आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अस्थमा किंवा दमा हा एक कॉमन आजार आहे. बऱ्याच लोकांना याचा त्रास असतो. दम्याचं दुखणं म्हणजे क्रॉनिक आजार असं समजलं जातं. म्हणजे खूप दिवसांपासून असलेला आजार.
विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येत असतात.
श्वासनलिकेत जर काही इजा झाली असेल किंवा काही दोष निर्माण झाले असतील आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर दमा होऊ शकतो. यामध्ये खोकल्याची भयंकर ढास लागते.
हे ही वाचा –
===
अस्थमाची लक्षणे
दमा पीडित लोकांचा कफ घट्ट आणि दुर्गंधीयुक्त असतो.
दम्याचा अटॅक आल्यावर खूप खोकला येतो. जीव कासावीस होतो. अस्थमा असलेल्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. स्त्री आणि पुरुष दोघांनाही याचा त्रास होऊ शकतो. रात्री दोन नंतर शक्यतो अटॅक येतो आणि खोकल्याची प्रचंड उबळ येते. ही आहेत अस्थमाची कारण
कोरडा कफ झाला तर खोकला येतो, आणि दमा होऊ शकतो.
वातावरणातील धूळ आणि धूर यांचं प्रमाण वाढले असेल तर अस्थमाचा त्रास होऊ शकतो. कधीकधी औषधांचा परिणाम होऊनही कफ कोरडा होतो आणि त्यामुळे देखील दमा होऊ शकतो. खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे देखील अस्थमा होऊ शकतो.
मानसिक तणाव, येणारा प्रचंड राग आणि वाटणारी भीती यामुळे देखील अस्थमा होऊ शकतो.
हे ही वाचा –
सध्याच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात या कारणामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
रक्तामध्ये काही दोष निर्माण झाले तर अस्थमा होण्याची शक्यता अधिक असते.
नशा येणारे काही पदार्थ ड्रग्स यांच्या सेवनामुळे देखील अस्थमा होऊ शकतो. जर दीर्घकाळ सर्दी, खोकला राहिला तर, शरीरात कफ साठून राहतो आणि त्याचा त्रास होऊन अस्थमा होऊ शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आपल्या भुकेपेक्षा अधिक अन्नाचं सेवन केलं तर दमा होऊ शकतो. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे चतकोर भाकरीची भूक ठेवून उठायला हवं. मनुष्याच्या श्वास नलिकेत जर धुळ गेली किंवा प्रचंड थंडीत बाहेर फिरलात तर दमा होऊ शकतो. मलमूत्राचा आवेग जर वारंवार रोखण्याची सवय असेल तर अस्थमा होऊ शकतो.
जर कौटुंबिक अनुवंशिक काही इतिहास असेल म्हणजे तुमचे आई-वडील, आजी, आजोबा यांना जर अस्थमा असेल तर दमा होऊ शकतो. म्हणून अशा लोकांनी काळजी घेतली पाहिजे.
अस्थमा टाळण्यासाठी हे सोपे उपाय करा
१. रुग्णांनी उबदार बिछान्यावर झोपलं पाहिजे. म्हणजे गादी, कॉटनचे बेडशीट, गालिचे इत्यादी.
२. धूम्रपान करू नये. सिगारेट्स, हुक्का यांच्याद्वारे धूम्रपान करू नये किंवा हल्ली मिळणारी इ सिगरेट्स देखील घातकच आहेत.
३. जेवणात मसालेदार आणि चमचमीत पदार्थांचा वापर टाळावा.
४. धूळ आणि धूर यांच्यापासून लांब राहावं. प्रदूषण असलेल्या कुठल्याही वातावरणात जाऊ नये, कारण यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. रस्त्यांवरून फिरताना देखील मास्क बांधून फिरलं पाहिजे.
५. दारु, तंबाखू यासारखी नशा आणणारी ड्रग्स मार्कर्स यांचा वापर करू नये. यामुळे दम्याचा त्रास जास्त होऊ शकतो.
६. मानसिक ताण – तणाव टाळयला हवा.
७. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रचंड राग आला तर दम्याचा अटॅक येऊ शकतो. रागामुळे होणारी भांडणे टाळली पाहिजेत.
अस्थमासाठी काही घरगुती उपाय
१. आपल्या स्वयंपाक घरातील लसूण ही दम्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
30 मिलिलिटर दुधात जर लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या वाटून घातल्या आणि ते दूध गरम करून गाळून प्यायलं तर त्याचा फायदा होतो. दमा होण्याच्या सुरुवातीच्या काळात याचा खूप उपयोग होतो.
आल्याचा चहा घेताना त्यात दोन पाकळ्या लसूण वाटून टाकला आणि तो चहा घेतला तर अस्थमा रुग्णाला याचा फायदा होतो.
असा चहा रोज सकाळ, संध्याकाळ असा दोन्ही वेळेस घेतला तर अस्थमावर नियंत्रण आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
२. १२५ मिली पाण्यात चार ते पाच लवंगा टाकून पाच मिनिटे उकळल्यानंतर ते गाळून घेऊन त्यात एक चमचा शुद्ध मध घातला आणि ते गरम गरम पाणी प्यायलं तर त्याचा फायदा होतो.
दिवसातून दोन ते तीन वेळा असं पाणी पिल्याने रुग्णाला नक्कीच आराम मिळतो.
३. शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पानं दम्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
१८० मिलीलिटर पाण्यात मुठभर शेवग्याची पानं टाकून पाणी पाच मिनिटे चांगलं उकळून घ्यायचं. नंतर ते थंड झाल्याव त्यामध्ये चिमुटभर सैंधव, काळी मिरीपूड आणि थोडा लिंबाचा रस घालायचा आणि हे सुप म्हणून प्यायचं.
आठवड्यातून काही दिवस नियमितपणे जर याचं सेवन केलं तर दम्यासाठी हे खूप उपयोगी पडतं.
४. स्वयंपाक घरातील मेथ्या देखील दम्यासाठी खूप गुणकारी आहेत.
मेथ्यांचा काढा यावर उत्कृष्ट उपाय आहे. एक कप पाण्यात एक चमचा मेथी दाणा उकळून घ्या आणि ते पाणी गाळून रोज एकदा तरी प्यायचं हा उपाय दम्यासाठी उपयुक्त आहे.
जर दम्याचा त्रास जास्तच असेल तर पिकलेले केळं घेऊन त्याला चाकूने उभा छेद देऊन, त्यात वस्त्रगाळ केलेली मिरीपूड भरून ठेवायची.
केळ्याचं साल न काढता हे केळं पानांमध्ये बांधून दोन ते तीन तास ठेवायचं. नंतर पानांमधून केळ काढून ते केळं गॅसवर भाजून घ्यायचं. केळ्याची साल ही पूर्ण काळी झाल्यावर केळं काढून घेऊन केळ्याची साल काढून आतलं केळ खाऊन टाकायचं.
याचा अस्थमा रुग्णांना बराच फायदा होतो.
याशिवाय दमा असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली त्यांची औषधं वेळेवर घेतली पाहिजेत.
याशिवाय वापरायचा इन्हेलर कायम जवळ ठेवला पाहिजे.कारण त्याची कधीही गरज पडू शकते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.