Site icon InMarathi

अवैध धंदे करणारा, नेत्यांचे शौक पुरवणारा, ८० चं दशक हादरवून टाकणारा ऑटो शंकर!

auto shankar inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहासात सीरियल किलिंगच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या आठवून आजही लोकांचा थरकाप उडतो. अश्याच सैतानांपैकी एक म्हणजे ऑटो शंकर होय ज्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. गौरीशंकर उर्फ ऑटो शंकर हा असा सीरियल किलर होता ज्याने अनेक मुलींचा बळी घेतला होता.

हा मारेकरी मुलींचे अपहरण करून आधी स्वत: त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा, नंतर त्या मुलींना त्याच्या साथीदारांना विकून टाकायचा. ते साथीदार देखील त्या मुलींवर वारंवार बलात्कार करायचे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असे सांगितले जाते, की त्या साथीदारांचेही समाधान झाल्यावर मग ते त्या मुलींना मारायचे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना जाळायचे व त्यांच्या शरीराचे उरलेसुरले अवशेष बंगालच्या उपसागरात फेकायचे.

९० च्या दशकात सतत मुली बेपत्ता होऊ लागल्यामुळे चेन्नईमधील लोक दहशतीत राहू लागले. १९८७ ते ८८ पर्यंत ९ मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि सर्व प्रयत्न करूनही त्या मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश येत होते.

 

 

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच वर्षी डिसेंबरमध्ये, शुभलक्ष्मी नावाच्या एका शाळकरी मुलीने एका ऑटोरिक्षा चालकाविरुद्ध विनयभंग आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणानंतर पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची चौकशी सुरू केली आणि चौकशीत जे काही पुढे आले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा रिक्षाचालक गौरीशंकर होता.

तपासात पोलिसांना असे कळले, की ९ हून अधिक मुलींच्या अपहरण आणि मृत्यूमागे रिक्षाचालक गौरीशंकर उर्फ ऑटो शंकरचा हात आहे, परंतु चौकशीत केवळ ६ मुलींसंदर्भात पुरावे सापडले. या सिरीयल किलरने ६ मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली होती.

शंकराचा जन्म वेल्लोरजवळील कांगेयानाल्लूर येथे झाला. तो PUC मध्ये असताना त्याचे वडील कुटुंब सोडून ओडिशात गेले. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस तो चेन्नईला आला. दक्षिण चेन्नईच्या बाहेरील थिरुवनमियुरमध्ये राहण्यापूर्वी तो प्रथम मैलापूर झोपडपट्टीत राहत होता.

शंकरला अनेक बायका होत्या. त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळात जगदीश्‍वरी हिच्याशी लग्न केले आणि तिच्यापासून त्याला चार मुले झाली. नंतर त्याने गीता सुंदरी ह्या स्त्रीशी दुसरे लग्न केले.

ही त्याच्या वेश्यांपैकी एक होती. शंकरचे हे भयंकर आयुष्य बघून तिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्याची तिसरी पत्नी ललिता ही कॅबरे क्लबमध्ये डान्सर होती जिथे तो वारंवार जायचा.

शंकरने सुरुवातीला सायकल रिक्षा चालवून पोट भरण्यास सुरुवात केली आणि नंतर तो ऑटोरिक्षा चालवायला लागला, ज्यावरून त्याला त्याचे टोपणनाव मिळाले. त्यावेळी तो परिसर गुन्हेगारीचा अड्डा होता आणि शंकर त्याच्या ऑटोरिक्षातून दारूची अवैध वाहतूक करू लागला. नंतर त्याने व्हीआयपी लोकांच्या बंगल्यांवर मुली पुरवण्यास सुरुवात केली.

 

 

त्यावेळी महाबलीपुरम हा टुरिस्ट स्पॉट होता त्यामुळे त्याठिकाणी वेश्याव्यवसाय सुद्धा जोमाने सुरु होता. शंकरला लवकरच कळले की देह व्यापारात जास्त पैसा आणि कमी धोका आहे. त्याचे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली लोकांशी त्याने संगनमत केले कारण हे लोक पोलिसांनाही रोखू शकत होते.

या काळात, शंकर वेश्याव्यवसाय आणि अवैध दारूच्या धंद्यामधील मोठा डॉन बनला. त्याचा एलबी रोडवर एक व पेरियार नगरमध्ये दुसरा कुंटणखाना होता. त्याच्या गॅंगने शत्रूंना पोलिसांच्या मदतीने किंवा जीवे मारून संपवले.

त्याने चित्रपटसृष्टीतील लोकांशी देखील संपर्क प्रस्थापित केला आणि तो व्हीआयपी लोकांना चित्रपटसृष्टीतील मुली पुरवत असे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस टी. नगरमध्ये बाबूची हत्या करण्यात आली होती.

बाबू हा शंकरचा एक दलाल होता जो शंकरच्या कुंटणखान्याचा कारभार बघत असे. या केसमध्ये पोलिसांनी एका अभिनेत्रीच्या भावाला अटक केली होती. मात्र, अभिनेत्रीच्या दादागिरीमुळे हे प्रकरण दाबले गेले. ह्यानंतर शंकरने देह व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित केले.

 

 

 

शंकरची तिसरी पत्नी, ललिता, त्याच्याच एका दलालाबरोबर पळून गेली. तो दलाल म्हणजे शंकरचा मित्र सुदालाईमुथू होता. या दोघांनी नंतर स्वतःचा वेगळा धंदा सुरू केला. यामुळे संतप्त झालेल्या शंकरने परस्पर मित्रांमार्फत दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे नाटक करून बदला घेण्याची योजना आखली.

ऑक्टोबर १९८७ मध्ये एका रात्री, त्याने तिला पेरियार नगरमधील त्याच्या एका ठिकाणी बोलावले आणि नंतर तिची हत्या करून दफन केले. त्यानंतर त्याने ते घर एका वृद्ध विधवेला १५० रु.ने भाड्याने दिले. शंकरने सुदलाईमुथूला सांगितले की ललिता एका व्हीआयपीसोबत दौऱ्यावर गेली आहे आणि दोन महिन्यांनी त्याला जेवणासाठी आमंत्रित केले.

शंकराने सुदलाईमुथूला भरपूर दारू पाजली व त्याचा गळा दाबून खून केला. नंतर त्याचे शरीर जाळले आणि त्याची राख समुद्रात टाकली. त्यानंतर त्याने घराचे नूतनीकरण केले आणि सर्व पुरावे नष्ट केले.

जेव्हा सुदलाईच्या एका राऊ नामक मित्राने सुदलाईमुथूबद्दल शंकरला जाब विचारला तेव्हा शंकरने त्यालाही ठार मारले आणि त्याच्या पेरियार नगर प्लॉटबाहेर पुरले. त्याने रवी मुंबईत असल्याचा दावा करत त्याच्या पत्नीला खोटे पत्र पोस्ट केले.

 

चेन्नईत सगळीकडे शंकरची दहशत निर्माण झाली होती. १९८८ साली तिरुवनमयूरमध्ये एक मुलगी दारूच्या दुकानाच्या बाजूने जात असताना तिला काही गुंडांनी पकडण्याचा व अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने मुलीने स्वतःची सुटका करून घेतली व ती तातडीने पोलिसांकडे गेली.

तिने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. सतत घडणारी मुलींच्या अपहरणाची प्रकरणे बघून पोलीस देखील तणावाखाली होते. त्यांनी हे प्रकरण मुळासकटच संपवयाचे ठरवले. ते सिव्हिल ड्रेस मध्ये गस्त घालू लागले. तेव्हा पोलिसांना चेन्नईतील ह्या कुख्यात डॉनची माहिती कळली.

अखेर पोलिसांनी ऑटो शंकरला पकडले, पण त्याचे बड्या लोकांशी जवळचे संबंध होते त्यामुळे त्याला अडकवणे सोपे नव्हते. याच दरम्यान तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे निधन झाल्याने तामिळनाडूमध्ये राज्यपालांची राजवट सुरु होती.

राज्यपालांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका हुशार व मातब्बर पोलीस अधिकाऱ्याची निवड केली. त्यांनी अथक प्रयत्न करत ऑटो शंकरचे बिंग फोडून त्याला दुसऱ्यांदा अटक केली.

पोलिसांनी जेव्हा शंकरच्या घरी व त्याच्या अड्ड्यांवर, लॉजवर छापे टाकले तेव्हा त्यांना शंकरची एक डायरी सापडली ज्यात त्याने बऱ्याच नोंदी केल्या होत्या. हा त्याच्या विरोधात एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता.

अखेर शंकरने त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याची रवानगी मद्रासच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. तिथूनही तो जेलरच्या मदतीने साथीदारांसह पळून गेला. अखेर पोलिसांनी त्याला ओडिशामधून पकडून आणलेच.

अखेर २७ एप्रिल १९९५ रोजी सालेम जेलमध्ये या सिरीयल किलरला फाशी देण्यात आली. शिवाय त्याला मदत करणाऱ्या सर्वांनाही शिक्षा झाली.

शंकरला तर शिक्षा झाली. पण त्याला ह्या काळ्या कृत्यांत साथ देणारे सरकारी अधिकारी, नेतेमंडळी ह्यांची नावे मात्र कधीच बाहेर आली नाहीत. ते अनेक वर्षे उजळ माथ्याने समाजात वावरत होते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version