आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. भारत देश भौगोलिक आणि धार्मिक विविधतेने नटलेला देश आहे. इथे दर १०० किलोमीटर अंतरावर भाषा बदलते, खाद्य संस्कृती बदलते तसेच रूढी आणि परंपरा देखील बदलतात.
अनेक रूढी आणि पद्धती हया लोक कथेच्या माध्यमातून जनमानसांत रुजवल्या जातात.वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा आजही आपण जपत असतो मग पंढरीची वारी असो किंवा गणेशोस्तव, गेल्या दोन वर्षांपासून धार्मिक कार्यक्रमांवर जरी निर्बंध असले तरी लोकांचा उत्सहामध्ये कोणतीच कमतरता दिसून येत नाही.
आज हिंदू धर्मीय जसे आपापल्या धार्मिक स्थळांना मोठ्या श्रद्धने भेटी देतात त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव देखील देशातील धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. ताज महाल सारख्या वास्तूला जगभरातून पर्यटक भेटी देतात. आपल्या महाराष्ट्रात देखील ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबीका मकबरा अनेकजण पहायला येतात.
व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधलेल्या कबरेला मकबरा असं म्हणतात. कबर पहायला येणारे लोक आदराने कबरेवर फुल चादर चढवतात. मात्र आपल्याच भारतात अशी एक कबर आहे ज्यावर चक्क चप्पल आणि जोडे चढवले जाते. नेमकी कुठे आहे ती चला तर मग जाणून घेऊयात..
उत्तर प्रदेशातील इटावा येथे ‘चुगलखोर का मकबरा’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्या भाविकांची अशी मान्यता आहे की जर तुम्ही ह्या कबर वर चप्पलेने प्रसाद दिला तर तुमची मनातली इच्छा पूर्ण होते. त्यामुळे ह्या मकबऱ्याला फुल किंवा चादर नव्हे तर चक्क चप्पलेच्या जोड्यांचा प्रसाद मिळतो.
प्रत्येक जण आयुष्यात कधी ना कधी चुगली तर करतोच पण त्याबद्दल कधी शिक्षा झालेली ऐकिवात नाही परंतु भोलू सय्यद ह्या माणसाला मात्र मरणानंतरही शिक्षा मिळत आहे. ह्याच मूळ सुमारे ५०० वर्षांआधी घडलेल्या गोष्टीमध्ये आहे.
–
- भारतातील २०० वर्ष जुनं शिवमंदिर या प्राण्याच्या ‘पाठीवर’ उभं आहे!
- श्रीकृष्णाच्या पवित्र जागेवर दावा करणारी ही मंडळी आहेत तरी कोण?
–
इटावाचा राजाने अटेरीच्या राजा विरोधात युद्ध पुकारले. अटेरीच्या राजाच्या मनात आपल्याबद्दल वाईट आहे आणि तो आपल्याला पाण्यात पाहतो ही या युद्धामागची भावना होती. परंतु हे सगळे गैरसमज भोलू सय्यदने निर्माण केले आहेत हे जेंव्हा राजाला कळालं तेंव्हा त्याच्या रागाचा पारा चढला.
भोलू सय्यद या चुगलीखोर माणसाला मरेपर्यंत चपलेने मारण्यात यावे अशी सूचना त्याने केली. मरणानंतर त्याची कबर ‘ चुगलखोर का मकबरा’ म्हणून प्रसिद्ध झाली. लोक येथे येतात प्रार्थना करतात आणि आपली मन्नत पूर्ण झाली की मकबऱ्याला
चपलेने मारतात.
स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार इटावा – बरेली मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवास करण्याआधी ह्या मकबऱ्यावर कमीतकमी पाच चपलेचे फटके द्यावे. असं केल्याने रात्रीच्या वेळी भूत-प्रेत यांपासून संरक्षण मिळते आणि प्रवास सुखकर होतो.
आज भारतामधील राज्य, राष्ट्रीय महामार्ग आहेत जिथे अशा पद्धतीची धार्मिक स्थळे आहेत, श्रद्धाळू प्रवासी आवर्जून अशा ठिकाणी थांबतात आणि पुढे आपल्या प्रवासाला निघतात. आजही अनेकजण गावच्या वेशीबाहेर पडताना ग्रामदेवतेचे दर्शन घेऊनच बाहेर पडतात, जेणेकरून प्रवासात कोणते विघ्न येऊ नये.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.