Site icon InMarathi

हॅशटॅग म्हणजे काय? सोशल मीडियावर सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘#’ ची रंजक कहाणी

hashtag inmarathi2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट करताना त्याबरोबर त्याविषयी संबंधित असलेले हॅशटॅग्ससुद्धा टाकले जातात. आपण सर्वांनी सोशल मीडिया पोस्टच्या समोर सर्वव्यापी #(हॅशटॅग) चिन्ह पाहिले असेल, परंतु ते चिन्ह का टाकले जाते? हल्ली या हॅशटॅगची फार चलती आहे, पण हे हॅशटॅग म्हणजे काय?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तर हॅशटॅग हे सोशल मीडिया साइटवर वापरलेले लेबल आहे, ज्यामुळे थीमसह पोस्ट किंवा माहिती शोधणे सोपे होते. हे स्पेस नसलेल्या शब्दांसमोर “#” चिन्ह समाविष्ट करून तयार केले जाते.

हॅशटॅग सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्यांचे लक्ष वेधून घेणारी सामग्री एक्सप्लोर करण्यासाठी उद्युक्त करतात. तसेच विविध कंपन्या त्यांच्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत (टार्गेट ऑडियन्स) पोहोचण्यासाठी आणि सदस्यांना माहिती फिल्टर करण्यात मदत करण्यासाठी हॅशटॅग वापरतात.

आजच्या सोशल मीडियाच्या जगात, वापरकर्ते माहितीच्या ओव्हरलोडमुळे पटकन कंटाळतात. हॅशटॅग वापरल्याने हा डिजिटल गोंधळ कमी करणे सोपे होते. हॅशटॅगमुळे फक्त आपल्याला हव्या असलेल्या माहितीवर फोकस करणे सोपे होते.

हे हॅशटॅग सामान्यतः Twitter, Instagram, YouTube, Google+ आणि Pinterest सारख्या सोशल मीडिया साइटवर वापरले जातात.

अंदाजे दहा वर्षांच्या कालावधीत, हॅशटॅग हे प्रोग्रामर लोकांच्या रोजच्या कामात उपयुक्त म्हणून ओळखले जाणारे एक उपयुक्त साधन आज ऑनलाईन कन्टेन्टसाठी इतके महत्वाचे कसे झाले? आज इतके ट्रेंडिंग असलेले हे हॅशटॅग पहिल्यांदा कुणी वापरले? याचा शोध कुणी लावला? वाचा.

इंटरनेटच्या पूर्वीच्या दिवसांत, आपण ज्याला # चिन्ह म्हणतो ते आपण कोणत्या देशात वाढलो यावर अवलंबून होते. अमेरिकन आणि कॅनेडियन लोक त्याला पाउंड चिन्ह किंवा संख्या चिन्ह म्हणत, तर ब्रिटन आणि आयरिश लोक त्याला हॅश म्हणत.

 

 

“हॅशटॅग” या शब्दाचा पहिला ज्ञात वापर प्रकाशित करणार्‍या स्टो बॉयडने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की “हॅशटॅग” हे नाव प्रोग्रामर संस्कृतीतून आले आहे. कारण तो आणि त्याचे मित्र हॅश या चिन्हाला पाउंडचे चिन्ह नव्हे तर हॅश म्हणून ओळखत असत.

१९८८ साली इंटरनेट रिले चॅट (IRC) वर संपूर्ण नेटवर्कवर उपलब्ध असलेले ग्रुप्स आणि विषय लेबल करण्यासाठी पहिले हॅश चिन्ह वापरले गेले. वापरकर्त्यांना त्यांना हवी असलेली माहिती शोधणे सोपे करण्यासाठी , सारख्या विषयाचे मेसेजेस आणि कन्टेन्टचे ग्रुपिंग करण्यासाठी हॅश चिन्ह वापरले गेले.

आज ट्विटरवर सर्रास वापरले जाणारे हॅशटॅगचे फिचर पूर्वी नव्हते. ट्विटरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, वापरकर्त्यांनी तक्रार केली की ट्विटर काय फुकट आहे त्यामुळे कुणीही वापरतय आणि त्यामुळे त्यांना असंबद्ध कन्टेन्ट वाचायला मिळतोय.

या समस्येवर उपाय शोधत असताना, ख्रिस मेसिनाने IRC कडून प्रेरणा घेतली आणि २३ ऑगस्ट २००७ रोजी पहिला Twitter हॅशटॅग जारी केला. तरीही ऑक्टोबर २००७ पर्यंत म्हणजेच कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीपर्यंत हॅशटॅगची लोकप्रियता तितकीशी वाढली नव्हती.

 

 

ट्विटरने २००७ साली हॅशटॅगचे फारसे समर्थन केले नव्हते. पण ख्रिस मेसिनाला हॅशटॅग लोकप्रिय करण्याची संधी मिळाली. कॅलिफोर्नियाचे रहिवासी असलेले नेट रिटर हे तेथील जंगलातील आगीबद्दल मोठ्या प्रमाणावर ट्विट करत होते. त्याच वेळी, फ्लिकरवर सॅनडिएगोफायरचा वापर टॅग म्हणून केला जात असल्याचे मेसिनाच्या लक्षात आले. यामुळे मेसिनाला रिटरशी बोलून त्यांना सर्व संबंधित ट्वीट्सवर #SanDiegoFire चा वापर करण्यास सुचवण्याची प्रेरणा मिळाली.

रिटरचे ट्विट इतके प्रसिद्ध झाले की ट्विटर वापरकर्त्यांनी संबंधित कन्टेन्टचे ग्रुपिंग करण्यासाठी हॅशटॅग वापरण्यास सुरुवात केली. २००९ मध्ये, ट्विटरने शेवटी हॅशटॅग स्वीकारले आणि एक सर्च टूल म्हणून हॅशटॅगला प्रमोट केले, जेणेकरुन वापरकर्ते पाहू शकतील की आणखी कोण विशिष्ट हॅशटॅग वापरत आहे. पुढील वर्षी Twitter ने “ट्रेंडिंग टॉपिक्स” सादर केले.

तेव्हापासून इतर प्लॅटफॉर्म्सने देखील हॅशटॅग्सचा वापर करण्यास सुरुवात केली आणि आणि ते इंटरनेट जगतातील एक महत्वपूर्ण साधन बनले.

 

 

२०१० मध्ये लॉन्च झालेल्या इंस्टाग्रामने पहिल्या दिवसापासूनच हॅशटॅग्सचा वापर केला आहे. Facebook ने २०१३ पासून हॅशटॅग्स वापरण्यास सुरुवात केली तर Google+, Tumblr आणि Pinterest वर देखील वापरकर्त्यांना फक्त # चिन्ह वापरून कन्टेन्ट ग्रुप करता येते.

मेनस्ट्रीम इंटरनेटवर हॅशटॅग्सची सुरुवात झाल्यापासून कन्टेन्ट ग्रुप करणे ते आता एक महत्वाचे साधन असा हॅशटॅगचा प्रवास झाला आहे. #MeToo, #WhatBlackPantherMeansToMe, हे आजवरच्या अनेक प्रसिद्ध व ट्रेंडिंग हॅशटॅग्सपैकी काही प्रसिद्ध हॅशटॅग्स आहेत. तर अशी ही हॅशटॅगच्या जन्माची कहाणी आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version