आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रोजच्या धावपळीच्या जीवनातून निवांत वेळ म्हणजे सुट्टी!
प्रत्येकाची सुट्टी व्यतीत करण्याची पद्धत असते. कोणाला घरात झोपून राहायला आवडतं, कुणाला लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं,
पण बरेच जण असे असतात जे शांत अश्या जागेच्या शोधात असतात, जेथे त्यांना आराम करायला आणि सुट्टी एन्जॉय करायला मिळेल.
पण शहरात राहून शांततेचं स्वप्न बघणं म्हणजे कठीणचं. हल्ली थंड हवेच्या ठिकाणीही पर्यटकांची इतकी गर्दी दिसते, की तिथे जाऊनही शांतता मिळणं दुर्मिळचं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आपल्या सामान्य माणसाचं सोडा, आपल्या नशिबी शांत जागा येणे तसे कठीणच, पण श्रीमंतांना मात्र शांत जागा हवी असली की जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत, ते शांत जागा पैसे देऊन मिळवू शकतात.
काय म्हणता, असं कसं? अहो जगात अशी काही बेटे आहेत जी चक्क भाड्याने उपलब्ध करून दिली जातात.
तेथे केवळ तुम्ही आणि तुम्ही एकटेच असणार, दुसरं कोणीही नाही.
विश्वास बसत नाही, चला तर मग जाणून घेऊया भाड्याने भेटणाऱ्या या आगळ्या वेगळ्या बेटांबद्दल!
ब्रेकवॉटर आयलँड, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा
या बेटावर दोन बंगले आहेत. मात्र एकावेळी दोन वेगवेगळे ग्रुप त्याचा वापर करु शकत नाही.
वास्तविक कोणत्यातरी एका ग्रुपला पूर्ण सेट दिला जातो. याचे कारण एकाला प्रायव्हसी मिळावे.
या व्यतिरिक्त तुम्हाला हरिण आणि इतर निसर्गातील जीव पाहावयास मिळतील.
येथे भाड्याने बोटही मिळते. जेणेकरून पर्यटक मासेमारी आणि डायविंगचा आनंद घेऊ शकतील. बेटाचे भाडे आहे- २००० डॉलर (१ लाख २५ हजार रुपयांपेक्षा जास्त) आहे, प्रति आठव़डा.
लिस्सेगुन बेट, पापुआ न्यू गिनी
या बेटावर राहणा-यांसाठी केवळ एकच स्थळ आहे जिथे ४ बंगले आहेत.
यात जास्तीत जास्त १४ पाहुणे राहू शकतात. येथे हिरवळीच्या मधे बांबूची बनवलेल्या घरात राहण्याआचा एक वेगळाच अनुभव आहे.
या व्यतिरिक्त सुंदर बीचसह डायविंगचाही आनंद घेतला जाऊ शकतो. बेटाचे भाडे आहे- ७५० डॉलर (४७ हजार रुपयांपेक्षा जास्त) प्रति आठवडा.
–
- हनिमूनसाठी सुट्टी नाहीये? ‘शॉर्ट-स्वीट’ हनिमूनसाठी महाराष्ट्रातले ७ हटके डेस्टिनेशन्स
- पिकनिकला जाताय? जाण्यापूर्वी ही चेकलिस्ट बघूनच जा.
–
होन्डुरास डनबर रॉक
निळ्याशार पाण्यातला या बंगल्याचा केवळ फोटो पाहूनच डोळे निवतील.
होन्डुरासच्या समुद्रकिना-यावर खाडी द्विपसमुहात ग्युनान्झावर ‘डनबर रॉक’ वसले आहे. येथे एक चमकणारा पांढरा बंगला आहे.
येथून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. बंगल्याच्या पाठीमागे सुंदर झाडांचा बाग आहे. येथे प्रत्येक सुखसुविधा उपलब्ध आहे. बेटाचे भाडे आहे- १,२०० डॉलर(७२,५०० रु.) प्रति आठवडा.
द मार्शल बेट
द मार्शल बेट स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे राहण्यासाठी कॅम्पची व्यवस्था आहे. मात्र खराब हवामानात येथे केवळ एका इमारतीचा आधार आहे. बेटाचे भाडे आहे- ५०० डॉलर (३१ हजार रुपयांपेक्षा जास्त) प्रति आठवडा.
ड्रीम आयलँड, फ्रेन्च पॉलिनेसिया
नावाप्रमाणेच स्वप्नवत असे हे आयलंड आहे.
या ड्रीम आयलँडपर्यंत पोहोचणे सोपे नाही. प्रथम टप्प्यात विमानाने ताहितीपर्यंत प्रवास करावा लागतो.
या नंतर १७ किमी मोरियापर्यंत प्रवास करावा लागतो. पुन्हा एका खासगी बोटीने ड्रीम आयलँडचा प्रवास करावा लागतो. येथे तीन इमारती आणि सर्व सुख-सुविधा आहेत. बेटाचे भाडे आहे- २१०० डॉलर (१ लाख ३२ हजार रुपयांपेक्षा जास्त) प्रति आठवडा.
–
- रविवार नेमका कसा एन्जॉय करायचा हे कळत नाहीये? या टिप्स तुमचा संडे परफेक्ट करतील..
- सुट्टीत फिरायला जाताय? या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल!
–
पोरेर बेट, क्रोएशिया
क्रोएशिया हा बेट मुळातच नयनरम्य निसर्गासाठी ओळखलं जातं.
क्रोएशियाच्या पूर्व किना-यावर हे छोटेसे बेट आहे. अर्धा एकरवर पसरलेल्या या बेटावर ३५ मीटर उंचीचा एक दीपगृह आहे. यात चार बेडरुम असलेले रुम्स आहेत. बेटाचे भाडे आहे- ६५० डॉलर (४० हजार रुपये) प्रति आठवडा.
काय म्हणता? जाणार का इथे सुट्ट्या घालवायला? पण तेवढाच खिसा कापला जाईल हे देखील लक्षात ठेवा!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.