं मुरडणाऱ्या वीणाने अश्या प्रकारे ‘दल लेक’ मध्ये पडून स्वतःच स्वतःची फजिती करून घेतली.

झाला प्रकार घडल्यानंतर “जिथे तुझी बसायची जागा आहे ती थंड आहे, ओली नाही. याला म्हणतात ओलं होणं”, असं शेवटी वीणाला ऐकवलं गेलं. झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात अतिशय खेळकरपणे वीणाने हा किस्सा सांगितला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version