Site icon InMarathi

एकेकाळी ‘मन्नत’च्या बाहेर गर्दीत उभा असायचा कार्तिक आर्यन, कारण…

srk inmarathi 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमवायचं अशी आकांक्षा बाळगून अनेक तरुण मुंबईत येतात. मुंबईचा झगमगाट त्यांना दिपवून टाकतो, लवकरच ही मुंबई त्यांना आपलंसं करते.

शाहरुख खान.. अनेक मुलींच्या हृदयाची धडकन .. शाहरुखला किंग खान म्हणतात ते काही उगाच नाही. तो सुद्धा कित्येक वर्षांपूर्वी असाच मुंबईत आला. मायानगरीत येऊन स्वतःची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले.

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर रात्री उभं राहून शाहरुखने एक स्वप्न पाहिलं होतं.. या शहरावर राज्य करण्याचं.. आणि ते स्वप्न त्याने पूर्णदेखील केलं. आज अनेक तरुणांसाठी शाहरुख आदर्श आहे. मेहनतीच्या, कौशल्याच्या बळावर तुम्ही काहीही साध्य करू शकता याचं शाहरुख एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

 

 

खरंतर बॉलीवूडचे स्टार्स आणि त्यांचं फॅन फॉलोविंग ही काही नवीन गोष्ट नाही. फॅन्ससोबतचे असंख्य किस्से बॉलीवूडचे स्टार्स अनेक मुलाखतींमधून सांगत असतात. आपल्या लाडक्या स्टार्ससाठी फॅन्स काहीही करायला तयार असतात.

सुपरस्टार राजेश खन्ना हे जेव्हा शूटिंगसाठी बाहेर पडायचे, तेव्हा त्यांच्या घराबाहेर ही गर्दी जमलेली असायची. मुली तर त्यांच्या गाडीच्या काचांवर आपल्या लिपस्टिकच्या खुणा सोडायच्या.

एका स्टारसाठी एवढे फॅन्स असणं ही सुखावह गोष्ट असते. शाहरुखच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. शाहरुखचा बंगला ‘मन्नत’ हे जणू काही एक पर्यटन स्थळच आहे.

दररोज शाहरुखच्या बंगल्याबाहेर हजारो फॅन्स असतात. रविवारी शाहरुख त्याच्या गच्चीवर येऊन त्याच्या फॅन्सना फक्त ‘हॅलो’ करतो. त्याची एक झलक बघण्यासाठी त्याचे फॅन्स आतुर असतात. अशाच फॅन्सपैकी एक म्हणजे ‘कार्तिक आर्यन’ कोणे एकेकाळी शाहरुखची एक झलक बघण्यासाठी कार्तिक ‘मन्नत’च्या बाहेर तासनतास उभा राहायचा.

 

 

कार्तिकने ही गोष्ट ‘बॉलीवूड हंगामा’च्या एका मुलाखतीत सांगितली आहे. ‘बॉलीवूडमध्ये सगळ्यात पहिला सेल्फी तू कोणासोबत काढला होतास?’ असा प्रश्न कार्तिकला विचारला असता त्याने ‘शाहरुखचं’ नाव घेतलं.

मुंबईत अभिनयात करियर करण्यासाठी आलेला कार्तिक एका रविवारी मन्नतच्या बाहेर उभा होता. फॅन्सच्या तुफान गर्दीत तोही थांबला होता. शाहरुख कारने बाहेर जात असताना त्याने पटकन त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता.

 

 

किंग खानचे लाखो चाहते आहेत. कार्तिकचा किस्साही त्यातलाच एक..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version