आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२०२१ ला निरोप देताना प्रत्येकानेच नवे वर्ष ‘मास्क फ्री’ असावे अशी प्रार्थना केली, दोन वर्षापासून कोरोनामुळे होणारी ‘घुसमट’ नव्या वर्षात थांबावी, पुर्वीप्रमाणे मोकळा श्वास घेता यावा अशी प्रत्येकाचीच आशा होती. मात्र प्रत्यक्षात घडलं उलटचं!
डिसेंबर महिन्यापासूनच फोफावणारे ओमायक्रॉनचे संकट जानेवारी महिन्यात अधिक गडद झाले. नवे वर्ष, नवे निर्बंध याप्रमाणे नियमांत झालेल्या वाढीवर टिका करताना त्याचवेळी वाढती रुग्णसंख्याही लक्षात घ्यायला हवी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कोरोनाच्या आधीच्या डेल्टा व्हेरिएन्टपेक्षाही प्रचंड वेगाने फोफावणारा हा नवा स्ट्रेन अर्थात ओमायक्रॉन किती धुडघूस घालू शकतो हे सध्या घराघरात पोहोचलेल्या रोगराईने सिद्ध केले आहेत.
तर सध्या प्रत्येकालाच सर्दी, खोकला. थंडी ताप अशा लक्षणांनी हैराण केले आहे. ओमायक्रॉन धोकादायक नसला तरी त्याचा प्रसार हा डेल्टाच्या ७० टक्के वेगाने होत असल्याचे तज्ञांनी यापुर्वीच जाहीर केले आहे.
घराबाहेर पडू नका असा सल्ला शासनातर्फे दिला जात असला तरी नोकरदारांना ऑफिस गाठण्याशिवाय पर्याय नाही. तसेच घरातील सामान, भाजीपाला आणण्यासाठी घरातील किमान एका व्यक्तीला बाजारात जावेच लागते. अशावेळी घराबाहेर पडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ओमायक्रॉनचा धोका आहेच. पर्यायाने या व्यक्तींपासून घरातील इतर सर्वांनाच!
तर ओमायक्रॉनचा धोका नेमका कसा रोखता येईल? मास्क घालूनही कोरोना झाला, लस घेऊनही रिपॉर्ट पॉझेटिव्ह आला अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. तर याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.
कापडी मास्क सुरक्षित आहे का?
सध्या घराघरात पडलेला प्रश्न म्हणजे ‘कापडी मास्क सुरक्षित आहे का?’ याचे कारण म्हणजे २०२१ सालात मास्कची सवय झाली असली तरी पुर्ण दिवसभर काम करताना मास्कमुळे घुसमट व्हायची.
कामाच्या ठिकाणी बोलताना या मास्कमुळे अडचण व्हायची. श्वास घेताना त्रास व्हायचा. समोरच्याने बोललेले ऐकू येत नव्हते. अशावेळी कॉटन कापडापासून बनवलेला मास्क वापरण्यास सुरुवात झाली.
लस मिळाल्याने कोरोनाची भिती याच काळात थोडी कमी झाली, त्यात नियमापुरते तोंड झाकायचे आणि तुलनेने त्रासही कमी यासाठी कापडी मास्क वापरण्याला प्राधान्य दिले गेले. मग कपड्यांना मॅचिंग, रंगीत, विणकाम केलेले, नक्षीदार या प्रकारांमुळे ‘मास्क’ क्षेत्रातही फॅशन आली.
याचे आणखी एक कारण म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत N95 मास्कचा तुटवडा जाणवत असल्याने डॉक्टरांनीही कापडी मास्कला हिरवा कंदिल दाखवला.
मात्र कोरोनाच्या साधारण प्रसाराला रोखण्यासाठी किंवा अनवधानाने कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास त्याच्याशी बोलताना तोंडावाटे, किंवा श्वासावाटे हे विषाणु आपल्या शरीरात जाऊ नये याकरिता कापडी मास्क उपयोगी ठरत होता. मात्र ओमायक्रॉनचा विचार केला गेला तर या कापडी मास्कचा उपयोग होत असल्याची बाब ठळकपणे समोर आलीय,
नव्या व्हरियंटचा प्रसार इतक्या वेगाने होतो की कापडी मास्कलाही न जुमानता हे विषाणु शरीरात प्रवेश करतात, त्यामुळे सध्याही कापडी मास्क वापरत असाल तर सावधान! वेळीच मास्क बदला नाहीतर विनाकारण ओमायक्रॉनचं संकट ओढवून घ्याल.
सर्जिकल मास्क उपयोगी ठरतील का?
कापडी मास्कपेक्षा जरा बरा पर्याय म्हणजे सर्जिकल मास्क! पण या मास्कवर सध्या विसंबून राहण्यात अर्थ नाही. कारण या मास्कमुळे केवळ नाकावाटे बाहेर पडणारे जंतु रोखण्यास काही प्रमाणात मदत होते असे डॉक्टर्स सांगतात.
हे मास्क प्रामुख्याने कोणत्याही शस्र्क्रियेदरम्यान डॉक्टरांकडून वापरले जातात. मात्र ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी या मास्कचा वापर करणे योग्य नाही.
कमी गर्दी असलेल्या किंवा खाजगी प्रसंगात, धोका कमी असणाऱ्या ठिकाणी हे मास्क वापरले तर चालतील मात्र ऑफिस, बाजार, मॉल, वाहतूक अशा गर्दीच्या ठिकाणी हे मास्क घालून बिनधास्त वावरत असाल तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका असल्याचे डॉक्टर्स सांगतात.
एफएफपी मास्क प्रभावी आहे का?
N95 मास्क ठाऊक आहे? मग तो प्रकार याच गटात मोडतो. फक्त यातील N95 मास्क अधिक प्रसिद्ध झाल्याने त्याबाबत माहिती अधिक आहे.
हे मास्क सेलूलोज किंवा प्लास्टिकपासून तयार केलेले असतात. अशा मास्क्सना फिल्टरिंग लेयर्स असतात. यामधील काही मास्कना तर श्वास बाहेर सोडण्यासाठी वॉल्हदेखील असतात. मात्र वॉल्ह असणारे मास्क महामारीच्या काळात वापरण्याचा सल्ला दिला जात नाही. असे मास्क वापरणे बाकीच्या लोकांसाठी धोकादायक ठरु शकते. या मास्कमधून अनफिल्टर्ड हवा बाहेर पडते. त्यामुळे मास्क लावलेल्या व्यक्तीचे तर संरक्षण होते. मात्र दुसऱ्या व्यक्ती धोक्यात येऊ शकतात.
N95 / एफएफपी २ चा वापर सुरक्षित
हवेत असणारे ९५ टक्के कण या प्रकाराच्या मस्कच्या मदतीने रोखून धरता येतात तसेच एन 95 दर्जाचे मास्क विषाणूंपासून उत्तम प्रकारे संरक्षण पुरवू शकतात असे काही अभ्यासातून स्पष्ट झालेले आहे.
FFP2 आणि N95 मास्कची किंमत सामान्य माणसांना परवडेल एवढी असते. तसेच हे मास्क चांगल्या प्रकारे संरक्षण पुरविते. त्यामुळे सध्याचा विषाणु प्रसाराचा वेग लक्षात घेता या प्रकारातील मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जातोय.
अर्थात मास्क केवळ एक शस्त्र आहे. त्यामुळे मास्कचा वापर व्यवस्थित करावा, मास्क वेळोवेळी धुवावा किंवा बदलावा तसेच पुर्णतः कोरडा मास्क वापरावा याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच हात धुणे, गर्दीत न मिसळणे आणि लसीकरण पुर्ण करून घेणे ही त्रिसुत्री वापरायलाच हवी.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.