Site icon InMarathi

तुम्ही आजवर कधीही न ऐकलेले Bollywood facts!

amir-khan-abul-kalam-azad-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही नेहमीच बॉलीवुड विषयी काही न काही वाचतच असाल. तरी देखील अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही तुमच्या कानी पडल्या नसतील. याच रंजक गोष्टी आज आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.

१. वहीदा रहमानने अमिताभ बच्चनची प्रेमिका आणि आई या दोन्हीचा अभिनय केला आहे. १९७६ मध्ये आलेल्या ‘अदालत’ चित्रपटामध्ये ती अमिताभची प्रेमिका होती आणि १९७८ मध्ये आलेल्या ‘त्रिशूल’ मध्ये आई बनली होती.

 

 

२. अमीर खानचा चित्रपट लगान सर्वात जास्त ब्रिटीश कलाकारांना cast करणारा चित्रपट आहे.

 

 

३. बॉलीवूडमध्ये येण्याच्या आधी सुनील दत्त एक RJ होते. ते रेडीओ Ceylon मध्ये काम करत होते आणि आपली आवडती अभिनेत्री नर्गिसची मुलाखत घेण्याची त्यांची इच्छा होती.

जेव्हा नर्गिस त्यांच्या समोर आली तेव्हा ते काही बोलूच शकले नाहीत आणि मुलाखत रद्द करावी लागली. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी नर्गिस बरोबर ‘मदर इंडिया’ या चित्रपटात काम केलं, तेव्हा त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी लग्न केलं.

 

 

४. चित्रपट ‘हिरोइन’ मध्ये करीना कपूरने जगातील वेगवेगळ्या डिझाइनर्स ने डिझाइन केलेले १३० ड्रेस घातले होते. याला बॉलीवुडचा सर्वात महाग Wardrobe पैकी एक मानलं जातं.

 

 

५.’दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ च्या लोकप्रिय पात्र राज मल्होत्रासाठी पहिली पसंती सैफ अली खानला दिली गेली होती.

 

 

६. ‘रॉकस्टार’चे चित्रीकरण उलट्या क्रमाने झालं होतं. याचा शेवटचा भाग पहिला चित्रीत करण्यात आला आहे, कारण चित्रपट बनवणाऱ्यांना रणबीर कपूरचे केस खराब करायचे नव्हते.

 

 

७. अनिल कपूर आपल्या कुटुंबाला घेऊन जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आले तेव्हा ते राज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते.

 

 

८. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ बॉलीवुडचा पहिला असा चित्रपट होता ज्या मध्ये दोन मध्यंतरं होती.

 

 

९. चित्रपट शोलेचे स्क्रिप्ट लिहिणाऱ्या जावेद अख्तरला वाटत होते की गब्बर सिंहच्या पात्रासाठी अमजद खानचा आवाज कमी आहे, म्हणून त्यांना या रोल मधून जवळपास काढून टाकण्यात आले होते.

 

 

१०. एक तमिळ चित्रपट ‘मून्द्रू मुदिचू’ मध्ये श्रीदेवीने रजनीकांतच्या आईचा रोल केला होता. तेव्हा श्रीदेवी केवळ १३ वर्षांची होती.

 

 

११. शेखर कपूरचे पहिल्यांदा शबाना आझमी बरोबर लग्न ठरले होते, परंतु नंतर हे लग्न मोडले होते.

 

 

१२. ‘मुगल-ए-आझम’ पहिला Trilingual चित्रपट होता. ह्याच्या प्रत्येक सीनचे चित्रीकरण तीनवेळा करण्यात आले होते. हिंदी, इंग्रजी आणि तमिळ मध्ये. तमिळमध्ये हा चित्रपट न चालल्याने इंग्रजी चित्रपटाचे चित्रीकरण लगेच थांबवण्यात आले.

 

 

१३. इला अरुण आणि अलका याग्निक यांनी ‘चोली के पीछे’ गाण्यासाठी सर्वोत्तम महिला प्लेबॅक गायक म्हणून अवॉर्ड शेयर केले होते. या व्यतिरिक्त बॉलीवुडमध्ये कोणत्याही गायकाने प्लेबॅकसाठी अवॉर्ड शेयर केलेले नाही.

 

 

१४. देविका राणी बॉलीवुड मधील पहिली अशी अभिनेत्री होती जिच्याकडे फिल्म मेकिंगची पदवी होती.

 

 

१५. ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाने २००२ मध्ये सर्वात जास्त अवॉर्ड जिंकले, म्हणून त्या चित्रपटाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव लिहिले होते. ह्या चित्रपटाने ९२ अवॉर्डस जिंकले होते.

 

 

१६. ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ बॉलीवुडचे सर्वात मोठे गाणे आहे. हे गाणे २० मिनिटांचे आहे.

 

 

१७. अमीर खान मौलाना अबुल कलाम आझाद यांचा वंशज आहे.

 

 

१८. अभिनेत्री कल्कीचे आजोबा Eiffel Tower आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी निर्माण करताना चीफ इंजिनिअर होते.

 

 

१९. ऋतिकचे खरे आडनाव रोशन नाही, नागरथ आहे.

 

 

२०. अशोक कुमार अभिनेता बनण्याआधी बॉम्बे टॉकीज मध्ये लॅब असिस्टंट होते.

 

 

२१. मेरा नाम जोकर आणि LOC कारगील दोन्ही बॉलीवुडचे सर्वात सर्वात मोठे चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांचा रन टाइम २५५ मिनिट आहे.

===

===

 

 

२२. भारतातील लोक प्रत्येक वर्षी जवळपास २.७ बिलियन रुपयांची चित्रपटांची तिकिटे खरेदी करतात,परंतु इथे तिकिटांची सरासरी किंमत जगात सर्वात कमी आहे. त्यामुळे बॉलीवुडची कमाई हॉलीवुडपेक्षा खूप कमी आहे.

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version