Site icon InMarathi

अंबानींच्या घरी नोकरी म्हणजे भरघोस पगार, पण ती मिळवणं आहे UPSC हून कठीण…

neeta ambani inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते. ज्याला कशाचीच कमी नाही त्या व्यक्ती अर्थातच चैनी विलासी जीवन जगणारच! आणि का जगू नये? ज्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे अश्यांनी राजसी आयुष्याचा उपभोग नाही घेतला तरच नवल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असेच अंबानी कुटुंबाचे देखील आहे. आपल्याला विविध बातम्यांमधून हा अंदाज येतोच की इतके श्रीमंत असलेले अंबानी कुटुंब कश्या प्रकारचे जीवन जगत असेल?

बकिंगहॅम पॅलेसनंतर अँटिलियाचे रॉयल निवास जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अँटिलिया हे मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर स्थित आहे. मुंबईतील हा भाग भारतातील सर्वात आलिशान निवासी क्षेत्रांपैकी एक मानला जातो.

 

 

या ठिकाणच्या मालमत्तेचे दर ८००००० रुपये ते ८५००००  रुपये प्रति चौरस फूट आहेत. अँटिलीया ही २७ मजली इमारत ५७० फूट उंच आहे. या इमारतीत एक प्रवेशकक्ष देखील आहे. या कक्षात सुरक्षारक्षक, अंगरक्षक आणि इतर सहाय्यक शांतपणे आराम करू शकतात.

अंबानींच्या या घरात हेल्थ स्पा, सलून, बॉलरूम, ३ स्विमिंग पूल, योग आणि डान्स स्टुडिओ अश्या सुविधा आहेत. याशिवाय एक आईस्क्रीम पार्लर, एक मोठे मंदिर आणि एक खाजगी थिएटरही आहे, ज्यामध्ये ५० लोक आरामात बसू शकतात.

इमारतीचा सहावा मजला पार्किंगसाठी समर्पित आहे, ज्यामध्ये सुमारे १६८ कार पार्क केल्या आहेत. घरात एकूण ९ लिफ्ट आहेत. विशेष म्हणजे घरात येणारे पाहुणे आणि अंबानी कुटुंबातील लोकांसाठी स्वतंत्र लिफ्ट आहेत.

अंबानींच्या पंधरा हजार कोटींच्या या आलिशान घरासमोर 5-स्टार किंवा 7-स्टार हॉटेल्सही कमी आहेत. तसेच त्यांच्या घरात काम करणाऱ्यांनाही लाखो रुपयांचा पगार मिळतो.

 

 

Livemirror.com नुसार, मुकेश अंबानींच्या अँटिलिया या आलिशान घरात सुमारे ६०० कर्मचारी काम करतात. काही कर्मचारी तर अँटिलियामध्ये २४ तास उपस्थित असतात.

अँटिलीयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याला दोन लाख रुपये पगार मिळतो. या पगारात वैद्यकीय भत्ता आणि शिक्षण भत्ता यांचाही समावेश होतो.

मुकेश अंबानींच्या काही नोकरांची मुलंही अमेरिकेत शिकलेली असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं गेलं आहे. जर इतका भरपूर पगार मिळणार असेल आणि अंबानींचे रोजचे आयुष्य जवळून बघायला मिळणार असेल तर अनेकांना त्यांच्या घरी काम करण्याची इच्छा होणे स्वाभाविकच आहे, पण थांबा! अंबानींच्या घरी काम मिळणे काही सोपे नाही.

कर्मचारी म्हणून तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला निवड प्रक्रियेच्या अनेक स्टेजेस पार कराव्या लागतील. अंबानींच्या घरातील नोकरी साठीची जाहिरात आधी वृत्तपत्रात दिली जाते.

 

 

ही नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना आधी एक लेखी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत हॉटेल व्यवस्थापन आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. जो परीक्षेत उत्तीर्ण होतो तो या प्रक्रियेत पुढे जातो. त्यानंतर इंटरव्ह्यू होऊन पास झालेल्या उमेदवारांची निवड केली जाते आणि मग त्या व्यक्तीचे नशीब चांगलेच फळफळते.

अंबानींकडे शेकडो वाहने असून, त्यासाठी वेगवेगळे चालक ठेवण्यात आले आहेत.अंबानींचा चालक होणे देखील सोपे नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राटे दिली जातात. त्यासाठी निविदा काढल्या जातात. मग निवडक कंपन्या ड्रायव्हरसाठी रिक्त जागा काढतात.

यानंतर काही निवडक लोकांना शॉर्टलिस्ट केले जाते आणि त्यांची अंतिम चाचणी घेतली जाते. ज्या कंपनीला हे कंत्राट मिळते ती कंपनी निवडलेल्या लोकांना प्रशिक्षण देते आणि नंतर गुणवत्तेनुसार त्यांचे वेतन ठरवते. एका रिपोर्टनुसार, अंबानींच्या घरातील प्रत्येक ड्रायव्हरचा पगार महिन्याला २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

 

चालकाची निवड करण्यापूर्वी त्यांना सर्व प्रकारची वाहने चालवण्याचा अनुभव असावा, याचीही काळजी घेतली जाते. तसेच या चालकांवर मीडिया आणि बड्या व्यक्तींचा चांगलाच दबाव असतो त्यामुळे त्यांच्या सहनशक्ती आणि समजूतदारपणाचाही कस लागतो. थोडक्यात, अंबानींच्या घरी काम मिळणे तर कठीण आहेच, शिवाय इतक्या दबावाखाली ते काम करणे देखील काही सोपे काम नाही.

जाऊद्या, इतकी मेहनत ह्याठिकाणी करण्याचा विचार करत असाल तर तीच मेहनत सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांसाठी करा! सांगायचं मुद्दा हाच की, “अबे पढाई लिखाई करो, IAS वाईएएस बनो और देश को संभालो!”

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version