Site icon InMarathi

युट्युबवर शिकले आणि घरीच छापल्या नोटा, पैशांचा ‘महाजुगाड’

fake note inmarathi2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहानपणी प्रत्येकाने शाळेमध्ये असतांना ‘विज्ञान – शाप की वरदान’ या विषयांवर हमखास निबंध लिहिलेला असेलच. विज्ञानामुळे आपली उर्जा आणि वेळेची खुप बचत होत आहे. सोबतच आपले आयुष्य देखील अनेक सुख सुविधांनी युक्त झाले आहे, परंतु याच विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने अनेक चुकीची काम करायला देखील सुरूवात केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून आज मानव हॅकिंग, क्रॅकिंग, सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड अशी अनेक प्रकारची चुकीची काम करतो. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा केलेल्या या अनैतिक वापरामुळे अनेक निरपराध, निर्दोष लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.

असेच एक प्रकरण यूपीच्या गाझियाबाद मधून समोर आले आहे, जिथे काही लोकांनी यूट्यूबवरून बनावटी नोटा बनवायचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या घरी प्रिंटरच्या सहाय्याने या बनावटी नोट छापायला सुरुवात केली.

 

 

याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे हे संपूर्ण रहस्य उघड होण्याआधीच या लोकांनी सुमारे १६ लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्या होत्या.

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावटी नोटा छापण्याचा व्यवसाय कैलाभट्टामधील एका घरात सुरु होता. या टोळीतील सात जणांना आम्ही आतापर्यंत अटक केली आहे. हे सर्व लोक या कामात सामील होते.

आतापर्यंत या लोकांनी सुमारे १६ लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्या असून त्याचबरोबर या छापेमारीत सुमारे ६ लाख ५९ हजारांच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय २ प्रिंटर, एक पेपर कटिंग मशिन आणि पांढऱ्या कागदाचा रील आदि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

 

 

याचबरोबर पोलिसांनी माहिती दिली की, या सात आरोपींपैकी आजाद, यूनुस आणि अमन हे मुख्य आरोपी आहेत इतर ४ हे यांच्यासोबत नंतर जुळल्याचे दिसून येत आहे.

या सर्व आरोपींना वेगवेगळी कामे देण्यात आली होती, जसे की नोटांची कटिंग, छपाई, सिक्युरिटी टेप चिकटवणे इत्यादी. युनूसच्या घरी बनावट नोटा तयार करण्यात येत असत आणि यानंतर या तयार झालेल्या नोटा आझादचे सहाय्यक- अमन, आलम आणि फुरकान बाजारात प्रसारित करायचे.

मार्केटमध्ये यांचे सहाय्यक दुकानदार या बनावट नोटा चलनात मिसळत होते. अशाप्रकारे हे बनावट चलन संपूर्ण बाजारपेठेत पसरवले जात होते.

या टोळीचा सूत्रधार आरोपी आझाद याने काही महिन्यांपूर्वी पेट्रोल पंपावर एका व्यक्तीकडून नोटा घेतल्या होत्या. त्या पैशांमध्ये काही बनावट नोटाही होत्या. त्यानंतर आजाद त्या बनावटी नोटा घेऊन बाजारात गेला आणि त्याला आधी वाटले की या बनावटी नोटा पकडल्या जातील, परंतु असे न होता या नोटा बाजारात चालून गेल्या.

 

 

त्यानंतर त्याने पण बनावट नोटा बनवण्याचा प्लॅन तयार केला आणि यूट्यूब आणि इतर ठिकाणांहून माहिती घेतल्यानंतर त्याने बनावट नोटा बनवण्याचे काम सुरु केले. आझाद सोनू आणि युनूस या तिघांनी मिळून इस्लामनगर मधील कैलाभट्टा गाझियाबाद येथील युनूसच्या घरी या बनावट नोटा छापण्याचे काम सुरू केले.

एसपींनी सांगितले की, बनावट नोटांसंदर्भात अमन आणि आलम यांची चौकशी करण्यात आली तर दोघांनी सांगितले, की ते या बनावट नोटा पुढे २० टक्के कमिशन पुरवायचे. याशिवाय आझाद, सोनू आणि युनूस बनावट नोटा छापून तयार करायचा.

चौकशीत आरोपींनी असेही सांगितले की, काही लोक आहेत, ज्यांच्याकडून त्यांनी खोट्या नोटा देण्याच्या नावाखाली खऱ्या नोटा घेतल्या होत्या आणि नंतर त्यांना नोटांमध्ये भेसळ करून बनावट नोटा दिल्या. याप्रकारे त्यांनी अनेक लोकांना फसवलं आहे. तसेच या नोटा अशाप्रकारे बनवल्या होत्या की खऱ्या-खोट्या नोटा ओळखता ही येत नव्हत्या.

 

 

विज्ञान आपल्यासाठी फायद्याचेच आहे, परंतु त्याचा वापर योग्यप्रकारे कसा करावा, हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. बनावटी चलन बनवून त्याचा गैरवापर केल्याने याचा त्रास आपल्याच देशातील लोकांना होतो.

विज्ञान हे वरदानच आहे, परंतु आपला वापर त्याचं रूपांतर शापामध्ये करत आहे, हे देखील तितकंच खरं आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर चोऱ्यामाऱ्या, हत्या किंवा इतर गुन्हे करणे अगदीच चुकीचे आहे.

जगभरात रोज नवनवीन शोध लागत असतात आणि प्रत्येक नवीन शोधाबरोबर गुन्हेगार देखील गुन्हा करण्याची नवीन पद्धत शोधून काढत असतात. आपण आपले रोजचे जीवन अधिक सहज आणि सोपे व्हावे म्हणून नवनवीन वस्तू वापरात आणत असतो पण त्याचा दुरुपयोग होता कामा नये.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version