Site icon InMarathi

“ही लक्षणं असतील तरच कोविड टेस्ट करा..” ICMR च्या नव्या गाईडलाईन्स!

covid test ICMR IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोविड १९ च्या ओमायक्रॉन या व्हेरियंटने भारतात आपले हात – पाय पसरण्यास सुरवात केली आहे. देशात एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस अधिकाअधिक रुग्णांची नोंद होत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याच पार्श्वूमीवर प्रशासन सतर्क झाले असून वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी नवीन गाईड लाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

 

 

जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जारी केलेल्या नव्या गाईड लाईन्स नुसार कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची सरसकट चाचणी आता होणार नाही.

 

 

मात्र ज्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे अशा लोकांनी मात्र स्वतःची टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीचं वय हे ६० वर्षांहून अधिक आहे किंवा ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनी – फुफ्फुस बाबत दीर्घकालीन आजार, लठ्ठपणा अशा काही व्याधी असल्यास त्यांना कोरोनाचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ताबडतोब आपली टेस्ट करून घ्यावी.

रुग्णांनी रॅपिड मोलेक्युलर टेस्टिंग सिस्टीमद्वारे किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट (RAT) द्वारे आपली टेस्ट करून घ्यावी. ICMR च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार लक्षणे असलेल्या व्यक्ती, घरगुती/स्वयं-चाचणी किंवा RAT वर निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींनी RT-PCR चाचणी घ्यावी.

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत १,७९,७२३ नवीन कोविड-१९ केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यामुळे देशातील पॉझिटिव्हीटी रेट १३.२९% टक्के झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची एकूण ४०३३ केसेस आतापर्यंत नोंदवल्या गेल्याआहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (१२१६) केसेस आहेत, त्यानंतर राजस्थान (५२९) आणि दिल्ली (५१३) आहेत.

ओमायक्रॉनमुळे संक्रमित झालेले सुमारे १५५२ रुग्ण बरे झाले आहेत.

 

राज्यात तिसरी लाट दाखल – आरोग्यमंत्री राजेश टोपे :

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सध्या वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही अजून वाढेल आणि ती जानेवारी अखेरीस उच्चांक गाठेल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून ८५ टक्के रुग्ण हे कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

 

राज्यात आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येणार असून टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version