पैसे कमावणाऱ्या मध्यमवर्गीय किंवा दारिद्रयरेषेखालील मुलांनाच बालकामगार का म्हणायचं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जेव्हा लोक चाईल्ड लेबर अर्थात ‘बालकामगार’ समस्येविषयी बोलतात तेव्हा मनात नेहमी प्रश्न येतो की, मिडिया इंडस्ट्री मध्ये श्रीमंत घरच्या लहान मुलांनी काम करून पैसे कमावलेले चालतात, पण दुसरीकडे गरीब घरच्या मुलांनी पोटापाण्यासाठी पैसे कमावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मात्र बालकामगार ठरवून अटकाव केला जातो असे का?
दोन्ही बाजूकडील मुलं एकाच वयाची, मग असा भेदभाव का? श्रीमंत घरच्या मुलांनी लहान वयात काम केलं तर त्यांना देखील बालकामगार ठरवलं गेलं पाहिजे नाही का?
\
या प्रश्नांनी बेजार करून सोडलं असता, त्याचं उत्तर मला सापडलं “Playful Parenting” हे ऑडियोबुक ऐकताना. या ऑडियोबुकने माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उकल केली आणि मला उमगले की ‘बाल कामगार म्हणजे काय? ते खरंच वाईट आहे का? आणि मुख्य म्हणजे मला ‘काम आणि खेळ’ यातील फरक कळून चुकला.
बाल कामगार म्हणजे काय?
उपरोक्त प्रश्नाची उकल करून घेण्याआधी आपण सर्वात प्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की ‘बाल कामगार म्हणजे काय? ते खरंच वाईट आहे का?
ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल की बाल कामगार सारखी समस्या लहान मुलांकडून त्यांचे बालपण हिरावून घेते. बालपण म्हणजे ह्या वयात लहान मुलांनी खेळणं, बागडणं, खोड्या करणं, स्वप्न पाहणं, जगण्याचा मनसोक्त आनंद लुटणं वगैरे गोष्टी करणं अपेक्षित असतं.
पण लहान वयात काम केल्यामुळे त्यांना या कोणत्याच गोष्टी करता येत नाही, परिणामी लहान वयातच त्यांच्या आयुष्यातील ती निरागसतेची झालर निघून जाते आणि ते मुल कशातच रस घेत नाही.
तुम्हाला वाटत नाही का मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला भाग पडणे म्हणजे त्यांना देखील बाल कामगारासारखंच वागवणं आहे?
उदाहरणार्थ घरातील कामे म्हणा, शाळेचा अभ्यास म्हणा, तेवढच काय तर शाळेत जाताना देखील आपण त्यांच्यावर जबरदस्ती करतो, त्यांना एखाद्या खेळात भाग घ्यायचा नसेल तरी त्यांना जबरदस्तीने त्यात भाग घ्यायला लावतो. नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की परिस्थितीमुळे काम करणाऱ्या बाल कामगारांमध्ये आणि आपण आपल्या मुलांवर लादत असलेल्या अपेक्षांमध्ये फारसा फरक नाही.
सध्याच्या काळात आपण मुलांवर थेट जबरदस्ती करत नाही, त्यांना शब्दात पकडायचा प्रयत्न करतो, जसे की
जर तुला अभ्यास करायचा नसेल तर नको करू, पण यापुढे मला काहीही विचारू नकोस, तुझ्या मनाला वाट्टेल ते कर
किंवा
जर तू परीक्षेत चांगले मार्क पाडलेस किंवा एखाद्या खेळात चांगली कामगिरी बाजावलीस तर तुला सायकल आणून देईल किंवा नवीन गेम आणून देईन.
म्हणजे पारंपारिक जबरदस्तीचा मार्ग सोडून आपण आपल्या मुलांवर भावनिक जबरदस्ती करतो आहोत आणि ते निरागस मुलं शेवटी नाईलाजाने आपण सांगतो तेच करतं. आपली ही भावनिक जबरदस्ती अयोग्य आहे असं तुम्हाला वाटत नाही का?
बाल कामगार पैश्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी मेहनत घेतात आणि आपण सुशिक्षित माणसं प्रसिद्धीसाठी किंवा स्तुतीसाठी मुलांकडून मेहनत करवून घेतो.
काम म्हणजे काय आणि खेळ म्हणजे काय?
माझ्या एका मित्राची मुलगी खूप सुंदर गाते. ती सध्या मिडिया इंडस्ट्रीमध्ये गाण्यांना आपला आवाज देऊन स्वत:ची आवड पूर्ण करते आणि त्यातून पैसा देखील कमावते. तिला ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट तिला करायला मिळतेय आणि त्याचा ती मनसोक्त आस्वाद घेतेय.
म्हणूनच मला वाटतं की पैसा मिळो अथवा न मिळो, जी गोष्ट एखाद्या लहान मुलाला मनापासून आवडतेय, ती जोपर्यंत तो करेल तोवर त्याला त्याचा कंटाळा येणार नाही, म्हणजेच जर त्या गोष्टीच्या माध्यमातून ते मुलं काम करू न पैसे कमवत असले तरी त्यात काही चूक नाही. कारण ती गोष्ट त्या मुलाला मानसिक आनंद देतेय.
आपण आता मोठे झालोत, त्यामुळे खेळण वगैरे आपल्याला बालिश वाटतं, पण तेच लहान मुलांकडे पहा, ते खेळताना कधीही थकत नाही, कारण ती गोष्ट त्यांना आवडते, ते कितीही वेळ खेळू शकतात, त्यातून आपल्याला काही मिळेल अशी त्यांची अपेक्षाच नसते, त्यांना निव्वळ मज्जा हवी असते.
अश्याचप्रकारे आपलं उदाहरणही घ्या ना, जर तुम्हाला फोटोग्राफी आवडते आणि त्यातच तुम्हाला मनासारखं काम करण्यास मिळालं तर तुम्ही कंटाळल का? नाही ना? तसचं आहे हे.
===
- पालकांनो! ही ६ सूत्रं पाळली नाहीत तर तुम्ही कधीही आदर्श पालक ठरू शकणार नाही!
- मुलांना शिस्त लागावी म्हणून सारखे धपाटे लगावणे अतिशय घातक ठरू शकते!===
लहान मुलांनी काम करणं वाईट आणि मोठ्यांनी काम करणं चांगलं?
मला वाटतं प्रौढ असो वा लहान मुल असो, सर्वांसाठी हे जीवन म्हणजे एखादं खेळाचं मैदान आहे. आपल्याला जे आवडतं ते प्रत्येकाने करावं. आपण काय करतो केवळ पैश्याच्या मागे धावतो आणि ज्यात आपल्याला रस आहे ती गोष्ट गमावून बसतो आणि परिणामी जीवनातील खरा आनंद आपल्यापासून हिरावला जातो.
आपण नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टीच्या मागे धावतो आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतो आणि ते करता करता आपल्याला नेमक काय हवं आहे हेच विसरून जातो.
आपण प्रौढ लोकांनी स्वत:ला एका साच्यात बांधून डांबून घेतलंय, जेव्हा त्याची आपल्याला जाणीव होते तेव्हा आपण त्यातून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करतो, पण आपल्या मुलांच तसं नाहीये.
त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं आहे, तेच त्यांना करू द्या, आपल्याकडे आता कोणतीही चॉइस नाही पण आपल्या मुलांकडे मात्र नक्की आहे. त्यांना स्वत:सारखं एका साच्यात डांबून घ्यायला शिकवू नका, त्यांना स्वैर पणे त्यांच्या आवडीची गोष्ट करायला सहाय्य करा.
जेव्हा आपण आपल्या मुलांना समजून घेऊ, त्यांना प्रेमाची शिकवण देऊ तेव्हा या जगामध्ये ‘कामगार’ नावाची कोणतीही वृत्ती शिल्लक राहणार नाही.
(Why are rich children allowed to work and earn money? या लेखक प्रशांत गुजरे यांच्या इंग्रजी ब्लॉगचा अधिकृत अनुवाद!)
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.