Site icon InMarathi

स्पृहाच्या हनीमूनचा धम्माल किस्सा; प्रभुदेवाला सोडून लोकांनी लावल्या तिच्यापुढे रांगा…

spruha joshi inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थाटामाटात किंवा आपल्याला हव्या तशा पद्धतीने लग्नसोहळा पार पडल्यानंतर ‘हनीमून’ला जाणं हे ओघाने आलंच. लग्नसोहळा आनंदाचा असतोच पण वधू-वराखेरीज इतरही अनेक माणसं या समारंभाचा भाग असतात. सगळीकडे आनंद, उत्साह, गजबजाट असतो.

लग्नसोहळ्याची ही सगळी धामधूम हवीहवीशी असतेच, पण एकदा हे सगळं साजरं करून झाल्यावर लग्न झालेल्या नव्यानवख्या वधूवरांना एकमेकांसोबत ‘त्यांचा’ असा खास वेळ घालवायचा असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अगदी लग्नसोहळ्याच्या झगमगाटाने त्या दोघांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केलेली असली तरी त्यांचं पुढचं आयुष्य आनंदाच्या अनेक क्षणांबरोबरीनेच अनेक आव्हानांनी, जबाबदाऱ्यांनीही भरलेलं असणार असतं.

एकमेकांच्या साथीने सुरू केलेला हा प्रवास आयुष्यभर आनंदाने निभावायचा असतो. त्यामुळे लग्न आणि त्यानंतरचं सुरू होणारं नवं आयुष्य यादरम्यान असलेला ‘हनीमून’चा टप्पा हा एकमेकांना अधिक समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचाच ठरणार असतो.

 

 

नव्या वधूवराखेरीज हनीमूनला आणखी कुणी असणार नसतं. त्यामुळे त्या दोघांना हवा असलेला एकांत, त्यांची म्हणून त्यांना हवी असलेली स्पेस त्यांना हनीमूनला हमखास मिळते. नवनव्या ठिकाणी जोडीदाराबरोबर फिरताना त्या ठिकाणची दृश्यं, एकमेकांच्या सहवासात घालवलेले सुखद क्षण हे सगळं काही हनीमूनच्या वेळी हे नवदांपत्य मनात साठवून ठेवणार असतं.

आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी ‘हनीमून’ ही गोष्ट जितकी खास असते तितकीच ती कलाकार मंडळींसाठीही असणार. आपल्याकडे आपल्या हनीमूनच्या वेळी घडलेल्या अनेक आठवणी, काही भन्नाट किस्से असतात जे आपण नंतर रंगवून रंगवून आपल्या लाडक्या माणसांना पुन्हापुन्हा सांगत राहतो.

कलाकारांच्या बाबतीतही असे भन्नाट किस्से घडतात. स्पृहा जोशी या मराठीतल्या एका उत्तम अभिनेत्री, कवयित्रीनेदेखील तिच्या हनीमूनचा असाच एक धम्माल किस्सा एका कार्यक्रमात सांगितला होता. स्पृहाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्या हनीमूनच्या या धम्माल किश्श्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला नक्कीच असेल.

 

 

स्पृहा तिच्या नवऱ्यासोबत केरळला हनीमूनला गेली होती. हनीमूनला जायला जेव्हा स्पृहा फ्लाईट मध्ये बसली तेव्हा ती गोंधळून गेली. कारण, त्या फ्लाईट मध्ये एका मराठी टूर कंपनीची हनीमून स्पेशल टूर होती.

त्या फ्लाईटमधल्या सगळ्या बायका स्पृहाप्रमाणेच शॉर्ट्स, मेहेंदी, लाल चुडे, डोक्याला टिकली, भांगात सिंदूर, लोंबते कानातले अश्या वेशात होत्या.

त्यामुळे एकतर आपली फ्लाईट तरी चुकलीये किंवा आपल्याला जायचंय ते ठिकाण तरी चुकलंय अशा संभ्रमात स्पृहा पडली. योगायोगानेच या हनीमून स्पेशल टूर सोबत स्पृहाची हनीमूनची ट्रिप जुळून आली असावी.

ट्रिप छान पार पडली आणि फ्लाईटमधून सगळे उतरू लागले तोवर आपल्या “अरेच्चा, आपल्या फ्लाईटमध्ये स्पृहा जोशी आहे तर! ‘स्पृहा जोशी’ ‘स्पृहा जोशी'” अशी कुजबूज लोकांमध्ये सुरू झाली.

स्पृहाचे अनेक चाहते त्या फ्लाईटमध्ये होतेच त्यामुळे अर्थातच सगळ्यांना तिच्यासोबत सेल्फी हवा होता. फ्लाईटमधून उतरल्याबरोबर स्पृहासोबत सेल्फी काढायला एक मोठीच्या मोठी रांग लागली.

 

 

या सगळ्या नादात स्पृहाच्या नवऱ्याला ही सगळी गंमत पाहात एका कोपऱ्यात शांतपणे उभं राहण्याखेरीज पर्याय उरला नाही आणि स्पृहा बाकी सगळ्यांसोबत सेल्फी काढण्यात व्यस्त झाली.

या किश्श्यातला गंमतीचा भाग खरंतर यांच्या पुढे आहे. कारण, त्यांच्या फ्लाईटमध्ये जशी स्पृहा होती, तसे खुद्द प्रभुदेवासुद्धा होते. पण स्पृहासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त असलेल्या कुणाचंही प्रभुदेवाकडे लक्षच गेलं नाही. कुणी प्रभुदेवाकडे ढुंकूनही पाहिलं नाही.

तिकडे जो एक प्रिन्स नावाचा ड्रायव्हर होता त्याने हे सगळं दृश्य पाहिलं. त्या सगळ्यांसोबत पुढचे ३-४ दिवस घालवल्यानंतर न राहवून शेवटी पाचव्या दिवशी प्रिन्स ने स्पृहाच्या नवऱ्याला विचारलं, “सर, ये आपके साथ जो मॅडम है वो मुंबईमें बडा है क्या कोई? वो प्रभुदेवा है, उनको कोई नहीं देखा. सर ये बहुत बडा मॅडम है आपके साथ”

स्पृहाने जेव्हा या ड्रायव्हरने म्हटलेलं हे वाक्य कार्यक्रमात सांगितलं तेव्हा तो ड्रायव्हर ते जसं बोलला असेल अगदी तशाच हटके अंदाजात तिने ते म्हटलं. स्पृहाचा नवरा ड्रायव्हरच्या या बोलण्यावर “आता काहीच पर्याय नाही” असं म्हणत हसला. “प्रभूदेवाला मी बीट केलंय.”, असं या व्हिडियोत स्पृहा गंमतीने म्हणते.

 

 

आपल्या लाडक्या कलाकारांवर, त्यांच्या कामावर, दिसण्यावर, त्यांच्यातल्या बाकी कलागुणांवर जसं आपलं प्रेम असतं तसंच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यातही आपल्याला रस असतोच.

स्पृहाच्या या किश्श्यातून कलाकाराचं सार्वजनिक आणि खासगी आयुष्य किती सहज एकमेकात मिसळून गेलेलं असतं हेच लक्षात येतं. अगदी हनीमूनसारख्या अत्यंत खासगी प्रसंगीही आणि त्याच फ्लाईटमध्ये खुद्द प्रभुदेवासुद्धा असताना लोकांचा गराडा तिच्याभोवती पडला.

कलाकारांच्या आयुष्यातले असे खुमासदार किस्से वेळोवेळी असंच आपल्यासारख्या चाहत्यांचं मनोरंजन करत राहतील, चेहऱ्यावर हसू आणत राहतील.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version