Site icon InMarathi

सतत बदलणारी परिस्थिती हेच एकमेव सत्य आहे, जाणून घ्या बुद्धाची शिकवण!

change inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी जीवन हे कधीच स्थिर नसते, माणसाच्या आयुष्यात सतत काही ना काही घडामोडी घडत असतात. मग त्या सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या, माणूस या दोन्ही परिस्थितून जात असतो. या गोष्टींमधून जात असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या मनाची, मानवी मन हे खूप चंचल आहे.

 

एखादी भूतकाळातील घटना वर्तमानात सतावत असते, दुसऱ्या व्यक्तीचे चांगले झालेले बघवत नाही, भविष्यबद्दलची चिंता या आणि अशा अनेक समस्यांनी मानवी मन चिंताग्रस्त असते. माणसाच्या सुरळीत आयुष्यात जेव्हा एखादा मोठा बदल होतो तेव्हा त्याच्या मनावर सकारात्मक आणि नकारत्मक परिणाम होत असतो, अशाच आयुष्यातील होणाऱ्या बदलांवर भगवान बुद्धाने काही मार्ग सांगितले आहेत…

 

 

भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.

१. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे.
२. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
३. दुःख निरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.
४. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.

हे सर्व ध्यानी ठेऊन, बुद्ध आपल्याला चार मार्गांनी जीवन जगायला आणि त्याची अनुभूती घ्यायला शिकवतात.

१. बदल हा अपरिहार्य आहे

बुद्ध म्हणतात, “बदल हा अपरिहार्यच आहे’- आपण त्याच्याकडे सामंजस्याने पाहिलं की आपली वेदना नाहीशी होते”.
सामान्य माणूस हा बदलाला खूप घाबरुन असतो. बदल तरीही होतोच त्यामुळे आपण तो टाळू शकत नाही किंवा त्याला विरोधही करू शकत नाही.

 

 

बदल हा कसाही आणि कुठल्याही रुपात होऊ शकतो, त्यासाठी आपण कायम मनाने तयार राहायला हवे. साधना, प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि हळू हळू आपले विचार बाजूला सारून तुमच्या शरीराशी एकनिष्ठ होऊन या होणाऱ्या बदलाचा स्वीकार करणे.

स्वतः वर लक्ष केंद्रित करून आजवर तुमच्या आयुष्यात झालेले बदल, तुमचे नातेसंबंध, मित्र परिवार, या क्षणी ते कुठल्या त्रासाशी झुंज देत असतील हा विचार करणे. जे बदल होत आहेत किंवा पुढील आयुष्यात होणार आहेत आणि तुम्ही आत्ता ज्या परिस्थितीत आहात ती, त्या परिस्थितीसाठी कृतज्ञता मानणे. अश्या प्रकारची साधना करून तुम्हाला आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्कोनातून बघता येईल.

२. जवळीकता कमी करा :

बुद्ध म्हणतात, “जवळीकता हे दुःखाचे मूळ आहे”

बुद्धांच्या म्हणण्यानुसार जवळीकता म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईक, मित्र मंडळींमध्ये मन लावणे नव्हे तर तुम्ही एखाद्या गोष्टीत कशा प्रक्रारे गुंतला आहात. व्यक्ती असो किंवा वस्तू त्याने आपल्याला आनंद मिळत असेल किंवा दुःख, तरीही आपण सगळे काही धरून ठेवायला जातो कारण आपल्याला सगळेच गमावण्याची भीती असते. कोणतीही सक्ती न करता प्रेम करणे म्हणजे माणूस आहे तसा स्वीकारणे आणि त्याला मुक्त जगू देणे.

 

growingself.com

 

आपल्याला जेव्हा हे कळते की आयुष्यावर आपला काहीच हक्क नाही, तेव्हाच अनासक्ती ही आपण अमलात आणत असतो. बदल स्वीकारण्यासाठी आपले मन खुले राहते आणि आपणहूनच आपण समृद्ध जीवन जगायला लागतो आणि योग्य निर्णय घ्यायला लागतो.

३. बदल स्वीकारणे

“बदल कधीच त्रासदायक नसतो, त्याचा विरोध करणे आपल्याला त्रासदायी ठरू शकते” – बुद्ध

बरेचदा असे होते की बदल झाल्यावर देखील त्याचा परिणाम आपल्या मनासारखा नसतो. ह्याच बदलाचा विरोध करून आपण जीवनाची गती अडवत असतो हे आपल्याला कळत नाही. हाच बदल स्वीकारून पुढे जायचे ठरवले की जीवनाशी आपल्याला जुळवून घेता येते.
गोष्टींवर अडून राहिलो तर आपली बौद्धिक वाढ होणारच नाही. जीवन आपल्याला प्रत्येक टप्प्यावर समृद्ध करत असते त्यानुसार आपणही बदलले पाहिजे.

 

 

४. अनुभूती हीच शिकवण :

बुद्ध, ” प्रत्येक अनुभवात, चांगल्या अथवा वाईट, काहीतरी शिकवण दडलेली असते. ती शिकवण शोधून आत्मसात करणे हे आपले ध्येय असले पाहिजे.

बदल स्वीकारून त्यातून आपण शिकलो की बदल हा आपला शत्रू उरतच नाही. बदल आपला सर्वात मोठा गुरू आहे. बदलाचे मूळ तुम्हाला व्यक्ती म्हणून समृद्ध करते. तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक विकासात, जरी तुम्हाला वेळ योग्य वाटली नाही तरीही असे काही बदल घडत असतात जे तुमचे भविष्य आकारत असतात.

 

जितके तुम्ही बदलाला घाबराल तितका तो भयावह वाटू लागेल. आयुष्यात माणसं खूप चुका करतात त्यातून शिकतात म्हणूनच जेव्हा तुम्ही अपयश अनुभवता तेव्हा त्याकडे शिकण्याची एक संधी म्हणून बघा. हजारो वर्ष माणूस त्या त्या काळानुसार आधुनिक जीवन पद्धतीचे नव नवीन मार्ग शोधत आला आहे.

जीवनाचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण पुढे काय होणार आहे ह्याची भीती मनातून काढून टाकू. हाच स्वतः मधला आणि आजू बाजूला होणारा बदल आपण स्वीकारू लागतो तेव्हाच आपल्याला आत्मिक शांतता प्राप्त होते.

आजच जग हे दिवसागणिक खूप वेगवान होत आहे, आज प्रत्येकजण पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे त्यामुळे नातेसंबंध मागे पडत चालले आहेत. ज्या व्यक्तीसोबत आपण खूप काळ एकत्र राहतो अचानक त्या व्यक्तीपासून लांब गेल्याने साहजिकच आपण दुःखात जातो परिणामी डिप्रेशन येते. मात्र आयुष्य कधीच थांबत नसते त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये न अडकता पुढे जाऊन आपले आयुष्य स्वछंदीपणे जगावे. दुःख करत बसलो तर आयुष्याची मज्जाच घेता येणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version