Site icon InMarathi

ओमिक्रोनच्या आधी सर्दी आणि फ्लूमधील फरक समजून घ्या!!

cold inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज अगदी कोणालाही फोन लावला तरी व्यक्ती धड फोनवर बोलत नाही, यामागचं कारण आहे ते म्हणजे सर्दी ताप खोकला असणे. देशात पुन्हा एकदा ओमिक्रोन नावाचा व्हेरिएन्ट आपले डोके वर काढत आहे. सध्या सगळेच मुंबईकर तापाने फणफणले आहेत.

वातावरणातील बदल, वाढती थंडी, पावसाचामध्येच शिरकाव या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज आपल्यावर होताना  दिसून येत आहे. वातावरणात बदल झाल्याने साहजिकच रोगराई वाढते दुसरीकडे ओमिक्रोनचे रुग्ण वाढत असल्याने अनेकजण चिंतेत आहेत.

 

 

सर्दी हा आजार तसा बघायला गेला तर वर्षातील १२ महिने लोकांना होत असतो, काहींच्या राशीला तर सर्दी कायमचीच असते. काहींना ऍलर्जीची सर्दी असते तर काहीजणांना थंड पदार्थाचे सेवन केल्यामुळे लगेच सर्दी पकडते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एकदा सर्दी झाली की मग खोकला, ताप हे आता समीकरणच बनले आहे. घरात साधं कोणी शिंकले तरी त्याच्यावर काढ्यांचा औषधांचा इतका मारा होतो की नक्की सर्दी आहे की आणखीन काही हा प्रश्नच उरत नाही. सर्दी आणि फ्लू यामध्ये लोकांची चांगलीच गल्लत होते, या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ते आपण जाणून घेऊयात….

 

 

सर्दी * फ्लू :

सर्दी आणि फ्लू हे सामान्यतः विषाणूंमुळे होतात जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात. आपल्या घरात जरी एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली की लगेच त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्दी होतेच. फ्लू हा सर्दीपेक्षा खूप वेगळा आजार असून यात विषाणूचा देखील परिणाम होतो.

फ्लू जर आपण वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण फ्लू या प्रकारात मोठ्या प्रमाणावर गुंतागुंत असते. असं म्हंटले जाते की झोपेची कमतरता आणि तणाव यामुळे सर्दी आणि फ्लूचा धोका वाढू शकतो.

 

NPR

 

या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने नाक, घसा सायनस यांना आपले लक्ष करतात. फ्लू हा सामान्य सर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या विषाणूमुळे होतो, जेव्हा सामान्य सर्दी असते तेव्हा ताप येण्याचे प्रमाण कमी असते मात्र फ्लूमध्ये रुग्णाला १०० ते १०२ इतका ताप येतो. फ्लू सामान्यतः लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर होतो तसेच घरातील वयोवृद्ध मंडळींना देखील होऊ शकतो.

लक्षणे :

कोणताही आजार होण्याच्या आधी आपले शरीर आपल्याला त्या आजाराचे संकेत देत असते. सामन्यतः सर्दीमध्ये घसा खवखवणे, नाक चोंदणे,घसा, डोकेदुखी, नाक वाहणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तर फ्लूमध्ये झोप न लागणे, भूक नसणे, थकवा जाणवणे, अचानक ताप येणे यासारखी लक्षणे आढळून येतात.

 

उपचार :

सर्दी झाल्यास गरम पाणी पिणे, वाफ घेणे फ्लू असल्यास सूप पिणे, व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे, हे जरी असले तरी वेळच्या वेळी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला हमखास घेणे, कारण फ्लू झाला असल्यास तो वाढण्याची शक्यता असल्याने वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

 

 

आज सगळ्यामाध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की वेळीच खबरदारी घेतली नाही तर कोरोनाची तिसरी लाट नक्की येऊ शकते, सरकारने आधीच निर्बंध लादण्यास सुरवात केली आहे. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था तर दुसरीकडे देशातील नागरिकांची सुरक्षा हे दोन्ही मुद्दे लक्षात घेऊन सरकारने योग्य तो निर्णय घ्यायला हवा, तसेच आपण नागिरकांनी देखील वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version