' भारताच्या नकाशात श्रीलंका हा देश का दिसतो? वाचा यामागचं नेमकं कारण – InMarathi

भारताच्या नकाशात श्रीलंका हा देश का दिसतो? वाचा यामागचं नेमकं कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

श्रीलंका म्हणजे भारताच्या शेजारी असणारा एक नयनरम्य देश! थेट रामायण काळापासून श्रीलंका आणि भारत देशाचा संबंध येतो, असं मानलं जातं. रावणाची लंका असा उल्लेख रामायणात केला गेलेला आढळतो. त्यामुळे भारताचं श्रीलंकेशी जुनं नातं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

‘श्रीलंका हा इतका लहान देश आहे, की भारताचा नकाशा विकत घ्यायला गेलो, की श्रीलंकेचा नकाशा फुकट मिळतो.’ हा संवाद विनोद म्हणून तुम्ही शाळेत अनेकदा ऐकला असेल.

 

srilanka india IM

 

मात्र खरोखरच, श्रीलंका भारताच्या नकाशावर का दिसतो, आणि शेजारी असणारे पाकिस्तान, चीन, बांगलादेश हे देश, त्यांच्या सीमा या नकाशात का दाखवल्या जात नाहीत? याचा कधी विचार केलाय का? काय बरं याचं कारण असेल? असा प्रश्न मनात आलाय का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आला नसेल, तर आत्ता तुम्ही या गोष्टीचा नक्कीच विचार करताय. याआधीच मनात हा प्रश्न येऊन गेला असेल, तर आज तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे.

चीन आणि पाकिस्तानशी संबंध खराब आहेत म्हणून?

चीन आणि पाकिस्तान यांच्याशी भारताचे संबंध खराब आहेत, हे तर सगळ्यांना ठाऊकच आहे. असं असल्यामुळे या दोन्ही देशांचा समावेश नकाशात करायचा नाही आणि श्रीलंकेला मात्र दुय्यम वागणूक द्यायची नाही असा कुठलाही हेतू यामागे नाही. खरं तर असं काही असण्याचं कारणही नाही.

 

indian china pakistan IM

 

श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा हक्क आहे, किंवा असा हक्क प्रस्थपित करण्याची भारताची सुप्त इच्छा आहे म्हणून नकाशात लंकेची भूमी दिसते असं आहे का? तर मंडळी असंही नाही.

मग श्रीलंकेच्या सीमा सुद्धा भारताच्या नकाशात दिसायला हव्यात, असा काही करार भारत आणि श्रीलंका यांच्यात झाला आहे का? तर हेदेखील याचं उत्तर नाही.

भारताच्या नकाशात श्रीलंका दिसण्याचं कारण आहे, संयुक्त राष्ट्रांनी अमलात आणलेला एक नियम! ओशन लॉ या नावाने अस्तित्वात आणला गेलेला हा कायदा, यासाठी कारणीभूत आहे. आता तुम्ही म्हणाल, की हे कसं काय?

ocean IM

 

याकरिता १९५६ साली संयुक्त राष्ट्राची पहिली परिषद भरवण्यात आली. १९५८ साली याविषयीचा निर्णय घेण्यात आला आणि कायदा अस्तित्वात आला.

या निर्णयानुसार प्रत्येकी देशाच्या सागरी सीमा आखून देण्यात आल्या. पुढे १९८२ पर्यंत यासंदर्भात आणखी ३ परिषदा घेण्यात आल्या आणि सागरी सीमा आणि त्यासंदर्भातील नियम याविषयी शिक्कामोर्तब झालं.

सागरी कायदा करार म्हणजे नेमकं काय?

एखाद्या देशाच्या समुद्र किनाऱ्याच्या सीमेपासून २०० नॉटिकल माईल अंतरात जर दुसरा देश किंवा त्याची सीमा येत असेल, तर तो देश आणि त्याच्या सीमा संबंधित देशाच्या नकाशात दाखवण्यात याव्यता असं या कायद्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

श्रीलंकेचा विचार केला, तर हा देश भारताच्या दक्षिणेकडील सीमेपासून २०० नॉटिकल माईल अंतराच्या आत आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राच्या नियमावलीनुसार भारतीय नकाशात श्रीलंका असणे बंधनकारक आहे.

 

sri lanka IM

नॉटिकल माईल म्हणजे काय?

एक नॉटिकल माईल अंतर जर किलोमीटरमध्ये सांगायचं झालं, तर ते जवळपास १.८२४ किमी इतकं भरतं. म्हणजेच, २०० नॉटिकल मैलांचा हिशोब करायचा झाल्यास हे अंतर जवळपास ३६५ किमी इतकं असेल.

श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यान समुद्र नसता, तर सध्या या दोन्ही देशांच्या सीमा जिथे आहेत, त्यांच्यामधील अंतर ३६५ किमी किंवा त्याहून कमी असतं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

२०० नॉटिकल माईल म्हणजेच ३६५ किमी अंतरापर्यंत जे काही समुद्रात अस्तित्वात आहे, ते भारताच्या नकाशात दाखवणं बंधनकारक ठरतं. भारताच्या दक्षिणेला असणारा हा लहानसा देश, या अंतराहून कमी अंतरावर असल्यामुळे तोदेखील भारताच्या नकाशावर दिमाखात झळकतो.

 

sri lanka map india IM

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?