' एकेकाळचा वेटर, आज झालाय मुकेश अंबानीपेक्षा श्रीमंत, पण कशाच्या जोरावर? – InMarathi

एकेकाळचा वेटर, आज झालाय मुकेश अंबानीपेक्षा श्रीमंत, पण कशाच्या जोरावर?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज प्रत्येकाची इच्छा असते आपला बंगला असावा, गाडी असावी, घरी नोकर चाकर असावे, फिरायला महागड्या असाव्यात. मात्र हे सगळं काही अगदी सहज मिळत नाही, याला जरी अपवाद असला तरी या गोष्टी मिळवण्यासाठी अनेक वर्ष कष्ट घ्यावे लागतात, अंगी जिद्दी लागते तरच अशी स्वप्न पूर्ण होतात.

अब्दुल कलाम म्हणतात अशी स्वप्न बघा जी तुमची झोप उडवतात, आज अनेक तरुणांना व्यवसायात उतरून मोठे व्हायचे आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून सगळेच उद्योग मंदावले आहेत, हळूहळू अर्थव्यव्यस्था रुळावर येतेय मात्र या मंदीच संधीत सुद्धा अनेकांना रूपांतर केलं आहे.

 

abdul kalam inmarathi

 

आज भारतात मोठमोठाले उद्योगपती आहेत ज्यांच्या यशाच्या गाथा आपण ऐकत आलोच आहोत. रतन टाटांसारखे व्यक्तिमत्व आज अनेकजणांचे प्रेरणा स्रोत आहेत. आज अंबानी अदानी यासारखे उद्योगपती आपल्या देशाचे नाव मोठे करत आहे दुसरीकडे तितक्याच प्रमाणावर त्यांच्या टीका देखील होताना दिसून येत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मागच्या वर्षी झूमचा मीटिंग या अँप्लिकेशनचा मालक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाला होता, यावर्षी असाच एक उद्योगपती या यादीत समाविष्ट झाला आहे ज्याची संपत्ती मुकेश अंबानींपेक्षा जास्त आहे, कोण आहे तो माणूस चला तर मग जाणून घेऊयात..

 

zoom final inmarathi

 

कोण आहे ती व्यक्ती :

चांगपेंग झाओ असं या व्यक्तीच नाव असून तो मूळचा चीनमधला आहे. झाओचे वडील चीनमध्ये असताना प्राध्यपकाचे काम करायचे मात्र नंतर ते कॅनडा येथे स्थायिक झाले. वयाच्या १२ वर्षी झाओ चीनमधून कॅनडामध्ये येऊन आपले पुढील शिक्षण कॉम्पुटर विषयात केले. पुढे काही अमेरिकन आणि जपानी फायनान्स कंपन्यांमध्ये काम देखील केले.

 

zao 1 inmarathi

सुरवात कशी झाली?

आज अनेकांना व्यवसायात यायची इच्छा असते मात्र त्यांना कुठून सुरवात करायची हा त्यांच्या पुढे गहन प्रश्न असतो. झाओने काही काळ मॅकडोनाल्डमध्ये देखील काम केले आहे. झाओने नंतर क्रिप्टो करन्सी द्वारे पैसे कमवण्यास सुरवात केली. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायला सुरवातीला झाओ राजी नव्हता मात्र BTC China चे CEO बॉबी ली आणि रॉन काओ या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून झाओने क्रिप्टोमध्ये उडी घेतली.

 

crypto inmarathi 1

 

सुरवातीला साशंक असलेला झाओने यावर पूर्ण अभ्यास केला आणि नंतरच या क्रिप्टोमध्ये उतरला, यासाठी त्याने चक्क आपले राहते अपार्टमेंट सुद्धा विकले होते.

२०१७ मध्ये BINANCE ची स्थापना :

झाओच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता तो म्हणजे बायनान्स या कंपनीची त्याने स्थापना केली. व्यवसायात उतरताना उत्तम होमवर्क केला असल्याने साहजिकच कंपनी काही दिवसात क्रिप्टो करन्सी जगातील एक प्रमुख कंपनी म्हणून ओळखू लागली. गेल्याच वर्षी कंपनीचा टर्नओव्हर  २० अब्ज डॉलर्स इतका होता. कंपनी आपल्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजवर ३५० जास्त नाण्यांमध्ये ट्रेडिंग ऑफर करते.

 

binance inmarathi

 

डेरिव्हिटेव ट्रेडिंग प्रकाराचा पुरवठा झाओची कंपनी मोठ्या प्रमाणवर करते, कंपनीचे मुख्य कार्यालय असे कोणतेच नाही, कंपनीची स्थापना चीनमध्ये झाली आहे. मात्र जपान, माल्टामधून कंपनीला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला. सिंगापूरमध्ये काही काळ जम बसवत होती मात्र मागच्याच महिन्यात कंपनीला काही अटींमुळे माघार घ्यावी लागली.

नेटवर्थ किती?

ब्लुमर्ग बिलियन इंडेक्सच्या माहितीनुसार झाओची संपत्ती ९६ अरब डॉलर इतकी आहे, तर अंबानींची ९३अरब डॉलर इतकी आहे. त्याची मजाही क्रिप्टो करन्सीमधून मिळणारी कमाई ही फेसबुकच्या मार्क झुकरबर्गपेक्षा जास्त आहे. बिटकॉइन आणि बायनान्स कॉइन यासारख्या कंपन्यांमध्ये देखील भागीदारी आहे.

 

zao 2 inmarathi

 

अरबांना काळजी :

आज इंटरनेटवर गेलात तर आखाती देशातील राजांची शाने शौकत तुम्हाला बघायला मिळालेच, अमाप संपत्तीचे मालक असलेली ही मंडळी देखील आज झाओ महाशयांना मानतात. आज अरब देशांमध्ये झाओला मानाचे स्थानआहे. यामागे कारण हे आहे की अरबी देशांना आज त्यांच्या कंपनीची गरज आहे.

 

Saudi Arabia king InMarathi

 

पेट्रोल पंपावर काम करणारे धीरूभाई असो किंवा अँपलचा स्टीव्ह जॉब असो या सगळ्याच दिग्गज मंडळींनी अगदी छोट्या कामांपासून मोठ्या कामांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनीच केवळ मोठी होण्याची स्वप्न न बघता ती पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नांच्या मागे लागा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?